Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

World Skills Competition ; राज्य व जिल्हास्तरीय जागतिक कौशल्य स्पर्धा 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड, करियर
नांदेड| जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांसाठी कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखी आहे. ही स्पर्धा 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन 30 सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त, डॉ.राजपाल कोल्हे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सेक्टर स्किल कौन्सिल विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्...
Chief Minister Devendra Fadnavis  : मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

Chief Minister Devendra Fadnavis : मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

करियर, मुंबई
मुंबई| मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बळ द्विगुणित झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुकचे प्रकाशन करण्यात आले. या पुरस्कार सन्मानाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. जेव्हा आपल्या हातून एखादे सत्कार्य घडते, तेव्हा त्याचा गौरव स्वीकारावा असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पत्रकार संघाचे आणि संपादक मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. हा सोहळा...
OBC Bhushan Award : रामचंद्र येईलवाड ओबीसी भूषण पुरस्काराने सन्मानित

OBC Bhushan Award : रामचंद्र येईलवाड ओबीसी भूषण पुरस्काराने सन्मानित

करियर, नांदेड
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांना ओबीसी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड येथील विसावा हॉटेलमध्ये ७ सप्टेंबर रोजी भारतीय पिछडा शोषित संघटना, नांदेड तर्फे मंडळ जयंती निमित्त सकल ओबीसी समाज जिल्हा नांदेडच्यावतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. येईलवाड हे कैलासवासी माजी खासदार शरद जोशी यांचे एका काळचे कट्टर समर्थ त्यांच्या कार्याची सुरुवात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झाली. शेतकरी संघटनेची जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशा विविध पदावर त्यांनी कंधार तालुक्यात यशस्वी कामगिरी बजावली आहे. शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. राज्यातील ओबीसी समाजातील, बलुतेदार व अठरा पगड जाती तसेच भटक्या सम...
Bus service : औराळा-सुजलेगाव-नायगाव-नरसी बससेवा पुन्हा सुरू – ग्रामस्थांत आनंद

Bus service : औराळा-सुजलेगाव-नायगाव-नरसी बससेवा पुन्हा सुरू – ग्रामस्थांत आनंद

करियर, नांदेड
औराळा (प्रतिनिधी) अनेक वर्षांपासून बंद असलेली औराळा–सुजलेगाव–नायगाव–नरसी बस सेवा खासदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू झाली आहे. या बस सेवेच्या आगमनाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बससेवेच्या शुभारंभप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक सुर्यकांत दमकोंडावार, हाणमंत सोमवाड, पोशट्टी कानगुले, माजी सरपंच नारायण पांचाळ, माधव पांचाळ, मनोहर पांचाळ यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले. यावेळी बस चालक श्री. कदम यांचा सत्कार माजी सरपंच सोपान गायकवाड यांनी केला. गावात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बससेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी खासदार चव्हाण यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी साईनाथ पा. पांढरे (उपसरपंच औराळकर) तसेच मौजे औराळा येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Dr vrishali kinhalkar : विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे – कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर

Dr vrishali kinhalkar : विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे – कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर

नांदेड, करियर
नांदेड (प्रतिनिधी) “विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन, अभ्यास, व्यायाम करून निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. मोबाईलचा वापर एक तासापेक्षा जास्त वेळ करणे टाळावे. विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. श्री शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर, नांदेड यांच्या वतीने आयोजित मातोश्री स्व. सौ. सुलोचनाताई गुरुनाथराव कुरूडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा. वैजनाथराव कुरूडे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुरूडे, उपमुख्याध्यापक सदानंद नळगे, डॉ. मधुकर शिंदे, प्रा. वसंत राठोड, सय्यद जमील, सत्यवान पारेकर, आर. सी. गायक...
CITU ; सीटूच्या शिष्टमंडळाने सीईओ मेघना कावली यांची घेतली भेट ; कार्यमुक्त केलेल्या ४० कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे दिले आश्वासन

CITU ; सीटूच्या शिष्टमंडळाने सीईओ मेघना कावली यांची घेतली भेट ; कार्यमुक्त केलेल्या ४० कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे दिले आश्वासन

नांदेड, करियर
नांदेड l सीटू संलग्न मजदूर युनियनचे सभासदत्व स्वीकारलेल्या नागरी आरोग्य वर्धनी केंद्रातील परिचर व सफाई कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती देशमुख यांच्या स्वाक्षरीने कार्यमुक्त करण्याचे पत्र काढण्यात आले होते. संबंधित बाह्य संस्थेचे कंत्राट संपल्यामुळे कार्यमुक्त करण्याचे आदेशात नमूद आहे. परंतु मागील ७ महिन्याचे मानधन थकीत असल्यामुळे सदरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार कायद्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना रोजनंदारी वेतणावर रुजू करण्यात यावे व मागील वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी सीटू कामगार संघटनेच्या वतीने दि, ८ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्रीमती मेघना कावली यांच्याकडे प्रत्यक्षात भेटून करण्यात आली आहे. यावेळी चर्चा करण्यात आली असून सीईओ कावली यांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार...
Chandraprakash Deglurkar : चर्मकार समाजातर्फे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा ओबीसी मित्र पुरस्काराबद्दल सत्कार

Chandraprakash Deglurkar : चर्मकार समाजातर्फे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा ओबीसी मित्र पुरस्काराबद्दल सत्कार

करियर, नांदेड
नांदेड| भारतीय पिछडा शोषित संगठन व ओबीसी समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना ओबीसी मित्र पुरस्कार रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी विसावा हाॅटेल नांदेड येथे प्रदान करण्यात आला. याबद्दल चर्मकार समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त (छ. संभाजीनगर) व चर्मकार समाज भूषण बालाजीराव सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या व्यापक बैठकीत हा भव्य सत्कार करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी विठ्ठलराव कांबळे हे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे यांनी या बैठकीचे संयोजन केले होते. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व्यंकटराव उतकर, अशोक लाठकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरे, जमनाजी डोंगरे, शिवानंद जोगदंड, नरसिं...
District OBC Bhushan Award ; जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव

District OBC Bhushan Award ; जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव

नांदेड, करियर
नांदेड l भारतीय पिढीगत शोषित संघटना, जिल्हा नांदेड तर्फे आयोजित व भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वीकारकर्ते आई सुमनबाई भानुदास यादव व सुपुत्र डॉ. कैलास भानुदास यादव होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंजी. लक्ष्मणराव लिंगापुरे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिलीप बनसोडे, मा. बालाजी एबितदार, मा. नामदेवराव ऐलवाड, मा. संभाजीराव धुलगंडे, मा. नंदकुमार कोस्बतवार, मा. विश्वनाथ कोलमकर, प्रो. डॉ. आर.डी. शिंदे तसेच इंजी. चंद्रप्रकाश गंगाधर उपस्थित होते. नांदेड येथील हॉटेल विसवा, शिवाजीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातील ओबीसी समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून ओबीसी समाजा...
Degree under ‘AEDP’ : ‘एईडीपी’ अंतर्गत पदवी म्हणजे उज्वल भविष्य – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

Degree under ‘AEDP’ : ‘एईडीपी’ अंतर्गत पदवी म्हणजे उज्वल भविष्य – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

करियर, नांदेड
नांदेड| आजच्या युगात पदवी पेक्षा कौशल्याला जास्त महत्त्व आहे. त्यामध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी संबंधित उद्योग जगतात प्रत्यक्षात प्रशिक्षण घेतले तर कित्येक पटीने चांगले. एईडीपी (व्यावसायाधिष्ठित पदवी अभ्यासक्रम) या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच कौशल्य आधारित पिढी घडविणे असा आहे. त्यामुळे निश्चितच एईडीपी अंतर्गत घेतलेली पदवी म्हणजे उज्वल असे भविष्य आहे, असे मत कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते आज दि.४ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील आधीसभा सभागृहात एईडीपी अंतर्गत सुरू केलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात बोलत होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन, राज्य एईडीपी समितीचे अध्यक्ष डॉ भारत अमाळकर, एईडीपी प...
Scholarship Scheme : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Scholarship Scheme : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

करियर, नांदेड
नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. तरी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/ विनाअनुदानीत/कायम विनाअनुदानीत महाविद्यालयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झालेले आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये या योजनांबाबत जनजागृती करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. तसेच महाविद्यालयाच्या स्तरावर असलेले शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या शैक्षणिक व...
error: Content is protected !!