Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Naigaon Legislative Assembly : नायगाव विधानसभेचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी -NNL

Naigaon Legislative Assembly : नायगाव विधानसभेचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/नायगांव| नायगाव विधानसभेचे आमदार यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत असा घनघात रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी राजेश पवार यांचा नामउल्लेख न करता शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगांव येथे आयोजित केलेल्या सहविचार सभेमध्ये घनाघाती टीका केली. पांडुरंग शिंदे यांनी म्हटले की, अडीच लाख लोकातून एक हनुमान म्हणून आमदाराला आपण विधिमंडळामध्ये पाठवत असतो, हनुमानाचे काम आहे ,या भागातील सर्वसामान्य लोकांचे दुःख, वेदना ह्या सभागृहामध्ये मांडून या प्रश्नाला वाचा फोडणे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, विमा कंपनी शेतकऱ्याला फसवत आहे आणि शेतकऱ्याला सरकारची आर्थिक मदत मिळत नाही, पीक कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना दारात उ...
Motor vehicle department employees : प्रलंबित रास्त मागण्यांसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर -NNL

Motor vehicle department employees : प्रलंबित रास्त मागण्यांसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड,अनिल मादसवार| मोटार वाहन विभागासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय पारित केला आहे. शासन निर्णयास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. परंतु सदर आकृती बंधाच्या अंमलबजावणीसाठी शासन/प्रशासन स्तरावर कोणतीही ठोस कार्यवाही दिसून येत नाही. यामुळे राज्यातील मोटार वाहन विभागातील सर्व कर्मचारी भयभीत व भवितव्याबाबत चिंतीत झाले असून, प्रलंबित रास्त मागण्यांसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असे सांगण्यात आले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मोटार वाहन विभागासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय पारित केला. मात्र आकृतीबंधाची योग्यरित्या पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी न करता, कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरेल...
demands of journalists’ association : माहूर शहरातील मुख्य रस्त्यावरील मास-मच्छीचे दुकाने तात्काळ हटवा – पत्रकार संघटनेची मागणी -NNL

demands of journalists’ association : माहूर शहरातील मुख्य रस्त्यावरील मास-मच्छीचे दुकाने तात्काळ हटवा – पत्रकार संघटनेची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर हे एक साडेतीन शक्ती पीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकास माहूरला आल्यानंतर सर्वप्रथम दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आशातच काही दिवसावर शारदीय नवरात्रोत्सवला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील घाण व मुख्य रस्त्यावरील मास-मच्छीचे दुकाने तात्काळ हटवा, अशी मागणी युवा ग्रामीण पञकार संघ माहूरच्या वतीने करण्यात आली आहे. माहूर शहर लागताच येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरातील वळण रस्त्यालगत असलेल्या घाटात मास विक्रत्याकडून फेकलेल्या मासांचा व शहरावातील मृत जणावरांचा दुर्गंध घ्यावा लागत आहे.येथून हाकेच्या आंतरावर असलेल्या मौजे मालवाडा येथील शाळकरी विध्यार्थीना देखील याच रस्त्याने पायी ये-जा करत असतांना अक्षरशः नाक दाबून प्रवास करावा लागत आहे.थोड्याच दिवसावर शारदीय नवरात्रोत्सव येत आहे. त्यामुळे ब...
Nanded bandh : जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

Nanded bandh : जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नांदेड शहरासह सर्वच तालुक्यात बंद पुकारून सकल मराठा समाजाच्या वतीने या निर्दयी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. मागील दोन दिवसापूर्वी मराठा समाजाच्या वतीने शासनाला अल्टीमेटम देत दोन दिवसात मागण्या मान्य करून जरांगे पाटलांचे उपोषण सोडवा अन्यथा नांदेड जिल्हा बंद ची हाक देण्यात येईल असा खरमरीत ईशारा देऊन सुद्धा सरकार च्या वतीने कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने आज नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्यात सुद्धा कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला सर्व व्यापारीवर्ग, शाळा, खाजगी शिकवणी, स्कुल बस,या सह सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद पाळण्यात आला. काल सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व असोसिएशनला संपर्क साधुन बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. एस टी महामंडळा सह सर्वच ठिकाणी प्रशासनाने योग्य ती ...
Mukhed rural college : मुखेड तालुक्यातील ग्रामीण महाविद्यालयात पाळीव प्राणी या विषयावर रांगोळी स्पर्धा संपन्न -NNL

Mukhed rural college : मुखेड तालुक्यातील ग्रामीण महाविद्यालयात पाळीव प्राणी या विषयावर रांगोळी स्पर्धा संपन्न -NNL

नांदेड, करियर
नांदेड| मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी रांगोळी स्पर्धा घेण्यात येते, या वर्षीही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन ही स्पर्धा अतिशय आनंददायी वातावरणात पार पडली. प्राचार्य डॉ. हरिदास राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख. प्रा. डॉ. श्रीनिवास पवार यांच्या सहकार्याने व प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांच्या संकल्पनेतून वरील ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला व धाराशिव या जिल्ह्यातील एकुण ८७ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी गाय-वासरू, ...
Vande Bharat Railway line : वन्दे भारत रेल्वे मार्गात हजुरसाहिब नांदेडला जोडण्याची मागणी -NNL

Vande Bharat Railway line : वन्दे भारत रेल्वे मार्गात हजुरसाहिब नांदेडला जोडण्याची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| भारत देशात प्रवासी वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडवणाऱ्या वन्दे भारत या जल्दगती रेल्वे गाडीच्या मार्गात पवित्र पावन स्थल हजुरसाहेब नांदेड रेल्वे स्थानाकास जोडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र सिख असोसिएशन मुंबई तर्फे करण्यात आली. रविवार, दि. 22 सप्टेम्बर रोजी महाराष्ट्र सिख असोसिएशन मुंबईचे समन्वयक स. मलकीत सिंघ बल यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री नित्यानंद राय यांची भेट घेऊन वरील मागणी प्रस्तुत करण्यात आली. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीर सिंघ यांची ही उपस्थिती होती. महाराष्ट्र सिख असोसिएशनचे मुख्य संयोजक सरदार दलजीत सिंघ बल यांनी वरील विषयी माहिती देताना सांगितले की सध्या वन्दे भारत रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रमुख केंद्रांना जोडण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. देशातील अनेक धार्मिक स्थळांना वन्दे भारतच्या मार्गाने जोडण्यात येत ...
Vanchit Bahujan Aghadi branch : हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात अनावरण -NNL

Vanchit Bahujan Aghadi branch : हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात अनावरण -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा बु, सिरंजनी, धानोरा, पोटा, कांडलीसह ईतर गावात दि.२१ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या भव्य शाखा अनावरण सोहळा व मोजे पोटा बुद्रुक येथे कार्यकर्ता संवाद मेळावा नांदेड जिल्ह्याचा ढाण्या वाघ सन्माननीय राजेश्वर हत्तीअंबोरे पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बहुजनाचे कैवारी एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा क्षेत्रातील हिमायतनगर तालुका कार्यकारिणीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या भव्य शाखा अनावरण सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. तालुक्यातील मौजे पारवा बु. सह अनेक गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे शाखा अनावरण हर्षोल्लास, आतिषबाजी व ब्यांड बाजाच्या गजरात करण्यात आले. तसेच मौजे पोटा बुद्रुक येथे शाखा अनावरण व कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्ह्याचा ढाण...
Akshay Shinde’s firing : अक्षय शिंदेचा गोळीबार, पोलिसांच्या प्रत्युत्तरात झाला ठार, विरोधकांकडून चौकशीची मागणी -NNL

Akshay Shinde’s firing : अक्षय शिंदेचा गोळीबार, पोलिसांच्या प्रत्युत्तरात झाला ठार, विरोधकांकडून चौकशीची मागणी -NNL

क्राईम, मुंबई
मुंबई| बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला घेऊन पोलीस पथक ठाण्याकडे जात असताना आरोपीने एका हवालदाराची बंदुक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ठरवून अक्षय शिंदेला गोळी झाडून एन्काउंट केला असल्याचा आरोप करत विरोधकांकडून केला जात असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार, बदलापूर पोलिस तळोजा कारागृहात आरोपी शिंदेला त्याच्या दुसऱ्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस मुंब्रा बायपासजवळ आले असता आरोपी अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या कंबरेवरून रिव्हॉल्व्हर काढून 3 राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी मोरे यांच्या मांडीला लागली, ...
Sewage Management : हाडोळी ग्रामपंचायतीला सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त -NNL

Sewage Management : हाडोळी ग्रामपंचायतीला सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भोकर तालुक्यातील हाडोळी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत (सन २०२०-२१ व २०२१-२२ एकञीत) सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख २ लाख रुपये, प्रमाणपत्र, व स्मृतिचिन्ह असे होते. हाडोळी ग्रामपंचायतीने वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, वृक्षलागवड, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांद्वारे आपली कामगिरी सिद्ध केली आहे. यापूर्वी देखील या ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले असून आता या विशेष पुरस्काराने त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर...
Cm ladaki bahin ; मा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठकीचे बुधवारी आयोजन -NNL

Cm ladaki bahin ; मा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठकीचे बुधवारी आयोजन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भिमरावजी केराम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक दि,२५ रोजी होणार असल्याचे पत्र तहसीलदार माहूर यांनी काढले आहे. सदर बैठकीस गटविकास अधिकारी पंचायत समिती, माहूर अंतर्गत ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, महिला बचतगट, तालुका आरोग्य अधिकारी व सर्व आशा वर्कर, महिला आरोग्य कर्मचारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत सर्व महिला, अंगणवाडी सेविका / सुपरवायझर,तसेच नगरपंचायत माहूर मुख्यधिकारी यांच्या अधिनिस्त महिला बचत गट व अंगणवाडी सेविका यांना आपल्या स्तरावरून सर्वानी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवार दि,२५ऑक्टोबर रोजी दू,१२वा. बालाजी मंगलम,माहूर येथे बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे, "काय आहे लाडकी बहीण योजना" महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील म...
error: Content is protected !!