Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL

Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात माहूर तालूक्यातील जि. प.उ.,प्रा,शाळा, ईवळेश्वर येथील पदविधर शिक्षक संजय बापूराव खडकेकर यांना दि.४ ऑक्टोबर रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन-२०२२ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल (भा. प्र.से.) यांच्या हस्ते खडकेकर यांना सपत्नीक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व ग्रंथ असे होते. यांच्या संपूर्ण विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक राष्ट्रीय कार्यातील असधारण योगदानाप्रीत्यर्थ तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील, निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्माती, शैक्षणिक व्हीडीओ निर्माती, विदयार्थ्या...
The launch of ‘Yuva Umed’ : अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युवा उमेद’चा शुभारंभ -NNL

The launch of ‘Yuva Umed’ : अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युवा उमेद’चा शुभारंभ -NNL

नांदेड, करियर
नांदेड| रोजगार व स्वयंरोजगाराची संधी शोधणाऱ्या इच्छूक मुला-मुलींना माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ नामक एक व्यासपीठ सुरु केले असून, या अभिनव उपक्रमाचा आज अर्धापूर येथे शुभारंभ करण्यात आला. सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अॅड. श्रीजया चव्हाण, सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, अॅड. सुभाष कल्याणकर उपस्थित होते. ‘युवा उमेद’ उपक्रमाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात रमेश पुणेकर यांनी भारतीय सैन्य दलातील विविध संधींविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ ही संकल्पना उलगडून सांगितली. 'मेहनत तुमची, मद...
Jagar program : नवभारत साक्षरता अभियान योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न -NNL

Jagar program : नवभारत साक्षरता अभियान योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अभियानांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे व शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत माहूरच्या बसस्थानकासह नवरात्र उत्सवातील नियंत्रण कक्ष टी पॉईंट आणि श्री रेणुका माता संस्थान येथे गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अभियानाचे माहूर तालुका समन्वयक संतोष चव्हाण यांचेसह केंद्रप्रमुख शिक्षक कर्मचाऱ्यांनी भिंतीपत्रक वाटून जनजागरण केले. जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत माहूर तालुका शिक्षण विभागाकडून केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता योजनांचा जागर कार्यक्रम अंतर्गत २१ प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून या नवभारत साक्षरता योजनांचा जागर अभियानाच्या मूळ उद्देशा पैकी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान महत्वपूर्ण जीवन कौशल्...
Prof. Dr. Manohar Bhandare : हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी –  प्रा.डाॅ.मनोहर भंडारे -NNL

Prof. Dr. Manohar Bhandare : हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी – प्रा.डाॅ.मनोहर भंडारे -NNL

करियर, नांदेड
लोहा| हिंदी भाषा देशभरातील लोकांना एकमेकांशी जाेडणारी एक महत्त्वपूर्ण संपर्क भाषा आहे. ही भाषा साहित्यिक दृष्टीने तर अत्यंत प्रगल्भ तर आहेच शिवाय ही भाषा रोजगाराच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे टंकलेखन, अनुवाद, गीतलेखन यांसारख्या क्षेत्रात हिंदी भाषेतूनअनेक रोजगार मिळतो आहे. असे प्रतिपादन प्रा.डाॅ.मनोहर भंडारे यांनी केले. लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालया च्या हिंदी विभागाच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक ‘मुंशी प्रेमचंद स्मृतिदिनानिमित्त’ ‘पुरस्कार वितरण व व्याख्यान कार्यक्रमाचे’ आयोजन महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ अशोकराव गवते याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला व्ही जी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख व्याख्याते म्हणून उदगीर येथील हावगी स्वामी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ.मनोहर भंडारे होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त...
Education Officer Dr. Savita Birge : शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या नांदेड येथील कारकीर्दस तीन वर्षे पूर्ण  -NNL

Education Officer Dr. Savita Birge : शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या नांदेड येथील कारकीर्दस तीन वर्षे पूर्ण -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या नांदेड येथील कारकीर्दस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा कार्यालयात सत्कार करण्यात आला. समग्र शिक्षाचे लेखाधिकारी परमेश्वर माळी, सहायक लेखाधिकारी श्रीपाद जोशी, उप शिक्षणाधिकारी संतोष शेटकार, प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, साहेब पांचाळ, रामदास वाघमारे, प्रकाश गोडणारे, प्रशांत सोनक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सविता बिरगे यांनी तीन वर्षात वैविध्यपूर्ण कामे केली आहेत. शालेय गुणवत्ता विकास, विद्यार्थी उपस्थिती जगण्यासाठी लोकसहभाग, शिक्षकांचे विविध प्रशिक्षणाद्वारा समृद्धीकरण, तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण, वेध भविष्याचा हा शैक्षणिक प्रयोग, ऑपरेशन गगन भरारी, चला शिकूया प्रयोगातून, एक तास वाचनाचा असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग जिल्हा परिष...
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ कोर्ससाठी नोंदणी सुरु – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ कोर्ससाठी नोंदणी सुरु – NNL

करियर, नांदेड
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुल आणि पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या रोजगारभिमुख अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. या कोर्ससाठी देश पातळीवरील नामांकित संस्था एफटीआयआय तील अध्यापक रितेश ताकसांडे साधन व्यक्ति म्हणून लाभणार आहेत. या कोर्समध्ये प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून कथा सांगण्याचे कौशल्य शिकविण्यात येणार आहे. सहभागींना प्रॅक्टिकल प्रशिक्षण, विविध तंत्रज्ञानाचा वापर याबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे युवकांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल आणि त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी ...
Mukhed Taluka Marathi Journalist Sangha ; मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड सचिवपदी संतोष बेळगे कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची निवड- NNL

Mukhed Taluka Marathi Journalist Sangha ; मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड सचिवपदी संतोष बेळगे कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची निवड- NNL

करियर, नांदेड
मुखेड | मुखेड तालुका मराठी पत्रकार परिषदची २०२४ - २०२५ सालाची कार्यकारणी दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी जेष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. यात मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड, सचिवपदी संतोष बेळगे, कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, माजी अध्यक्ष शिवाजी कोणापुरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील पौळकर, माजी अध्यक्ष किशोर संगेवार, ज्येष्ठ पत्रकार सुशील पत्की, ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शिवकांत मठपती, , प्रसिद्ध छायाचित्रकार हाफिजखान पठाण हे सल्लागार पदी असतील व आगामी काळात वेळोवेळी मार्गदर्शन करून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी आवाज उठविण्याचे या बैठकीत ठरले. या निवडीबद्दल सर्वच कार्यकारिणीचे राजकीय , सामाजि...
Police officer won ; पोलीस अंमलदाराने जलतरण स्पर्धेत पटकावले तीन सुवर्ण व दोन रजत पदक – NNL

Police officer won ; पोलीस अंमलदाराने जलतरण स्पर्धेत पटकावले तीन सुवर्ण व दोन रजत पदक – NNL

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स अॅक्वेटीक असोसियशन यांच्या तर्फे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा दिनांक 21.09.2024 ते दिनांक 22.09.2024 दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात नांदेड पोलीस दलातील जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर, पोलीस हवालदार यांनी सहभाग घेवुन सदर स्पर्धेत 50 मीटर बटर फ्लाय, 4X50 मीटर मिडले रिले. 4X50 मीटर फ्रिस्टाईल रिले मध्ये तीन सुवर्ण व 100 मीटर बटर फ्लाय, 50 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत दोन रजत पदक पटकावले आहेत. सदर स्पर्धेत मुंबई, नागपुर, कोल्हापुर, पुणे, नाशिक, अमरावती, नांदेड सह इतर जिल्हयातुन 550 खेळाडुनी भाग घेतला होता. सदर अंमलदार यांना कवयात निर्देशक व क्रिडा प्रमुख संतोष सोनसळे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे. या अंमलदारांनी उत्कृष्ट जलतरण पटु म्हणुन नांदेड पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे. म्हणुन मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी योग्य ते...
Yuva gramin reporter union ; युवा ग्रामिण पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड -NNL

Yuva gramin reporter union ; युवा ग्रामिण पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर। संपुर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सातत्याने झगडणाऱ्या,युवा ग्रामिण पञकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीवेळी जिल्हा व तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.  तळागळातील पञकारांना व संघटनेतील नवीन सदस्यांना संधी मिळावी,या उद्देशाने युवा ग्रामीण पत्रकार संघटना प्रयत्न करत असते.त्याचाच हा भाग म्हणून दि.६ ऑक्टोंबर २०२४ रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य कार्तिक बेहेरे,जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे, मार्गदर्शक व सल्लागार म्हणून विनोद कांबळे सर,गोपाल खापर्डे, समाधान कांबळे, आदेश बेहेरे, गोपाल नाईक, रफिक शेख, ईसा सय्यद, प्रवीण बर्डे, सोनू राठोड  व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. ...
Abhijat ; मराठीच्या ‘अभिजात’साठी अभिनंदनाचा ठराव सप्तरंगी साहित्य मंडळाची विशेष बैठक संपन्न – NNL

Abhijat ; मराठीच्या ‘अभिजात’साठी अभिनंदनाचा ठराव सप्तरंगी साहित्य मंडळाची विशेष बैठक संपन्न – NNL

नांदेड, करियर
नांदेड | येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या निमित्ताने मंडळाच्या उपकार्यालयात एक विशेष बैठक घेऊन या बैठकीत सदरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी मोहनराव कुंटुरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शरदचंद्र हयातनगरकर, गजानन हिंगमिरे तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांची उपस्थिती होती. शहरातील मालेगाव रोड स्थित पवननगर येथील मंडळाच्या उपकार्यालयात सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सप्तरंगी साहित्य मंडळाची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी होती. या संब...
error: Content is protected !!