green and yellow mosaic disease on soybean : सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक(केवडा) रोगाचे व्यवस्थापन -NNL
नांदेड,अनिल मादसवार| सद्यास्थितीत मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस या विषाणूंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. पुढीलप्रमाणे रोगाची लक्षणे ओळखुन एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे.
रोगाची लक्षणे :- हिरवा मोझॅक : यामध्ये झाडाची पाने ही जाडसर, आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पा...









