Dhamma Parishad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर -NNL
हिमायतनगर/नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून निवड समितीचे प्रमुख डॉ. प्रमोद अंबाळकर, डॉ. पुंडलीक नामवाड, प्राचार्य प्रताप नरवाडे, सुशीलकुमार भवरे यांनी माहिती दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा एकदिवसीय 8 वी बौद्ध धम्म परिषद हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे आयोजित करण्यात आली असून यावर्षी 24 जानेवारी रोज शुक्रवारी धम्म परिषद होणार आहे. या बौद्ध धम्म परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार प्राप्त मान्यवर अॅड. विजय गोणारकर, प्रा.डॉ. अनंत राऊत (नांदेड), अभियंता एस.एस. जवळेकर, पी.डी. गायकवाड, सौ. वंदना सुर्वे, पी.एन. डोंगरे, राजाराम वाघमारे, डॉ. रेखाताई चव्हाण, पत्रकार श्याम पुरभाजी कांबळे, आदित्य कांबळे, जयप्र...
