नांदेडराजकीय

Bhimrao Keram : भाजपाकडून पुन्हा विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी किनवट माहूर मतदार संघातून विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे स्पष्ट होताच किनवट-माहूर मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला आहे.

किनवट-माहूरमतदारसंघातून महायुतील भाजपा पक्षासह घटक पक्षातील अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे रेटून प्रयत्न केला त्यात शिंदे गटाकडून ही मोठी रस्सीखेच चालू असल्याची चर्चा होती. परंतु विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी उमेदवारी मिळविण्यात अखेर यश मिळवले आहे.

IMG 20241020 WA0025 Bhimrao Keram : भाजपाकडून पुन्हा विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर -NNL

प्रचाराला कमी कालावधी असल्याणे लवकरच आता प्रचाराची रणधुमाळी चालू होणार असून जनतेचा कल कोणाकडे राहणार आहे. काही दिवसातच समजेल.अशातच महाविकास आघाडीने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसून यामध्ये माजी आमदार प्रदीप नाईक व उबाठाचे ज्योतिबा खराटे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून महाविकास आघाडी माञ उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार याकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!