HomeBlogयूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य...

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य -NNL

मुंबई| केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही दि. १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्राची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० (पेपर – ०१) आणि दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी २.३० ते ४.३० (पेपर – ०२) अशी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वीच निर्गमित केलेल्या ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या लेखी सूचनेनुसार परीक्षार्थींनी आपल्या नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास (३० मिनट) अगोदर हजर राहणे अनिवार्य केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थींनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर अर्धा तास (३० मिनिट) अगोदर उपस्थित रहावे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments