Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Apply online only  : मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावेत -NNL

Apply online only : मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावेत -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे. यासाठी फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारला जाणार आहे. कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज देऊ नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. योजनादूत उपक्रमाला नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी यामध्ये 5331 युवकांनी अर्ज ऑनलाईन सादर केले आहेत. तथापि, जिल्ह्यातील काही युवकांना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत योजना यामध्ये गोंधळ करुन घेऊ नये. दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच  मुख्यमंत्री योजना दूत योजनेतील नियुक्ती समजली जात आहे. युवकांनी हा गोंधळ करू नये, अद्याप मुख्यमंत्री योजनादूत कार्...
Bharatiya Buddhist Maha Sabha : भारतीय बौद्ध महा सभेच्या तालुकाध्यक्ष पदी पुनच्छ प्रताप लोकडे यांची निवड -NNL

Bharatiya Buddhist Maha Sabha : भारतीय बौद्ध महा सभेच्या तालुकाध्यक्ष पदी पुनच्छ प्रताप लोकडे यांची निवड -NNL

नांदेड, करियर
हिमायतनगर,दत्ता शिराणे| दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महा सभा तालूका कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, सर्वानुमते पुनच्छ एकदा प्रताप लोकडे यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ८ सप्टेंबर रोजी एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई खंदारे सरचिटणीस रविकिरण जोंधळे सा. ना. भालेराव, विजयमाला नरवाडे, सुभाष नरवाडे, अप्पाराव येरेकार, यांची प्रामूख्यानं उपस्थिती होती. सर्वानुमते तालुकाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा प्रताप लोकडे यांना संधी देण्यात आली. तर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून सौ. छाया संदिप उमरे यांची निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणीत सरचिटणीस सुरेश गडपाळे, उपाध्यक्ष बाबासाहेब मुनेश्वर प्रताप पांडुरंग लोमटे, भाल...
Maharashtra Gaurav Award to Digambar Waghmare : माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते दिगांबर वाघमारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान -NNL

Maharashtra Gaurav Award to Digambar Waghmare : माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते दिगांबर वाघमारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान -NNL

करियर, नांदेड
कंधार/ नांदेड| महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन शिक्षक दिनाच्या औचित्याने युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्या निमिताने आज दि.10 सप्टेबर रोजी जेष्ट स्वातंत्र सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते कंधार येथिल संपर्क कार्यालयात महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले. गेल्या 24 वर्षापासुन दिगांबर वाघमारे यांचे शैक्षणिक कार्य चालू आहे. संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. एन. केंद्रे, सचिव चेतन भाऊ केंद्रे, माजी नगराध्यक्षा तथा संचालिका अनुराधा केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून कार्य बजावत आहेत. तसेच ते सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन पुणे येथिल युवा महाराष्ट्...
Instructions to Candidates regarding Home Guard Enrollment : होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना -NNL

Instructions to Candidates regarding Home Guard Enrollment : होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना -NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हयातील होमगार्ड अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आली आहे. होमगार्ड नोंदणी प्रक्रियेचे आयोजन नांदेड जिल्ह्यात 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2024  पर्यंत केले होते.  मात्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने होमगार्ड नोंदणी प्रक्रियेमध्ये खंड पडून नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा दिनांक 6 ते 10 सप्टेंबर 2024 या दरम्यान राबविण्यात येत आहे. सदर नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही उमेदवार काही तांत्रिक कारणाने, वैद्यकीय कारणाने, अतिवृष्टीमुळे किंवा अन्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. अशा सर्व ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये आवेदन सादर केलेल्या उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी मिळावी या उद्देशाने दिनांक 9 सप्...
Gnantirtha : ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग मध्ये होणार -NNL

Gnantirtha : ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग मध्ये होणार -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे येत्या ऑक्टोबर मध्ये संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या युवक महोत्सवाला ‘ज्ञानतीर्थ’ असे नाव कायमस्वरूपी देण्यात आले आहे. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण होणार असून, विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १८०० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थी कलावंतासाठी युवक महोत्सव हे हक्काचं कलापीठ असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा या दृष्टीने विद्...
Teacher retired ; शिक्षक नागनाथ चलमले 34 वर्षानंतर सेवानिवृत्त -NNL

Teacher retired ; शिक्षक नागनाथ चलमले 34 वर्षानंतर सेवानिवृत्त -NNL

करियर, नांदेड
देगलूर,गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर येथून जवळच असलेल्या मो लिंबा येथील शिक्षक नागनाथ माधवराव चलमले 34 वर्षसेवा बजावुन 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. सेवावृत्तीचे औचित्य साधून चलमले यांच्या मित्र मंडळाने शहापूर येथील विठ्ठलेशवर सभागृहात सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मनोहर धोंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत पाटील, माजी आमदार सुभाष साबणे, खुशाल पाटील ऊमरदरीकर, विजय मूडकर, भावी उमेदवार गिरगावकर यांच्या सौभाग्यवती शिवाजी कनकटे, गगारेडी कोटगिरे व देगलूर बिलोली नायगाव परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Forty retired members and two directors were felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त चाळीस सभासद व दोन संचालकचा सर्व साधारण सभेत सत्कार – NNL

Forty retired members and two directors were felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त चाळीस सभासद व दोन संचालकचा सर्व साधारण सभेत सत्कार – NNL

करियर, नांदेड
नांदेडl नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या ८ सप्टेंबर रोजी आयोजित सर्व साधारण सभेत मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु,सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त ४० सभासद व दोन संचालक यांच्या शाल श्रीफळ देऊन सप्तनीक सत्कार करण्यात आला. नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, गुलाम सादेक, मिर्झा बेग,डॉ.रईसौध्दीन,संभाजी कास्टेवाड, रमेश चवरे,रावण सोनसळे,लेखाधिकारी चन्नावार, सदाशिव पंतगे,कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे यांच्या सह मान्य वरांच्यी उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त सभासद श्रीमती पार्वती श्यामराव जाधव, गणेश शिंगे...
Departmental Science Drama : फुलकळस येथील जि .प.केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सासाठी निवड -NNL

Departmental Science Drama : फुलकळस येथील जि .प.केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सासाठी निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड, माणिक भिसे| पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची विभागीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२४ या स्पर्धेचे आयोजन जि. प. शिक्षण विभाग (माध्यमिक) यांनी कन्या प्रशाला परभणी येथे केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा फुलकळस या शाळेच्या 'जल है तो जीवन है' या विज्ञान नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. या विज्ञान नाट्याचे लेखन व दिग्दर्शन डॉ. सिद्धार्थ मस्के यांनी केले. या नाटीकेत प्रमुख भुमीकेत सत्यम शिराळे, समर्थ स्वामी, साईराज गव्हाळे, तनिष्का मोगरे, संध्या शिंदे, स्नेहल मिसाळ, मयुरी कुबडे, वैष्णवी पुरी ह्या विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेच्या विज्ञान शिक्षका अंजली रिंगणे यांनी केले. जिल्ह्यातून ही विज्ञा...
Ideal National Award : पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना “आयडियल नॅशनल अवॉर्ड “प्रदान -NNL

Ideal National Award : पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना “आयडियल नॅशनल अवॉर्ड “प्रदान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| जागतिक साक्षरता दिनानिमित्त छत्रपती राजे संभाजी प्रतिष्ठान व स्वराज्य सेवाभावी संस्था,नांदेड यांच्या वतीने दि.8 सप्टेंबर 2024 रविवार रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पात्र व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वजिराबाद भागातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळेच्या शेजारी असणार्‍या के. आर. एम. महिला महाविद्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जगदीश कदम, नांदेड महिला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, डॉ. हंसराज वैद्य, शिव प्रसाद राठी, लोट, साहित्यिक रुपाली वागरे,बालाजी कराळे, धम्मपाल हनवते आदी जण उपस्थित होते. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा "आयडियल नॅशनल अवॉर्ड" पुरस्कार हा पत्रकार शंकरसिंह ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,...
Voice of Media’s : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित -NNL

Voice of Media’s : नागेश पाटील कल्याण हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्य सेवा विशेष पुरस्काराने सन्मानित -NNL

नांदेड, करियर
नायगाव| साई शिर्डी च्या पावन भूमीत नुकतीच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या विश्वव्यापी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात ग्रामीण पत्रकार चळवळीतील व्हाॅईस ऑफ मीडिया चे नायगाव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांना सेवा कार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बीडच्या माजी खासदार प्रितम मुंडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी खासदार हेमंत पाटील, दै. देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पुढारी वृत्त वाहिनीचे प्रसन्न जोशी, राजश्रीताई पाटील, व्हाॅईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई काळे, , प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्यवाहक बालाजी मारगुड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, पंढरिनाथजी बोकारे, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, बाळासाहेब पांडे आदींसह संघटनेचे देश व विदेशातील पदाधिकारी सदस्य आणि राज्यभ...
error: Content is protected !!