Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Travel Carnival on Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन, बस बुकिंगवर २५% पर्यंत सवलती -NNL

Travel Carnival on Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन, बस बुकिंगवर २५% पर्यंत सवलती -NNL

नांदेड, देश विदेश
मुंबई| भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाइल पेमेंट्सची अग्रणी पेटीएमने २० ऑगस्ट पर्यंत चालणा-या 'पेटीएम ट्रॅव्हल कार्निवल'ची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करताना या कार्निव्हलमध्ये ग्राहकांना फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर १२-२५% ची अप्रतिम सवलत मिळेल. पेटीएम ट्रॅव्हलचे प्रवक्ते म्हणाले, "आम्ही २० ऑगस्टपर्यंत आमच्या स्वातंत्र्यदिन ट्रॅव्हल कार्निव्हल सेलद्वारे प्रवास सोयीस्कर आणि परवडणारा बनवत आहोत. आरबीएल, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, डीबीएस आणि एचएसबीसीसारख्या आघाडीच्या बँकांसोबत भागीदारी करून आम्ही विशेष ऑफर देत आहोत. फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिट बुकिंगवर बचत वाढवणाऱ्या सवलती, युपीआय वापरून पैसे दिल्यावर शून्य पेमेंट गेटवे शुल्क आणि ग्राहकांना उत्तम मूल्य प्रदान करणाऱ्या फ्लाइट्स आणि बसेसवर भरीव सवलत यासारख्या सेवा देखील देतात. पे...
Inauguration of Rajesh Pavde’s Public Relations Office : राजेश पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -NNL

Inauguration of Rajesh Pavde’s Public Relations Office : राजेश पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या जनसंपर्क - कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. वसंतराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन व प्रशासन ) नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीच्या नांदेड उत्तर विधानसभा अनुषंगाने विधानसभा मतदारसंघातील जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे गेले अनेक महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत. सर्वसामान्...
Gor Sena’s national president Arun Chavan : गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश -NNL

Gor Sena’s national president Arun Chavan : गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| बंजारा समाजातील लढवय्ये युवा नेतृत्व व हजारो युवकांचे प्रेरणास्थान असलेले गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण दिगंबर चव्हाण यांनी रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी हजारो कार्यकर्त्यांसह नांदेड येथील सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अरुण चव्हाण यांचा पक्षप्रवेश जाहीर केला. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,माजी आरोग्यमंत्री अमित देशमुख, माजी सहकार मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील , प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, माजी मंत्री नसीमखान,कुनालजी राऊत,नांदेड जिल्हयाचे प्रभारी अमितजी पटेल,आ.धिरजभैया देशमूख, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण,लातूरचे खा.डॉ.शिवाजीराव काळगे, जालन्याचे खा.डॉ.कल्याणराव काळे,मा.आ.ईश्वरराव भोसीकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे,आ...
Rotary Club Inauguration Ceremony : रोटरी क्लब पदग्रहण सोहळा थाटा माटात संपन्न -NNL

Rotary Club Inauguration Ceremony : रोटरी क्लब पदग्रहण सोहळा थाटा माटात संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदीग्राम ही एक विविध सामाजिक उपक्रमासाठी जाणल्या जाणारी संस्था आहे. दरवर्षी नवीन अध्यक्ष सचिव व बोर्ड ऑफ डायरेक्टर सभासद निवडून एक टीम बनून शहर तसेच ग्रामीण भागातील मधील सामाजिक विविध उपक्रम राबवित असतात. त्याप्रमाणे 2024-25 चे रोटरी क्लब नांदेड चे नवीन अध्यक्ष, रो. डॉ. संजय पतंगे, सचिव, रो. सुरेश अंबुलगेकर तसेच रोटरी क्लब नंदिग्रामच्या अध्यक्ष रो. रेखा गरुडकर व सचिव डॉक्टर सुरभी राठोर त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर चे पूर्ण सभासदाचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी हॉटेल सिटी सिंफोनी, नमस्कार चौक नांदेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट चे डि.जी.ई. रो. सुधीर लातूर, नांदेड रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो. नजीब पठाण व रोटरी क्लबचे नंदिग्राम चे असिस्टंट गव्हर्नर रो. मुरलीधर भुतडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन...
Shiv Mahapuran Katha by Pandit Mishra : पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांची नांदेडला 23 ऑगस्टपासून शिवमहापुराण कथा -NNL

Shiv Mahapuran Katha by Pandit Mishra : पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांची नांदेडला 23 ऑगस्टपासून शिवमहापुराण कथा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड, अनिल मादसवार| आंतरराष्ट्रीय कथावाचक, भागवत भूषण, परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सीहोरवाले यांची नांदेड शहरात दिनांक 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान सात दिवस शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. शिवमहापुराण कथा दररोज दुपारी एक ते चार या वेळात होईल. कथेचे स्थळ श्री कुबेरेश्वर धाम, मोदी ग्राउंड कौठा नांदेड हे असून डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार हे या शिवमहापुराण कथेचे यजमान आहेत. ही कथा भव्य दिव्य प्रमाणा करण्यासाठी शिवमहापुराण कथा आयोजन समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज हे श्री विठ्ठलेश सेवा समिती, मुरली मनोहर कुबेरेश्वर महादेव मंदिर, चितावलिया हेमा सीहोर या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांना महादेवाचे महत्व पटवून सांगितल्यामुळेच संपूर्ण देशातील महादेव मंदिरे परिचीत झाली आहे...
Retired soldiers’ felicitations : सेवानिवृत्त सैनिकांच्या सत्कार सोहळ्यांमुळे युवकांना देश सेवेची प्रेरणा मिळते – गोविंद मुंडकर -NNL

Retired soldiers’ felicitations : सेवानिवृत्त सैनिकांच्या सत्कार सोहळ्यांमुळे युवकांना देश सेवेची प्रेरणा मिळते – गोविंद मुंडकर -NNL

देश विदेश, नांदेड
नांदेड/बिलोली| आपले घर,दार सोडून प्रसंगी मुलांबाळांपासून दुर राहुन भारत मातेच्या रक्षणासाठी जिवाची पर्वा न करता सैन्य दलाच्या माध्यमातून देश सेवा करतात. देश सेवा करणारा सैनिक जेव्हा सेवा निवृत्त होऊन आपल्या स्वगृही येतो तेव्हा त्या सैनिकाच्या निवृत्तीनंतर होणाऱ्या कार्यक्रमामुळे तरुण पिढीला विविध माध्यमातून देश सेवा करण्याची प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंदराव मुंडकर यांनी केले. ते दिनांक 11 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील बामणी येथील भव्य मैदानात पाच हजार लोकांच्या उपस्थितीत. येथील सतरा वर्षे सैन्य दलात देशसेवा करून सेवानिवृत्त सैनिक साईनाथ शंकरराव जक्कावाड हे गावी परतल्या निमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळ्या प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मुंडकर पुढे असेही म्हणाले की, देशसेवा आणि संस्कार या दोन्ही बाबी अशा कार्यक्रमातून विकसित होत आहेत. येथे प्रारंभी...
Dhanraj Rathod in Kinwat Mahur : किनवट माहूर मतदार संघात युवा नेते धनराज राठोड यांना संधी द्या -NNL

Dhanraj Rathod in Kinwat Mahur : किनवट माहूर मतदार संघात युवा नेते धनराज राठोड यांना संधी द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| गेली २० वर्षापासून काँग्रेस तालुका व प्रदेशओबीसी विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धनराज राठोड हे काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने सातत्याने प्रयत्न करत असून धनराज राठोड हे उच्चशिक्षित असून जय जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव या नात्याने समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडले संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड गुत्ती बेलारी या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सेवा मध्ये नेहमीच अग्रेसर आहेत. चिमटा धरण विरोधी कृती समितीमध्ये सक्रिय सहभाग व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आदिलाबाद जिल्ह्यातील बोथ विधानसभाचे निरीक्षक म्हणून आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या राजकीय ठसा उमटून दिसला महाराष्ट्र प्रदेश काँग्र...
The self-immolation movement of Tembhurni Pawanmari residents is back : कार्यकारी अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर टेम्भूर्णी पावनमारी वासियांचं आत्मदहनाच आंदोलन मागे -NNL

The self-immolation movement of Tembhurni Pawanmari residents is back : कार्यकारी अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर टेम्भूर्णी पावनमारी वासियांचं आत्मदहनाच आंदोलन मागे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पावनमारी गावासाठी मंजूर झालेल्या दीड कोटींचा निधी इतरत्र वळविला जात असल्यावरून प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी या विरोधात रणशिंग फुंकले होते. दरम्यान गावकर्यांनी गाव जाळून टाकून बेचिराख करून दिनांक १५ ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. ७५ वर्षांपासून रस्त्यापासून वंचित असलेल्या पावनमारी गावच्या रस्त्याचे प्रकरण नांदेड न्यूज लाइव्हने उचलून धरले. याची दखल घेऊन आज दिनांक १२ श्रावण सोमवारी नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे, पोलीस प्रशासनाने पावनमारी गावाला भेट दिली. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून लेखी आश्वासन दिल्यानंतर टेम्भूर्णी/पावनमारी वासियांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असल्याचे सांगितले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पावनमारी गावासाठी मंजूर झालेला १.५ क...
Social Welfare Department ; समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनासाठी 26 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Social Welfare Department ; समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनासाठी 26 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

सोशल वर्क, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 20 टक्के सेस मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनासाठी पात्र लाभार्थ्यांनी 26 ऑगस्ट 2024 पर्यत पंचायत समितीकडे सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. या योजनांमध्ये मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन, प्रिंटर, लहान मशिन अनुदान, मागासवर्गीयांना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे, मागासवर्गीय महिलांना 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन अनुदान, मागासवर्गीयाना मिरची कांडप अनुदान, मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी प्रोत्साहनपर अनुदान, मागासर्गीय व्यक्तीना दुग्ध व्यवसायासाठी गाई व म्हैस पुरविणे, निराधार/विधवा/परितक्त्या, घटस्फोटीत ...
Babasaheb Ambedkar Swadhar Yojana ; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Babasaheb Ambedkar Swadhar Yojana ; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://hmos.mahait.org संकेतस्थळावर 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत ऑनलाईन भरावा. भरलेला अर्ज 2 दिवसात अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहाकडे जमा करावा. सदर पात्र लाभार्थ्याची पहिली निवड यादी अंतिम व प्रसिध्द 4 सप्टेंबर 2024 पर्यत करण्यात येईल. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन संबंधित वसतीगृह गृहपाल यांनी सही शिक्क्यासह 3 सप्टेंबर 2024 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नव...
error: Content is protected !!