Bhokar Police Action : भोकर पोलिसांची धडक कारवाई; अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड /भोकर | तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाविरोधात भोकर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील कांडली परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांनी सापळा रचून अचानक छापा टाकला. यावेळी एका नाल्यातून कोणतीही परवानगी न घेता उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले.
कारवाई दरम्यान पोलिसांनी एक जेसीबी मशीन, एक ट्रॅक्टर आणि मुरूम असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित वाहनचालक व मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात जेसीबी मालक पेंताजी पुंडलिक एडलवार (रा. कांडली) तसेच ट्रॅक्टर मालक व चालकांवर कारवाई करण्यात आली आहे....
