नांदेडक्राईम

Saponi Ghogre ; स्थागुशाचे सपोनि घोगरे व त्यांची टीम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी

नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कौठा परिसरात सराईत तिनं गुन्हेगार एका गाडीतून अग्नी शस्त्र बाळगून जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोगरे व पथक पकडण्यासाठी येत असल्याचे पाहून गाडी अंगावरून घालून पळून जाऊन ईतर वाहनांना धडक देऊन जात असताना सपोनी घोगरे यांनी टायर वर गोळ्या झाडल्या तरीही संबंधित आरोपी असरजन शिवारात गाडी सोडून अंधारात पळून गेले असुन या प्रकरणी संबंधित गाडी जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी काढलेलया प्रसिद्धी पत्रकात,तीन सराईत आरोपी त्यापैकी एकजण गुन्ह्यामद्ये वॉन्टेड असलेला आरोपी हा नांदेड मध्ये आला आहे व त्यांच्याकडे अग्निशास्त्र असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावर, वरील टीम यांनी त्यास कवठा भागामध्ये गाठले, ते विना नंबर काळ्या टाटा हरियर गाडीमध्ये होते, पोलीसाची गाडी समोरासमोर लागलेली आहे व पोलीस त्याला पकडण्यासाठी येत आहेत हे पाहून त्यांनी पोलीस टीम वर प्राण घातक हल्ला करून अंगावर गाडी घालून ठार मारून पुढे निघून जाण्याच्या उद्देशाने समोर आल्याने पोलिस अमलदार बोधगिरे यांना गाडीची धडक देऊन त्यांना जखमी केले.

रस्त्याने ये जा करणाऱ्या इतर टू व्हीलर चालकास धडक देऊन पाडले, त्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि स्वसंरक्षणार्थ सपोनी घोगरे यांनी त्यांच्या पिस्टल मधून गाडीच्या टायरवर फायर केला त्यामध्ये टायर फुटला, तरी आरोपी यांनी तशीच गाडी रवी नगर चौकाकडे गाडी घेऊन पळाले, वरील टीम यांनी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देऊन ठिकठिकाणी नाका बंदी लावली व वरील टीम व ग्रामीण पोलीस यांनी सदर गाडीचा पाठलाग करून शोध घेतला, सदर आरोपींनी असर्जन गावाच्या पुढे पांदन रस्त्यावर सदरची गाडी सोडून त्या ठिकाणावरून अंधारात जंगलामध्ये पळ काढला, आरोपितांची घटनेतील गाडी जप्त करण्यात आली असून ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थागुष्याच्या तीन टीम आरोपीचा शोध घेत आहेत.

ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण हद्दीत नाकेबंदी करण्यात आली होती. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक घोगरे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बि.एन.एस 109,49,132,121(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय कांबळे करत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button