Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Accident ; टिप्परची दुचाकी वाहनाला धडक,एक ठार एक जखमी -NNL

Accident ; टिप्परची दुचाकी वाहनाला धडक,एक ठार एक जखमी -NNL

क्राईम, नांदेड
नवीन नांदेड। नांदेड उस्माननगर रस्त्यावर गुंडेगाव गावाजवळील पेट्रोल पंपाच्या समोर दुचाकी वाहनाला भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने जबर धडक दिल्याने दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी शनिवारी दुपारी ३.३०च्या दरम्यान घडली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या येणाऱ्या वाहन धारकांनी व नागरीकांनी गर्दी केली होती. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नांदेड- उस्माननगर रस्त्यावरून शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास दोघे जण दुचाकी वाहनावरून जात होते, गुंडेगाव गावाजवळ पेट्रोल पंपाच्या समोर येताच एम.एच.२६ ऐ. टी. ८८८८ या क्रमांकाच्या टिप्परने दुचाकी क्रमांक एम.एच.१२ एम.डी ७९९५ यास जबर धडक दिली. यात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून घटना स्थळी मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. अखेर खाजगी वाहनाने मयत व जखमींना शासकीय रुग्ण...
Satyaganapati ; भक्तांचा नवसाला पावणारा सिडको परिसरातील सत्यगणपती -NNL

Satyaganapati ; भक्तांचा नवसाला पावणारा सिडको परिसरातील सत्यगणपती -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड,रमेश ठाकूर। भक्तांचा नवसाला पावणारा गणपती म्हणून सिडको परिसरातील मुख्य रोडवर असलेल्या मुख्य बाजारपेठेतील सत्यगणपती असून भक्तांचा व कार्यकारी मंडळ यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसर कायापालट झाला असून वर्ष भर दैनंदिन धार्मिक कार्य चालूच असून गणेशोत्सव काळात दिवसभर दर्शन साठी गर्दी होत आहे. सिडको मुख्य बाजारपेठेतील व मुख्य मार्गावर असलेल्या सत्यगणपती असल्याची भावना व मनोकामना भाविक भक्तांत होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात पुजारी म्हणून शामराव लक्षणमराव लाठकर हे नित्य नियमाने दैनंदिन सकाळी व सायंकाळी पुजा पाठ आरती करत असत तर विनायक व संकष्ट चतुर्थी निमित्ताने व मंगळवारी भाविक भक्तांनी केलेल्या मनोकामना व नवस करून त्या बोलेल्या अनेक कामी, शुभ विवाह, यासह अनेक भाविक भक्तांचा ईच्छा पुरण झाल्या आहेत. सात मंगळवार किंवा २१ मंगळवार नित्य नियमाने महाआरती केल्यास भाविक भक्त...
Police action ; राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक उमरीमध्ये पकडले; ४५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल ताब्यात -NNL

Police action ; राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक उमरीमध्ये पकडले; ४५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। पोलीस अधिक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकानी व पोलीस स्टेशन उमरीचे अधिकारी अंमलदार यांनी संशयित राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक किमंती अंदाजे ४५,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात घेतला आहे, या कार्यवाही मूळ उमरी परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायद्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत विशेष पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच उमरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. उमरी तळेगाव रोडवरुन एक आयचर ट्रक क्र. MH-२६ BE ७३३७ मध्ये संशयित राशेनचे गव्हाचे कट्टे किमंती अंदाजे ४,००,०००/- रुपये व ट्रक क्र.MH-२६ BE ७८३५ ट्...
Hindi diwas ; शिवाजी विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -NNL

Hindi diwas ; शिवाजी विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड संचालित शिवाजी विद्यालय,सिडको,नांदेड या शाळेत हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख एस.आर.बीरगे, बी.जी.हंबर्डे, ए.एन.कंकरे, एन.पी.जाधव,सौ.व्ही.यु.भाले हे होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हिंदी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थीनींनी 'बसंती हवा' हे गीत सादर केले. यावेळी स्नेहा कदम,गीतांजली कोटेवाड,समीक्षा मस्के,शिवानी चल्लावार,सिद्धि मामीडवार,दिंडे अनुजा व दत्तात्रय कुलकर्णी या शालेय विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले तर हिंदी विषयाचे सहशिक्षक एस.आर.बीरगे यांनी यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की हिंदी ही भारताची ओळख आणि अभिमान आहे.ही भारताची अधिकृत भाषा आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीयांना एकत...
ओकांर अंबुलगेकर यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर -NNL

ओकांर अंबुलगेकर यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड। शारदा भवन शिक्षण संस्था संचलित,इंदिरा गाधी हायस्कूल हडको येथील सहशिक्षक ओकांर सुधाकर अंबुलगेकर यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया,कोल्हापूर यांच्या वतीने गेल्या १७ वर्षापासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २४ जाहीर झाला असल्याचे निवड समिती सचिव दिलीप मोरे यांनी कळविले असून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. अविष्कार फाऊंडेशन इंडिया कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो,राज्यातील विविध जिल्ह्यातील शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षंकाची निवड करण्यात येते, या वर्षी सदरील पुरस्कार वितरण कुणबी भवन निजामपूर रोड मानगाव जिल्हा रायगड येथे २२ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. इंदिरा गांधी हायस्कूल ...
Abinash Kumar : स्पर्धेच्या युगात मेहनतीशिवाय पर्याय नाही – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

Abinash Kumar : स्पर्धेच्या युगात मेहनतीशिवाय पर्याय नाही – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आजच्या स्पर्धेच्या युगात शॉर्टकट मार्ग न अवलंबता विद्यार्थ्यांनी शिक्षणात कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे मेहनती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले. नांदेड तालुक्यातील धनेगाव येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रा. विनायक गजभारे यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भदंत पंय्याबोधी थेरो हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक आयनाले, धनेगाव चे माजी सरपंच दिलीप गजभारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. इंग्लिश मीडियम व जिल्हा परिषद शाळा यामधील ...
Politics special ; दादांच्या पक्ष बदलाला बिलोली तालुक्यात काहींचे समर्थन तर काहींचा सोशल मिडीयावर नाराजीचा सुर -NNL

Politics special ; दादांच्या पक्ष बदलाला बिलोली तालुक्यात काहींचे समर्थन तर काहींचा सोशल मिडीयावर नाराजीचा सुर -NNL

नांदेड, राजकीय
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर। तालुक्यातील खतगावचे भुमीपुञ तथा माजी राज्यमंञी भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकरनगर येथे दि.१२ सप्टेंबर रोजी आपल्या कार्यकत्यांची एक बैठक घेतली.या बैठकीनंतर दादा लवकरच भाजपाचे कमळ सोडून हातात हात घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.सध्या काँग्रेस मध्ये खासदार वसंतराव चव्हाण निधनामुळे जिल्हा पातळीवर काम करण्याची क्षमता असनारे नेते भाजपाच्या तुलनेत कमी असल्याने व आपल्या सुनबाई डाँ.मिनल खतगावकर यांच्या सह अन्य दोघांना उमेदवारी मिळण्याच्या अटीवर दादांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.खतगावकरांच्या या पक्ष बदलाच्या निर्णयामुळे माञ बिलोली तालुक्यातील काहींनी स्वागत करत आहेत.तर काही कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून विरोध करताना दिसून येत आहेत. शंकरराव चव्हाण यांच्या तालिमीत तयार होऊन काँग्रेस पक्षातुन आपल्या राजकीय जिवनाची सुरूवा...
Bhondu baba arrested ; कर्नाटकातील भोंदू बाबांना बिलोली पोलिसांनी घेतले ताब्यात -NNL

Bhondu baba arrested ; कर्नाटकातील भोंदू बाबांना बिलोली पोलिसांनी घेतले ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
बिलोली/नांदेड,गोविंद मुंडकर। बिलोली तालुक्यातील कार्ला (बु.)येथे रमेश हनुमंतराव जामनोर यांची पत्नी नेहमी आजारी असल्यामुळे त्यांनी दवाखान्यात दाखवून सुद्धा त्यांची तब्येत बरी होत नसल्यामुळे रमेश जामनोर यांनी कर्नाटकातील भोंदू वैद्य यांना बोलावून घेतले.तो भोंदू वैद्य यांनी मंत्र-तंत्र व दैवशक्तीने आजार कमी करतो असे सांगून त्यांच्या घरामध्ये अंगात आल्याचे भासवून अनिष्ट अघोरी प्रथा करत त्या भोंदू बाबांनी रमेश जामनोर यांच्या घरातील चारही कोपरे खोदून लोखंडी खिळे,बिबे,लिंबू,कवड्या, काळीदोरी इत्यादी वस्तू काढून दिले;तसेच त्यांना सांगण्यात आले की;तुमचा आजार नसून तुमच्या घरावरच करनी व बाहेर बाधा केलेली होती ती मी आता पूर्णपणे कमी करतो असे सांगून आर्थिक प्राप्तीच्या उद्देशाने हा सर्व प्रकार करत होता. हे सर्व प्रकार शेजारच्या लोकांनी पाहिले व काहीतरी जादू टोन्याचा प्रकार असावा या उद्देशाने गावातल्या ब...
the municipality administration has finally repaired ; अखेर मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट, व टुयब लाईटची केली दुरूस्ती – NNL

the municipality administration has finally repaired ; अखेर मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट, व टुयब लाईटची केली दुरूस्ती – NNL

नांदेड, सोशल वर्क
 नवीन नांदेड l अखेर मनपा प्रशासनाने सिडको हडको परिसरातील मुख्य रोडवरील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने ऐन गणेशोत्सव काळात परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे वृत येताच सामाजिक व कार्यकर्ते भि. ना. गायकवाड व शिवसेना ऊबाठा गटाचे ऊपशहरप्रमुख दिपक देशपांडे यांनी केलेल्या मागणी दखल घेत स्ट्रीट व ट्यूब लाईट मनपा प्रशासनाने वृतमान वृत येताच दुरूस्ती केली आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सव काळात ही मुख्य रस्त्यावर व परिसरातील ईतर भागात ही अंधाराचे साम्राज्य पसरले असून तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी शिवसेना ऊबाठा गटाचे ऊपशहरप्रमुख दिपक देशपांडे व सामाजिक कार्यकर्ते भि. ना. गायकवाड यांनी मनपा आयुक्त सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे करून सुध्दा गणेशोत्सव काळात स्ट्रीट लाईट, पाथवे टुयब लाईट, म्कयुरी लाईट अंधाराचे साम्राज्य पसरले होते, संबंधित विभागाच्या अभियंता व कर्मचारी यांच्या वर ...
Shree Murti Collection Center  ; मनपा हदतील शहरी भागातील श्री विसर्जन झरी खदान येथे,अनेक ठिकाणी श्रीमुर्ती संकलन केंद्र – NNL

Shree Murti Collection Center ; मनपा हदतील शहरी भागातील श्री विसर्जन झरी खदान येथे,अनेक ठिकाणी श्रीमुर्ती संकलन केंद्र – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या श्री मुर्ती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे होणार असून मनपानी क्रेन व जीवरक्षक दल यासह विधुत व्यवस्था केली असून गणेश भक्तांनी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्जित न करता झरी खदान येथे करून मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शहरी भागातील २७ व ग्रामीण परिसरात २४ एकुण५१ परवानगी गणेशोत्सव मंडळ यांनी नोंद केली आहे तर विनापरवानगी शहरी व ग्रामीण ९१ गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळ यांनी मोठ्या व आकर्षक मुर्ती स्थापना केल्या असून १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी ला विसर्जन होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी झरी खदान येथे नांदेड शहरातील व सिडको परिसरातील श्री मुर्ती विसर्जन होणार असल्याने १४ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाचे अतिर...
error: Content is protected !!