Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Sad demise of Trimbakrao Vansagar: त्र्यंबकराव वनसागर यांचे दुःखद निधन -NNL

Sad demise of Trimbakrao Vansagar: त्र्यंबकराव वनसागर यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। येथील शगुन शिटी भागातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक श्री त्र्यंबकराव वनसागर यांचे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी पहाटे दुःखद निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा शगुन सिटी, जुना कौठा त्यांचे राहते घर येथून अंत्ययात्रा निघणार आहे . दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता गोवर्धन घाट येते अंत्यविधी होणार आहे . त्र्यंबकराव वनसागर हे डॉक्टर तुषार वनसागर व डॉ विशाल वनसागर यांचे वडील होते .कै.त्र्यंबकराव वनसागर नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणीतील माजी सचिव व विविध पदावरती सामाजिक कार्य केले . त्यांनी केलेल्या कार्याची उणीव आपणास जाणवेल एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याचं दुःख होत आहे. अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणी याच्या वतीने वाहण्यात आली...
भोकर येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक व गप्पी मासे सोडणे कार्यक्रम संपन्न -NNL

भोकर येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक व गप्पी मासे सोडणे कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, आरोग्य
भोकर। मा.डॉ.संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी आज भोकर येथे तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांची आढावा बैठक पंचायत समिती येथील सभागृहात घेण्यात आली. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. गप्पी मासे सोडणे मोहीम अंतर्गत भोकर शहरातील शिवाजी चौक भागात मा. डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. डॉ संतोष सूर्यवंशी साहेब अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,मा. डॉ राजेश्वर माचेवार साहेब जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी, मा डॉ शिवशक्ती पवार साहेब जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, मा. डॉ संदेश जाधव साहेब तालुका आरोग्य अधिकारी भोकर, मोहन पेंढारे आरोग्य पर्यवेक्षक, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य न...
युगकवी वामन दादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांचा उद्या संयुक्त जयंती सोहळा-NNL

युगकवी वामन दादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांचा उद्या संयुक्त जयंती सोहळा-NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। महाकवी वामनदादा कर्डक यांचा १९वा आणि आंबेडकरी कवी गायक प्रतापसिंग बोदडे यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दि.२४ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना "तुफानातले दिवे" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून नामवंत गायकांचा गीत गायन कार्यक्रम या प्रसंगी ऐकावंयास मिळणार आहे. शहरातील कुसुम सभागृहामध्ये दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फारूक अहमद राहणार आहेत. या जयंती सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम. सायलू अण्णा म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष इंजी. प्रशांत इंगोले, मुख्य संयोजक संजय निवडंगे आणि निमंत्रक डॉ. विजय कांबळे यांनी दिली आहे. 'स्टार प्रवाह फेम' अंजली गडपाळे या कार्यक्रमाचे आकर्षण राहणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ...
महाविकास आघाडी कडून किनवट बंदचा इशारा -NNL

महाविकास आघाडी कडून किनवट बंदचा इशारा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे।  दिनांक 24 रोजी राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला असून या बंद संदर्भात किनवट येथील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या कार्यालयात जाऊन किनवट कडकडीत बंद पाळण्या संदर्भात निवेदन दिले. महाराष्ट्र राज्यात महिला शाळकरी मुली महाविद्यालयीन मुली तथा महिलावर होत असलेल्या अत्याचारांच्या बलात्कारांच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रातील नागरिकाच्या सुरकक्षिततेबाबत महाराष्ट्र शासन हे सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत सरकारच्या या नाकर्तेपणाच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीत असलेल्या तीन पक्षाच्या सहयोगी पक्षाने किनवट बंदचा इशारा दिला. या बंदमध्ये सर्व व्यापारी बंधूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेडी, शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष ...
पोस्टे शिवाजीनगर यांनी मोटार सायकल चोरीतील दोन आरोपी गजाआड 3 लक्ष 60 हजाराचा मुद्येमाल जप्त -NNL

पोस्टे शिवाजीनगर यांनी मोटार सायकल चोरीतील दोन आरोपी गजाआड 3 लक्ष 60 हजाराचा मुद्येमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। दिनांक 21.08.2024 रोजी पोस्टे शिवाजीनगर येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन मोटार सायकल जप्त करण्याचे आदेश पोनि जालींदर तांदळे पोस्टे शिवाजीनगर यांना दिले होते. त्यावरून पोस्टे शिवाजीनगर यांनी मोटार सायकल चोरीतील दोन आरोपीतास  गजाआड करून त्यांच्याकडून 3,60,000/- रू मुद्येमाल जप्त केला आहे. दिनांक 21.08.2024 रोजी पोस्टे शिवाजीनगर गुरन 341/2024 कलम 303 (2) भा.न्या. संहीता कायदा प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोनि श्री जालींदर तांदळे, पोस्टे शिवाजीनगर यांचे सुचने प्रमाणे पोस्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथक तपास करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, 1) साहील राजु गोडबोले, वय 21 वर्षे, रा. आंबेडकर नगर, नांदेड 2) अजय सुभाष पोहरे, वय 27 वर्षे, रा. जनत...
Attemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

Attemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव येथे निवडणुकीच्या जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास 50 हजार दंड तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 10 हजार दंड अशी शिक्षा मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश -३, श्रीमती आर.एम. पटवारी यांनी सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हनुमंत संभाजीराव पुयड, रा. पुणेगाव, ता.जि. नांदेड यांनी यशोसाई हॉस्पीटल कौठा येथे आयसीयु युनीट २ मधील बेड क.३ मध्ये उपचार घेत असताना जबाब दिला की, आई वडील एक भाउ बहीण व पत्नी एक मुलगी असे राहतो आमची पुणेगाव येथे २० एकर जमिन असुन, आम्ही शेती करुन कुटूंबाची उपजिवीका भागवितो. जानेवारी २०२१ मध्ये मी सरपंच म्हणुन निवडुन आलेला असुन ग्रामपंचायत पुणेगाव येथे सरपंच आहे. दि.१५ मे २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजण्याच्या सुमारास माझा भाउ संदीप व त्याचा मित्र धनंजय भोसले असे आमदुरा येथे कार्यक्रमात गे...
‘Swaratim’ University  ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सांख्यिकी अधिकारी (वर्ग-२) स्पर्धा परीक्षेमध्ये संकुलातील अतिश तानगावडे, अजय कदम व अफझल शेख यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सध्याच्या घडीला बरेच तरुण-तरुणी शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. यासाठी विद्यार्थी देखील अहोरात्र मेहनत घेत असतात. प्रसंगी काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा पडते. पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणं शक्य होते. याचेच एक उदाहरण म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणितीयशास्त्रे संकुलातील विद्यार्थी अतिश तानगावडे, अजय कदम व अफझल शेख यांनी घवघवीत यश संपादन करून एमपीएससी मार्फत सांख्यिकी अधिकारी (वर्ग-२) पदी निवड झालेली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अ...
Pradeep Mishra ; पं.प्रदीप मिश्रा यांचे जंगी स्वागत – NNL

Pradeep Mishra ; पं.प्रदीप मिश्रा यांचे जंगी स्वागत – NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड | शिवपुराण कथेसाठी पं.प्रदीप मिश्रा यांचे विमानाने आगमन झाले. पद्मजा सिटीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर  मिरवणूक काढण्यात आली. संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार यांनी पं. प्रदीप मिश्रा यांचे स्वागत केले तर महिलांनी औक्षण केले. श्री कुबेरश्वर धाम, मोदी मैदान कौठा येथे पं.प्रदीप मिश्रा यांची  शिवमहापुराण कथा उद्या 23 अॉगस्ट शुक्रवार दुपारी 1 ते 4 या दरम्यान पार पडेल. 29 अॉगस्ट पर्यंत शिवपुराण कथा चालणार आहे. पं. प्रदीप मिश्रा यांचे विमानाने नांदेड विमानतळ आगमन झाले. विमानतळावर पं. प्रदीप मिश्रा यांचे संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. शिवराज नांदेडकर यांचे निवासस्थान असलेल्या पद्मजा सिटीत पं. प्रदीप मिश्रा यांचा मुक्काम राहणार आहे. त्यांचे पद्मजा सिटीच्या प्रवेशद्वारावर...
crop insurance ; पिक विमा मिळाला नसल्यास प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आवाहन – NNL

crop insurance ; पिक विमा मिळाला नसल्यास प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आवाहन – NNL

कृषी, नांदेड
नांदेड |  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन देखील पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरुन आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषि अधिकारी तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या कार्यालयात 3 सप्टेंबर 2024 पर्यत दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  तसेच प्रपत्र संबंधित तालुका कृषि कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावे असेही कळविले आहे....
National Lok Adalat  ; जिल्ह्यात 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

National Lok Adalat ; जिल्ह्यात 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबीक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व न्यायाधीश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक...
error: Content is protected !!