Free the locked statue of Chhatrapati Shivaji and erect it with dignity | छत्रपती शिवरायांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून सन्मानाने उभारा; उमरखेड कडकडीत बंद – NNL
उमरखेड, अरविंद ओझलवार| छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील तीन वर्षापासून नगरपरिषद च्या प्रांगणातील शेडमध्ये बंदिस्त करून ठेवला आहे . सदर पुतळ्यासंदर्भात मागील तीन वर्षात अनेक उपोषण व आंदोलन झाले परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज 22 जुलै रोजी जन आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता शिवप्रेमींनी नगरपरिषद मध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु नगर परिषदेचे मुख्य द्वारावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने गेट जवळ थांबून ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान न . प. मुख्याधिकारी यांनी शिवप्रेमींना दोन महिन्याचा कालावधीचे पत्र दिले असताना ते नकारात त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करत पत्र फाडून टाकण्यात आले यावेळी आक्रमक झालेल्या शिवप्रेमींना पोलिसांनी अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .दरम्यान आज शिवप्रेमींनी दिलेल्या शहरा...
