Delhi ; दिल्लीत आ भा मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ; प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी घेतल्या साहित्यिकांच्या भेटी
नांदेड l दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली शेवटच्या दिवशी रविवारी २३ रोजी दिल्लीत मराठीचा गजर होता.राजकीय क्षेत्रात वावर असतानाही सांस्कृतिक व मराठी साहित्यांची आवटी गोडी असणाऱ्या प्राणिताताई देवरे-चिखलीकर या दिवसभर संमेलनात रमल्या. परिसंवाद ,मुलाखत, चर्चासत्र त्यांनी श्रवण केले
पुस्तके खरेदी केली साहित्यिकांच्या भेटीगाठी घेतल्या .वाचल तर वाचाल ही चळवळ गावोगावी गतिमान होणे आजच्या काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केली
देशाच्या राजधानीत ९८वे साहित्य संमेलन पार पडले. समारोपाच्या दिवशी प्राणिताताई याना साहित्य संमेलनाचा आनंद घेता आला सारस्वतांच्या व्यासपीठावर देशाचे पंतप्रधान मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार एकत्रित आले त्याची खूप चर्चा झाली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या प्राण...
