Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
sap-sucking worms and pink bollworms ; असे रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन… – NNL

sap-sucking worms and pink bollworms ; असे रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन… – NNL

लेख
कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसुन येतो. वरील सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करावा. एकात्मिक व्यवस्थापन: रस शोषक कीडींचे व्यवस्थापन - बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथोक्झाम किटकनाशकांची बीजप्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत प...
Annapurna Yojana ; मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन – NNL

Annapurna Yojana ; मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन – NNL

लाइफस्टाइल
नांदेड | मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुर्नभरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे. विषेशत: उज्ज्वला गॅस जोडणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेततील महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित तेल कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गावात येऊन ई-केवायसी करुन घेतील किंवा आपणास शक्य असल्यास संबंधित ऑईल कंपनीच्या एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी. सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही असेही आवाहन करण्यात आले आहे....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन ; हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना – NNL

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन ; हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना – NNL

नांदेड, राजकीय, हिंगोली
नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी 4 वाजता  नांदेड, हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर आगमन झाले. श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नांदेड विमानतळावर आ. बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे,अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित कावड यात्रेस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झालेत. नांदेड विमानतळावर आ. बालाजी कल्याणकर,माजी खासदार...
Baburao Kendre ; किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख पदी बाबुराव केंद्रे यांची नियुक्ती – NNL

Baburao Kendre ; किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख पदी बाबुराव केंद्रे यांची नियुक्ती – NNL

Blog, नांदेड, राजकीय
किनवट /परमेश्वर पेशवे | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीची आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणुन नियुक्ती केली असून दि 7 ऑगष्ट रोजी लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात बाबुराव केंद्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. आगामी विधानससभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने किनवट मतदार संघात जोरदार तयारी सुरू केली असून त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठिने ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांची किनवट विधानसभा निवडणूक प्रमुख म्हूणन नियुक्ती केली आहे. आ. भीमराव केराम यांच्या शिफरसीवरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संघटनात्मक नियुक्तीची घोषणा केली असून दि 7 ऑगस्ट रोजी किनवट येथील पक्षाच्या लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या हस्ते व आ भीम...
Successful students ; विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते होणार सत्कार – NNL

Successful students ; विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते होणार सत्कार – NNL

करियर, नांदेड
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संकुलामधून ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’ आणि ‘यूपीएससी’ व ‘एमपीएससी’ मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते दि.१४ ऑगस्ट रोजी स. ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये होणार आहे. विद्यापीठ परिसरातील संकुलामधून जवळपास १२५ विद्यार्थी यावर्षी ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’ आणि ‘यूपीएससी’ व ‘एमपीएससी’ सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. यानिमित्त यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यामधून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पालकासह विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात निमंत्रित केले आहे आणि त्यांचा सन्मानही पालकासह होणार आहे. असे समितीचे प्रमुख तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे ...
Pradeep Naik ; वृक्षारोपण सोबत संगोपनाची जबाबदारी आवश्यक :- प्रदीप नाईक – NNL

Pradeep Naik ; वृक्षारोपण सोबत संगोपनाची जबाबदारी आवश्यक :- प्रदीप नाईक – NNL

Blog, नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर/ राज ठाकूर | वृक्षारोपण करणे जेवढे गरजेचे आहे त्या पेक्षा लागवड करून झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्वाचे आहे.वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले. माहूर तालुक्यातील लखमापूर येथील पंचशील विद्यालयांमध्ये आज दिनांक 12 सोमवार रोजी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा तीहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदीप नाईक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव लखमापूरचे सरपंच गणेश राठोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल जाधव, विनोद राठोड,शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गा...
Dr.Ranganathan ; हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी – NNL

Dr.Ranganathan ; हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी – NNL

Blog, करियर, नांदेड
हिमायतनगर | येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 132 व्या जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ डी के कदम हे लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख एल एस पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. राजू बोंबले यांनी केले. तसेच या प्रसंगी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा डॉ . एल बी डोंगरे यांनी 05 ग्रंथ ग्रंथालयास भेट दिली . ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल प्रा राजू बोंबले व ग्रंथालय सहाय्यक श्री विश्राम देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पवार सर यांनी आपल्या भ...
Uttamrao Ingle ; माजी आ. उत्तमराव इंगळे यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेवर घ्यावे  – NNL

Uttamrao Ingle ; माजी आ. उत्तमराव इंगळे यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेवर घ्यावे – NNL

Blog, नांदेड, राजकीय
किनवट /परमेश्वर पेशवे| गेल्या 30 ते 35 वर्षापासून भाजप पक्ष वाढीसाठी पक्षामध्ये एक निष्ठेने काम करत असताना आंध आदिवासी जमातीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभा अशा संविधानिक पदावर त्यांचा विचार जर नाही केला तर येणाऱ्या विधानसभेला विदर्भामधून पाच ते सात जागेवर भाजपला हार म्हणावी लागेल अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेतून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव दादारावजी टारपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात गटातटाच्या राजकारणाने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्यातच भाजपला लोकसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं.. महाराष्ट्र एवढ्यावरच थांबला नाही तर भाजप मधल्या काही निष्ठावंत माजी मंत्र्यांनी राजीनामे देण्याला सुरुवात केल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली हे ताजं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळाल आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्या...
Physicswala National  ; फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा – NNL

Physicswala National ; फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड परिक्षेची घोषणा – NNL

Blog, करियर, नांदेड
नांदेड | फिजिक्सवाला हा देशपातळीवरील भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रसिद्ध आणि विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाते कारण फिजिक्सवालाची अनुभवी आणि समर्पित शिक्षकांच्या टिमच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अभ्यासक्रम आणि अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीमूळे विद्यार्थ्यांन विषयाची समज आणि वैचारिक स्पष्टता वाढवेत तसेच फिजिक्सवाला च्या नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती, संवाद सत्रे आणि कठोर मूल्यमापन प्रणाली विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करतात, यामुळे शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून अल्पकालावधीतच फिजिक्सवाला ची ओळख संपूर्ण देशभरात तयार झाली आहे. फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल .. फिजिक्सवाला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा ही संपूर्ण देशपातळीवर एकाच वेळी आणि वर्षातून एकदाच आय...
Fajja of Har Ghar Tiranga Abhiyan Rally : गटशिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान रॅलीचा फज्जा – NNL

Fajja of Har Ghar Tiranga Abhiyan Rally : गटशिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान रॅलीचा फज्जा – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील गटशिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान रॅलीचा फज्जा उडाला असून, शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना रॅली काढण्यासाठी बोलाऊन साधा खाऊ देखील वाटप करण्याची तसदी शिक्षण विभागाने घेतली नसल्याने पालक वर्गातून कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे. हिमायतनगर येथील शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील सर्व शासकीय निमशासकीय शाळांना शासन निर्णयाप्रमाणे हरघर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याकरिता वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी सकाळी 9.00 वाजता हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची सूचना ऐनवेळी देण्यात आली. तरीदेखील सूचनेचे पालन करून शहरातल्या अनेक शाळांच्या आपल्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थ्यांर्थीना घेऊन उपस्थिती दर्शविली होती. परंतु या ठिकाण...
error: Content is protected !!