Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Inter-state food ; राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम – NNL

Inter-state food ; राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊ...
Salam Kisan’s  : सलाम किसानचा शेतकरी सक्षमीकरण उपक्रम -NNL

Salam Kisan’s : सलाम किसानचा शेतकरी सक्षमीकरण उपक्रम -NNL

कृषी
मुंबई| सलाम किसान या अग्रगण्य कृषी-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने आपले स्वातंत्र्यदिन अभियान राबवले. यामध्ये शेतकरी सक्षमीकरणाच्या अनेक प्रभावी कृषी उपक्रमांचा समावेश होता. या अभियानात ड्रोन पायलट्स, शेतकरी कौशल्य विकास उपक्रम तसेच शेतकऱ्यांना स्थानिक नेते व कृषीतज्ज्ञांशी जोडून देणाऱ्या समुदाय समारंभांचा समावेश होता. ग्रामीण समुदायांमध्ये अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याप्रती तसेच तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन व सहयोगाला प्रोत्साहन देऊन भारतीय कृषीक्षेत्राचा कायापालट करण्याप्रती सलाम किसानची बांधिलकी दिसून आली. या अभियानाचा एक भाग म्हणून सलाम किसानने नाशिकमध्ये १० ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान आठ दिवसांचे श्री गगनगिरी कृषी प्रदर्शन प्रायोजित केले. प्रदर्शनादरम्यान कंपनीचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे, परेश कुल्लरकर, सुमित मुंगले, विक्रम थेटे व ड्रोन पायलट शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना सलाम किसान सेवांबद्दल म...
Naigaon Tehsil Office : दि.२२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा नायगांव तहसील कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा -NNL

Naigaon Tehsil Office : दि.२२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा नायगांव तहसील कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील नायगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आलेला आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरले आहे. राज्यकर्ते जातीपाती व धर्मामध्ये सामान्य जनतेचे भांडणे लावून शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व शेतकरी पुत्रांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे द्यावे यासाठी पक्षविरहित,पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊन शेतकरी- शेतमजूर हक्क समितीच्या वतीने दि.२२ ऑगस्ट गुरुवारी सकाळी १० वाजता हेडगेवार चौकातून नायगाव तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये पुढील मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत १) ई -पीक पाहणी नोंद रद्द करून सरसकट कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे ५ हजार रुपये देण्यात यावे. २) खरीप हंगाम २०२३ काळातील पिक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. ...
Give direct subsidy to smallholder farmers : रिठा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या -NNL

Give direct subsidy to smallholder farmers : रिठा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या -NNL

नांदेड, कृषी
किनवट, परमेश्वर पेशवे| रिठा ,रिठा तांडा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ऑनलाईन नोंद न केलेले व ई पीक पाहणी करून सुद्धा कापूस, सोयाबीन अनुदान यादी मध्ये नावच समाविष्ट झाले नसून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे. ईस्लापूर परिसरातील रिठा व जलधारा येथील शेतकरी हे आदिवासी बहुल भागात राहत असून बरेच शेतकऱ्याकडे अँनड्रॉइड मोबाईल नसल्याने व काही शेतकरी अशिक्षित असल्याने बरेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असून काही शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन ई पीक पाहणी केली परंतु या शेतकऱ्याची देखील नावे यादीत नाही. त्यामुळे शासनाने सरसकट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. अशी जोरदार मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. दि. 16 ऑगस्ट रोजी या दोन्ही गावच्या शेतकऱ...
Cotton, soybean farmers : खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

Cotton, soybean farmers : खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप, पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रुपये 5 हजार (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ...
Collector Abhijit Raut : मनरेगा अंतर्गत फळझाड, फुल पीक लागवड कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार -NNL

Collector Abhijit Raut : मनरेगा अंतर्गत फळझाड, फुल पीक लागवड कार्यक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अमृत महोत्सवी फळझाड व फुल पीक लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि बांधावर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शेतकऱ्यांना या योजनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सात लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे, ज्यामुळे त्यांची शेती अधिक समृद्ध होईल आणि उत्पादनात वाढ होईल. विशेषतः बांबू लागवडीसाठी दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या व्यवस्थापनात नव्या पद्धतींचा वापर करण्यास आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करेल. एक हेक्टर मध्ये 3×3 पद्धतीने लागवड केल्यास अकराशे अकरा बाबू रोपे बसतात नरेगा मधून 4 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना 7 ल...
33 sheep died after mistaking water for drinking chemicals : पाणी समजून केमिकल पिऊन ३३ मेंढ्या दगावल्या; दाभड पाटीजवळ घडली घटना -NNL

33 sheep died after mistaking water for drinking chemicals : पाणी समजून केमिकल पिऊन ३३ मेंढ्या दगावल्या; दाभड पाटीजवळ घडली घटना -NNL

कृषी, नांदेड
नांदेड। नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावर दाभड पाटी नजीक रस्त्याने जाणाऱ्या मेंढ्यानी पाणी समजून वाहनात भरण्यात येणारे युरिया मिस्कीड लिक्विड तथा केमिकल पील्याने ३३ मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यात दोन मेंढपाळाचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील देगाव (कु.) येथील मेंढपाळ रामकीशन भुजाजी बेळगे व योगेश मारोती वटे हे आपल्या जवळपास ३०० च्या वर मेंढ्या चारून दुपारी चार वाजताच्या सुमारास मुक्कामाच्या स्थळी घेऊन जात होते. प्रदूषण होऊ नये म्हणून रस्त्यावर ठेवण्यात आलेले युरिया मिक्सिड लिक्विड हे वाहनामध्ये भरले जाते. ते टाकीत भरत असताना दुकानपुढे जमिनीवर सांडले. हेच लिक्विड पाणी समजून ३३ च्या वर मेंढ्यांनी पिले. पंधरा ते वीस फूट पुढे चालल्यानंतर एका पाठोपाठ एक मेंढ्या मरत गेल्या. यात रामकीशन भुजाजी बेळगे यांच्या २० मेंढ्या तर योगेश मारोती वटे यांच्या १३ में...
What to do after poisoning while spraying? How to control pink bollworm? : फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ? गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ? -NNL

What to do after poisoning while spraying? How to control pink bollworm? : फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ? गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ? -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रण कसे करावे यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्ह वरून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गुलाबी बोंडअळीची जीवन साखळी तोडल्याशिवाय त्यावर पुर्णत: नियंत्रण मिळणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषि विभाग तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी शिफारस केलेल्या औषधाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मौ. नांदुसा येथे संजय कोंडीबा जनकवाडे यांच्या शेतात किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली. हा क...
Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL

Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL

नांदेड, कृषी
उस्माननगर। काटकळंबा येथे संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या सहयोगातून पशुधन पंधरवडाच्या निमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँके - नाबार्ड यांच्या सहाय्याने एकात्मिक पाणलोट प्रकल्पाच्या अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सध्या पावसाळा हंगाम असल्यामुळे वातावरणात बदल झाले आहे त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये विविध आजाराची लक्षणे जाणवू लागली आहेत, तसेचअनेक पशुमध्ये वंधत्व आढळून येत आहे या व जनावरांच्या इतर समस्या निवारण उपाययोजना करून आजरांचे निदान करणे आवश्यक होते.तसेच गावातील अनेक जनावरांना गोचीड, गोमाशी व गुद्दी येणे हा आजार पसरला होता या सर्व रोगाचे निदान व्हावे व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पशुपालकांना आधार व्हावा या उद्देशाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पशुवैद्यक दवाखाना क...
online e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान द्यावे…. – NNL

online e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान द्यावे…. – NNL

Blog, कृषी, नांदेड
किनवट /परमेश्वर पेशवे | ऑनलाईन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून कापूस व सोयाबीन उत्पादक सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान मंजूर करावे असे लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिष्ठमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दि 12 ऑगस्ट रोजी दिले असून ऑनलाईन पेऱ्याची नोंद न केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित ठेवल्यास माजी आ प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांनी दिला आहे. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीकाच्या अनुदानासाठी शासनाने ऑनलाईन ई पीक पेऱ्याची अट घालून दिली आहे.परंतु किनवट माहूर सारख्या मागास दुर्गम व आदिवासी तालुक्यातील हजारो शेतकरी त्यांच्या कापूस व सोयाबिन पिकांची ऑनलाइन नोंदणी करू शकले नाहीत. सन 2023 -24 या हंगामात ई पीक पेरा नोंद केलेल्या ...
error: Content is protected !!