नांदेड । पोलिस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांकडून बुलडोजरचा वापर करून तीन दारु विक्रीचे पत्राचे शेड, दोन मटका बुकीचे शेड व इतर 12 पानपट्टी व पत्राचे शेड अतिक्रमण काढले आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयाचे ठिकाणारवर कार्यवाही करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 04/01/2025 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत मौजे बळीरामपुर चौक आणि बळीरामपुर मुख्य रस्ता व अंतर्गत रस्स्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले होते.
अशाच पध्दतीने पान टपऱ्या , पत्राचे शेड उभारुन त्याच्या मध्ये अवैध दारू विकणे, मटका ,बुकी चालवणे, जुगार चालवणे, प्रतिबंधीत गुटखा विकणे, तंबाखू विकणे अशा प्रकारचे अवैध व्यवसाय चालू होते. अनेक वेळा गुन्हे दाखल करुनही त्यांच्यावर फरक पडत नव्हता, रोडच्या लगत पानपट्टी टाकून, पत्राचे शेड उभारुन अवैधपणे त्या ठिकाणी लोकांना गोळा केले जात होते. गुन्हेगार वृत्तीचे व व्यसनाधीन आरोपी अशा ठिकाणी बसुन गोळा होऊन , गुन्हे करण्याचे नियोजन करत होते . अशा ठिकाणी बसुन आपआपसात झगडे, भांडण करुन वाद करुन घेत होते.
मागील आठवड्यामध्ये पाच ठिकाणी गुन्हेगार एकत्र येवून त्यांच्यात वाद होऊन तीन सराईत गुन्हेगारांनी मिळून एका गुन्हेगाराचा खून केला होता, गुन्हेगारावर प्रतिबंध बसाया गुन्हेगारी वृत्तीचे लोकांचे बसण्या उठण्याचे ठिकाणे व्यसन करण्याचे ठिकाणे समूळ पणे नष्ट करुन गुन्हेगार वृत्तीच्या मुळापर्यंत जाऊन अवैध धंदयाचा दार, मटका याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचे उद्देशाने व गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी एम आय डी. सी. कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन त्यांची मदत घेवून अतिक्रमण मोहीम राबवली यामध्ये आज रोजी तीन दारु विक्रीचे पत्राचे शेड, दोन मटका बुकीचे शेड, व इतर 12 पानपट्टी व पत्राचे शेड काढण्यात आले.
सदरची कामगिरी अबिनाश कुमार ( पोलिस अधीक्षक नांदेड) , खंडेराय धरणे ( अप्पर पोलीस अधीक्षक भोकर) , सुरज गुरव ( उपविभागीय पोलिस अधीक्षक नांदेड) , सुशिलकुमार नायक , ( उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग इतवारा नांदेड). , अतिक्रमण काढण्यासाठी परिश्रम घेणारे अधिकारी ओमकांत चिंचोलकर ( पोलिस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण) , विजयकुमार कांबळे , मांटे सपोउपनि , बाबुराव चव्हाण , ज्ञानेश्वर मटवाड , यांच्या सह अनेक अधिकाऱ्याचे शेड काढण्यात आले , सदरची कामगिरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.