HomeनांदेडJoin Congress : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Join Congress : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ऐन हंगामात खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील अनेकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते, माजी उपमहापौर आनंद चव्हाण , माजी अब्दुल गफूर ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्रामीण अतुल पेदेवाडा , NSUI जिल्हाध्यक्ष सुरज शिंदे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश पाटील कोकाटे , डॉ. विठ्ठल पावडे , काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष महेश देशमुख, माजी नगरसेवक सुरेश हटकर ब्लॉक अध्यक्ष प्रभारी संजय वाघमारे, भीमशक्ती शहराध्यक्ष संजय कवठेकर , कार्यालयीन सचिव प्रकाश दिपके, आदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सचिव गजानन कल्याणकर , शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक दिगंबर कल्याणकर ,रवी कल्याणकर, गोविंद जाधव, आकाश जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी मधील अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा वाढते आहे. निवडणुकीच्या हंगामातच काँग्रेसमध्ये सत्ताधारी शिवसेनेतील शहर संघटनासह अनेक तरुण पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात शिवसेनेतील आणि सत्ताधारी पक्षातील अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश निखाते आणि व्यक्त केला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments