नांदेड l दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली शेवटच्या दिवशी रविवारी २३ रोजी दिल्लीत मराठीचा गजर होता.राजकीय क्षेत्रात वावर असतानाही सांस्कृतिक व मराठी साहित्यांची आवटी गोडी असणाऱ्या प्राणिताताई देवरे-चिखलीकर या दिवसभर संमेलनात रमल्या. परिसंवाद ,मुलाखत, चर्चासत्र त्यांनी श्रवण केले


पुस्तके खरेदी केली साहित्यिकांच्या भेटीगाठी घेतल्या .वाचल तर वाचाल ही चळवळ गावोगावी गतिमान होणे आजच्या काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केली

देशाच्या राजधानीत ९८वे साहित्य संमेलन पार पडले. समारोपाच्या दिवशी प्राणिताताई याना साहित्य संमेलनाचा आनंद घेता आला सारस्वतांच्या व्यासपीठावर देशाचे पंतप्रधान मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार एकत्रित आले त्याची खूप चर्चा झाली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी दिल्लीत रविवारी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात हजेरी लावली मराठी साहित्य संमेलनाचा रसास्वाद घेतला.आनंद घेतला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक,जेष्ठ पत्रकार,विचारवंत,लेखक यांच्या भेटी घेण्याचा योग त्यांना आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदा व ७० वर्षानंतर राजधानीत साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले.

संमेलनाध्यक्षा ताराबाई भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन पार पडले उद्घाटन सोहळ्याला देशातील दोन दिग्गज नेत्यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तर समारोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित संमेलनाचा समारोप करण्यात आला.

प्रमुख राजकीय नेते त जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर एन डी टीव्ही चे पत्रकार राम शिंदे,पुढारीचे पत्रकार प्रथमेश तेलंग,जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, बारामतीचे दत्ता सावंत, नांदेडचा सोशल मीडियातील स्टार बळी डिकळे,पुणे येथील श्रीमंत स्टुडिओचे योगेश पाटील यांच्यासह साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत,आदीजणांच्या भेटीचा योग आला माझ्या मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके याची महिती दिल्ली व देशवासियांना कळाली.
समृद्ध भाषेचा वारसा तसेच साहित्य ,नवीन पिढीला कळले पाहिजे वाचन चळवळ गतिमान झाली पाहिजे तरच भवितव्य मुद्रित साहित्याचा रसास्वाद पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. दिल्लीचे तख्त रखीतो महाराष्ट्र माझा…याच अनुभव आला अशीं भावना प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केल्या