नांदेडक्राईम

Bhokar Police Action : भोकर पोलिसांची धडक कारवाई; अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

एक जेसीबी मशीन, एक ट्रॅक्टर आणि मुरूम पकडला

नांदेड /भोकर | तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाविरोधात भोकर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील कांडली परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून अचानक छापा टाकला. यावेळी एका नाल्यातून कोणतीही परवानगी न घेता उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले.

कारवाई दरम्यान पोलिसांनी एक जेसीबी मशीन, एक ट्रॅक्टर आणि मुरूम असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित वाहनचालक व मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात जेसीबी मालक पेंताजी पुंडलिक एडलवार (रा. कांडली) तसेच ट्रॅक्टर मालक व चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. दरम्यान, तालुक्यात अवैध खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे संबंधितांवर चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!