उमरखेड, अरविंद ओझलवार| छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील तीन वर्षापासून नगरपरिषद च्या प्रांगणातील शेडमध्ये बंदिस्त करून ठेवला आहे . सदर पुतळ्यासंदर्भात मागील तीन वर्षात अनेक उपोषण व आंदोलन झाले परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज 22 जुलै रोजी जन आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता शिवप्रेमींनी नगरपरिषद मध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु नगर परिषदेचे मुख्य द्वारावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने गेट जवळ थांबून ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान न . प. मुख्याधिकारी यांनी शिवप्रेमींना दोन महिन्याचा कालावधीचे पत्र दिले असताना ते नकारात त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करत पत्र फाडून टाकण्यात आले यावेळी आक्रमक झालेल्या शिवप्रेमींना पोलिसांनी अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .दरम्यान आज शिवप्रेमींनी दिलेल्या शहरातील प्रतिष्ठानांनी संपूर्ण प्रतिसाद दिल्याने संपूर्ण शहर कडकडीत बंद होते .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या संदर्भात मागील पाच वर्षापासून विविध घटनाक्रमामुळे तसेच प्रशासनाने त्वरित निर्णय न दिल्यामुळे हा वाद संपुष्टात आला नाही . या अगोदर अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भात आंदोलने व उपोषणे झाली परंतु पुतळ्याच्या जागे संदर्भात मत मतांतरे असल्यामुळे हा प्रश्न निकाली लागू शकला नाही .
या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती व मराठा मावळा संघटन यांनी 22 जुलै पर्यंत अश्वारूढ पुतळा संदर्भात प्रशासनाने निर्णय घेऊन पुतळा उभारावा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता .परंतु यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आज शिवप्रेमी आक्रमक झाले सकाळी 11 वाजता शेकडोच्या संख्येने नगरपरिषद च्या गेटवर जमून नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध व्यक्त केला .संभाव्य जन आंदोलन पाहता किसान ची मोठी कुमक शहरात बोलवण्यात आली होती.
यामध्ये बिटरगाव पोफाळी महागाव दराटी यासह जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त बोलण्यात आला होता आज सकाळी पोलिसांनी अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित जागा असलेल्या नगर परिषद कार्यालयाभोवती तगडा बंदोबस्त लावल्याने न.प. कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते .आक्रमक असलेल्या शिवप्रेमींना प्रशासनाने दोन महिन्याचा अवधी मागितला परंतु तो मान्य न करत त्वरित कारवाईची मागणी धरत शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन दुपारी तीन वाजल्यानंतरही सुरू ठेवले आहे .
शिवप्रेमींनी नपच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केल्या मुळे , नपचे कामकाज ठप्प होते . यामुळे शहरवासीयांचे नप अंतर्गंत कामास ब्रेक लागला होता .