HomeनांदेडDhamma Parishad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर -NNL

Dhamma Parishad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर -NNL

हिमायतनगर/नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून निवड समितीचे प्रमुख डॉ. प्रमोद अंबाळकर, डॉ. पुंडलीक नामवाड, प्राचार्य प्रताप नरवाडे, सुशीलकुमार भवरे यांनी माहिती दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा एकदिवसीय 8 वी बौद्ध धम्म परिषद हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे आयोजित करण्यात आली असून यावर्षी 24 जानेवारी रोज शुक्रवारी धम्म परिषद होणार आहे. या बौद्ध धम्म परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार प्राप्त मान्यवर अ‍ॅड. विजय गोणारकर, प्रा.डॉ. अनंत राऊत (नांदेड), अभियंता एस.एस. जवळेकर, पी.डी. गायकवाड, सौ. वंदना सुर्वे, पी.एन. डोंगरे, राजाराम वाघमारे, डॉ. रेखाताई चव्हाण, पत्रकार श्याम पुरभाजी कांबळे, आदित्य कांबळे, जयप्रकाश वाघमारे, शिवप्रसाद मठवाले (कळमनुरी), उद्धव मोकळे, अभि. दिलीप धुळेकर, पत्रकार हमीदखाँ पठाण भोकर, संजयभाऊ निवडंगे, डॉ. सचिन जाधव आ. बाळापूर, रोहितसेठ शास्त्री अडकटलवार, गणेशराव कदम दिघीकर, पत्रकार गौतम वाठोरे यांना देण्यात येणार आहेत.

धम्म परिषदेचे उद्घाटन खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार असून परिषदेच्या अध्यक्षस्थानी मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर हे राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. मोहन मोरे, सहस्वागताध्यक्ष मा. रफिकभाई शेठ, निमंत्रक कैलासभाऊ माने, जोगेंद्र नरवाडे कामारीकर, सुधाकर पाटील सोनारीकर, बालाजी राठोड तर विशेष अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील मा.ना. हेमंतभाऊ पाटील, खा. रविंद्र चव्हाण, मा.खा. सुभाषराव वानखेडे, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. भीमराव केराम, आ. बालाजीराव कल्याणकर आदी मान्यवरासह उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, अति. मुकाअ. एस.जी. माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपविभागीय पोलिस अधिकारी शफाकत अमना, सहाय्यक वनसंरक्षक बी.एन. ठाकुर, तहसीलदार पल्लवीताई टेमकर, पोलीस निरीक्षक अमोल भगत, के.डी. देशमुख, कार्यकारी अभियंता एस.के.शिदे उप अभियंता विजय काबळे, निवेदक उतम कानिदे, मंगेश दादा कदम यांची उपस्थिती लाभणार आहे.

या एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेकरीता संयोजन समितीचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे, डॉ. मनोज राऊत, कानबा पोपलवार, अनिल मादसवार, लक्ष्मणराव मा. भवरे, आनंदा जळपते, शिवाजी डोखळे, नागोराव मेंडेवाड, अविनाश कदम, परमेश्वर वालेगावकर, जळबा जळपते, केशव माने, डॉ. किशोर भगत, किरण वाघमारे, पांडूरंग मिरासे, नागनाथ वच्छेवार, जयभीम पाटील, शेख खयुम यांच्यासह आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments