doing yoga together : १६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम
मुंबई| आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत हॅबिल्ड या भारतातील पहिल्या हॅबिट-बिल्डिंग प्लॅटफॉर्मने उल्लेखनीय जागतिक टप्पा गाठला आहे, जेथे ‘जागतिक स्तरावर ऑनलाइन योग क्लासमध्ये सर्वाधिक उपस्थिती' शीर्षकासाठी नवीन जागतिक विक्रम रचला आहे. २१ जून रोजी सकाळी अधिकृत वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षतेखाली हॅबिल्डचे सौरभ बोथरा यांनी आयोजित केलेल्या समक्रमित, मार्गदर्शित सत्रात १६९ देशांमधील ७,५२,०७४ पेक्षा जास्त सहभागी व्हर्च्युअल पद्धतीने योगा करण्यासाठी एकत्र आले.
नागपूरहून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासह जगभरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ४५ मिनिटांच्या सत्रात १०० हून अधिक देशांतील योगसाधक एकत्र आले, ज्यामुळे हा सर्वात सर्वसमावेशक व दूरगामी योग इव्हेण्ट ठरला.
हा हॅबिल्डचा आतापर्यंतचा पाचवा जागतिक विक्रम आहे. जानेवारी २०२४ मध्ये २,४६,२५२ प्रेक्षकांसह यूट्यूबवर योग लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी...
