Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Peace Committee meeting concluded : देगलूर तालुक्यातील शहापूर येथे शांतता कमीटीची बैठक संपन्न -NNL

Peace Committee meeting concluded : देगलूर तालुक्यातील शहापूर येथे शांतता कमीटीची बैठक संपन्न -NNL

नांदेड, धार्मिक
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात गणपती विसर्जन ईद ए मिलाप या सारखे उत्सव शांततेत पार पडली पाहिजे. यासाठी शांतता कमीटीची बैठक देगलूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मारोती मूढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आयोजित करण्यात शांतता कमीटीच्या बैठकीसाठी गावातील अकरा गणेश मंडळांच्या अध्यक्षांना पाचरण करण्यात आले होते. त्यांना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक मारोती मूढे म्हणाले कि, गणेश उत्सवात डीजी वापर करण्यास शासनाने बंदी केलेली आहे. त्यामुले कोणत्याही मंडळाने डीजे लावून वायफळ खर्च करू नये डीजे लावल्या कायद्यानुसार कडक कारवाई होईल असे खडसावून सांगितले. तसेच शासनाच्या नियमानुसार वेळेच्या आत गणपतीं मूर्तीचे शांततेत विसर्जन शांततेत पार पाडावे. उत्सवाची परंपरा कायम ठेऊन कोणतेही गालबोट ना लागू देता उत्सव आनंदाने पार पडून पोलिसाना सहक...
Om Bal Gopal Ganesh Mandal : शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या पुरीभाजी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

Om Bal Gopal Ganesh Mandal : शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या पुरीभाजी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| सामाजिक बांधिलकी जोपासून वायफळ खर्चाची बचत करत शैक्षणिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे एकमेव गणेश मंडळ म्हणजे हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्लीत असलेल्या ओम बाल गोपाळ गणेश मंडळाचे नाव समोर येत आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेशोत्सव आनंदाने साजरा करून उरलेल्या पैशातून जिल्हा परिषद शाळेला यावर्षी सीसीटीव्ही कैमरे बसून देण्याचा संकल्प केल्याने मंडळाच्या सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. रविवारी गणेश मंडळाच्या वतीने पुरीभाजीच्या भव्य महाप्रसादाला पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली. तसेच अनेक नामवंत राजकीय नेत्यांनी भेटी देऊन श्रीचे दर्शन घेऊन मंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात तब्बल ३० च्या आसपास गणेश मंडळांची स्थापना होते. यापैकी एक गणेश मंडळ असे आहे कि, उत्सवादरम्यान अनावश्यक खर्च टाळून शैक्षसणीक क्रांतीचा ...
देगलूर तालुक्यातील शहापूर परिसरातील शेतकर्यांचे आधारकार्ड नसल्याने अनूदान थांबले -NNL

देगलूर तालुक्यातील शहापूर परिसरातील शेतकर्यांचे आधारकार्ड नसल्याने अनूदान थांबले -NNL

नांदेड, कृषी
देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर शहापूर येथील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी कृषी कार्यालयात कागदपत्र देऊनही अनुदान मिळत नसल्याने शासनाचे आश्वासन हवेत विरले की काय..? असा प्रश्न आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गातुन व्यक्त केला जात आहे. तर कृषी विभागाने ज्या शेतकऱ्यांनी आधार कानेकट केलं नाही त्यानी बैंक खाते आधार शी जोडुन घ्यावं तरच अनुदान मिळेल असं सांगितले आहे. शासनाने गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपय देण्याचे आश्वासन दिले अन् दहा सप्टेंबर नंतर शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे शासनाचे अनुदान कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. चार दिवस उलटून देखील रक्कम जमा न झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन हजार शेतकऱ्यांपैकी चारशे...
Okanar Ganesha Mandal : नवसाला पावणारा हडको येथील ओकांर गणेश मंडळ, भक्तांची दर्शनासाठी गर्दी -NNL

Okanar Ganesha Mandal : नवसाला पावणारा हडको येथील ओकांर गणेश मंडळ, भक्तांची दर्शनासाठी गर्दी -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील सर्वात मोठी गणेश मूर्ती असलेला व भक्तांचा ईच्छा मनो कामना,नवसाला पावणारा ओकांर गणेश मंडळ असुन गणेश मूर्तीला नवस करणारा भाविक भक्त हा पाचशे शंभर ,दोनशे ,पन्नास रूपये नोटांच्या हार अर्पण करत असून राजकीय पदाधिकारी व आजीमाजी लोकप्रतिनिधी सह नांदेड परिक्षेत्र उपमहासंचालक शहाजी ऊपाम यांनी भेट दिली आहे. हडको परिसरातील एन. डी. ३२ सार्वजनिक भागात गेल्या ३४ वर्षापूर्वी ओकांर गणेश मंडळ स्थापना झाली असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ओकांर गणेश मंडळाने हैदराबाद येथुन २४ फुट ऊची असलेली आकर्षक व सुबक असलेली मुर्ती स्थापना केली, या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सिडको हडको सह ग्रामीण भागातील व नांदेड शहरातील हजारो भाविक भक्तांना नवसाला पावणारा गणपती म्हणून खाव्याती असून, दरवर्षी हजारो भाविक भक्त नवस करून गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान गणपतीला नोटांच्या हार अर्पण कर...
Chief Minister’s Beloved Sister Yojana : इस्लापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक मेळावा संपन्न -NNL

Chief Minister’s Beloved Sister Yojana : इस्लापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक मेळावा संपन्न -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| गरीबातील गरीब महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणीला आर्थिक मदत मिळावी व स्वतःच्या पायावर प्रबळ व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे. आम्ही इथे कुठे राजकारण करत नाही मात्र विरोधक ही योजना फसवी आहे असे म्हणत महिलांना दिशाभूल करत आहेत. कुठल्याही सरकारने एखादी योजना अमलात आणली असेल ती योजना कधीही बंद पडत नाही. त्यासाठी महिलांनी कुठल्याही भुलथापाला किंवा दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंद करून घ्यावी. आपले कागदपत्र सबंधीत अंगणवाडी सेविका कडे जमा करावे जर काही अडचण आल्यास संबंधित अंगणवाडी सेविका सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री लाडकी ...
Sarpanch of Panshevadi : पानशेवडी च्या सरपंच पदी श्रीमती उज्वलाबाई मोरे यांची बिनविरोध निवड -NNL

Sarpanch of Panshevadi : पानशेवडी च्या सरपंच पदी श्रीमती उज्वलाबाई मोरे यांची बिनविरोध निवड -NNL

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील मौजे पानशेवडी येथील पूर्वीचे सरपंच सौ गेनुबाई चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. त्यामुळे कंधारचे तहसीलदार गोरे यांनी आदेश देत सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन मंडळाधिकारी शेख एम. एन. ग्रामसेवक बालाजी भायेगावे यांच्या प्रमुख उपस्थित ग्रामपंचायत कार्यालय पानशेवडी येथे घेण्यात आली. सरपंच पदासाठी उज्वलाबाई मोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून सर्वांना मते निवड करण्यात आली. यावेळी गेनुबाई चव्हाण, कचरूबाई मोरे, अॅड शिवाजी मोरे चंद्रकांत मोरे उषा बसवंते नागीनबाई भालेराव, सुमित्रा नरवडे, हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. श्रीमती मोरे ह्या आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ. आशाताई शिंदे यांचे कट्टर समर्थक कोंडीबा मोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यां...
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

महाराष्ट्र
धाराशिव| मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा प...
Youth Festival : १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘सहयोग’ मध्ये होणार ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव -NNL

Youth Festival : १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘सहयोग’ मध्ये होणार ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे दि .१८ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या विद्यार्थी विकास मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये लोककला, नृत्य, नाट्य, वाङ्मय व ललित कला या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १८०० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. ‘ज्ञानतीर्थ’ या युवक महोत्सवासाठी शोभा यात्रेकरिता ‘मराठवाड्याची कला व संस्कृती’ हा विषय देण्यात आ...
Sandeep Malode : जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावे – संदीप माळोदे – NNL

Sandeep Malode : जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावे – संदीप माळोदे – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरून दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा २०२४ ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींनी राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेसाठी 'स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' ही थीम निश्चित केली आहे. या मोहिमेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात १७ सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल. १८ सप्टेंबरला सुरक्षा मित्र शिबिर घेण्यात येणार असून, सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे लाभ देण्यात येईल. १९ सप्टेंबरला अस्वच्छ ठिकाणाची कायमस्वरूपी स्वच्छता करण्यात येणार आहे. २० सप्टेंबरला गावातील खाऊ गल्लीच्या ठिकाणी निघणाऱ्या कचऱ्यांची लोकसभा...
A cultural program : लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न -NNL

A cultural program : लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
माळाकोळी| लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे महात्मा बसवेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रा .मनोहर धोंडे यांच्या हस्ते श्रीची आरती करण्यात आली . यर नांदेड येथील लावणी डाॅ.विद्याश्री शिवाजी यमचे या बालिकेने विवीध गाण्यावर आपले नृत्य सादर केले. कु.अंकिता सुधाकर दगडगावे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवला त्यांनी कराटेचे महत्व पटवून दिले.महिलासाठी कराटे काळाची गरज आहे असे सांगितले. बरोबर लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गावातील बालगोपाळानी आपली कला सादर केली. मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक माधव झरे,अरुण खेडकर,बसवेश्वर नागसाखरे, विरभद्र मिटकरे ,संतोष वंलाडे, मारोती नागसाखरे ,माधव नेळगे, संतोष नेळगे ,शिवा खेडकर,सिध्देश्वर खेडकर, नागनाथ नागसाखरे ,विश्वनाथ नेळगे ,बसवेश्वर नेळगे ,शिवलींग नागसाखरे , नामदेव का...
error: Content is protected !!