Homeनांदेडdoing yoga together : १६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला...

doing yoga together : १६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम

मुंबई| आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करत हॅबिल्‍ड या भारतातील पहिल्‍या हॅबिट-बिल्डिंग प्‍लॅटफॉर्मने उल्‍लेखनीय जागतिक टप्‍पा गाठला आहे, जेथे ‘जागतिक स्‍तरावर ऑनलाइन योग क्‍लासमध्‍ये सर्वाधिक उपस्थिती’ शीर्षकासाठी नवीन जागतिक विक्रम रचला आहे. २१ जून रोजी सकाळी अधिकृत वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षतेखाली हॅबिल्डचे सौरभ बोथरा यांनी आयोजित केलेल्या समक्रमित, मार्गदर्शित सत्रात १६९ देशांमधील ७,५२,०७४ पेक्षा जास्त सहभागी व्हर्च्युअल पद्धतीने योगा करण्यासाठी एकत्र आले.

नागपूरहून लाइव्‍ह स्ट्रिमिंग करण्‍यासह जगभरात उपलब्‍ध करून देण्‍यात आलेल्‍या या ४५ मिनिटांच्या सत्रात १०० हून अधिक देशांतील योगसाधक एकत्र आले, ज्यामुळे हा सर्वात सर्वसमावेशक व दूरगामी योग इव्‍हेण्‍ट ठरला.

हा हॅबिल्डचा आतापर्यंतचा पाचवा जागतिक विक्रम आहे. जानेवारी २०२४ मध्ये २,४६,२५२ प्रेक्षकांसह यूट्यूबवर योग लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी सर्वाधिक दर्शकांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला, त्यानंतर ५,९९,१६२ प्रेक्षकांसह योग धड्यासाठी एकाच दिवसात सर्वाधिक लाइव्ह दर्शकांचा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब आणि २,८७,७११ सहभागींसह व्हर्च्युअल ध्यान वर्गात सर्वाधिक उपस्थिती असा वर्ल्ड रेकॉर्ड युनियनचा किताब मिळवला. २०२३ मध्ये, हॅबिल्डने वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या व्हर्च्युअल योग वर्गात सर्वात जास्त उपस्थितींची नोंद केली होती, ज्यामध्ये १,३४,०५७ सहभागी उपस्थित होते.

या योग सत्रासह हॅबिल्डच्या २१ दिवसांच्या #हरघरयोग्य उपक्रमाचे समापन झाले, ज्‍याने सहभागींना मोफत, मार्गदर्शन सत्रांद्वारे दररोज योग यांसारखे व्‍यायाम करण्‍यास प्रेरित केले. या उपक्रमामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना मिळण्‍यासोबत विविध वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये, भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये आणि अनुभवी व्‍यक्‍तींमध्‍ये सामुदायिक भावना देखील जागृत झाली.

या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत हॅबिल्‍डचे सह-संस्‍थापक आणि प्रमाणित योग प्रशिक्षक सौरभ बोथरा म्‍हणाले, “या विक्रमामधून सहयोगात्‍मक उद्देशाची क्षमता दिसून येते. जगभरातील लोक योगाद्वारे स्वतःला सिद्ध करण्यासारखी लहान सवय अंगिकारतात तेव्हा त्याचा परिणाम परिवर्तनशील असतो. या मोहिमेवर विश्‍वास ठेवणाऱ्या आणि हरघर योग जागतिक चळवळ बनवणाऱ्या प्रत्येक सहभागीचे आम्ही आभारी आहोत.”

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments