नांदेड| सन २००६ मध्ये झालेल्या नांदेड बॉम्ब ब्लास्टचा निकाल नुकताच लागला असून, त्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
तत्कालीन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री फतेहसिंह पाटील यांनी फटाक्याचा स्फोट होता असे ६ एप्रिल २००६ रोजी जाहीर केले होते. परंतु माझे पती कॉ.गंगाधर गायकवाड माकप नेते यांनी एस.पी. फतेहसिंह पाटील यांच्या उत्तराचे खंडन करीत तेव्हा सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद केंद्रात लक्षवेधी असल्यामुळे तात्काळ सीबीआय चौकशी लावण्यात आली होती. आणि संशयित आरोपीताना अटक करून,कारागृहात राहावे लागले होते. तब्बल १९ वर्षांनी या नांदेड बॉम्ब स्फोटाचा निकाल लागला असून सर्व आरोपीना माननीय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
त्यापैकी प्रमुख आरोपीची निवासस्थाने ही कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या घरा शेजारी असल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या मन दुखावलेल्या किंवा त्यांच्या आप्त मित्राकडून त्यांना धोका होऊ शकतो म्हणून कॉ. गंगाधर गायकवाड यांना तातडीने विनाशुल्क पोलीस संरक्षण द्यावे अशी विनंती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक मा.अबीनाश कुमार यांच्याकडे मी लेखी स्वरूपात करणार असल्याचे कॉ. लता गायकवाड यांनी कळविले आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
कॉ.लता गायकवाड ह्या कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या पत्नी असून त्या देशातील सर्वात मोठी महिला संघटना जमसं च्या जिल्हाध्यक्षा व माकपच्या तालुका कमिटी सभासद आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जातीय द्वेष्यातून यापूर्वी देखील त्रास झाला असून द हिंदू ने तेव्हा त्यांच्या प्रकरणास वाचा फोडली होती. ते अनुसूचित जातीचे आहेत म्हणून त्यांना याच क्षणी शस्त्रधारी अंगरक्षक देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)