श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर हे एक साडेतीन शक्ती पीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकास माहूरला आल्यानंतर सर्वप्रथम दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आशातच काही दिवसावर शारदीय नवरात्रोत्सवला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील घाण व मुख्य रस्त्यावरील मास-मच्छीचे दुकाने तात्काळ हटवा, अशी मागणी युवा ग्रामीण पञकार संघ माहूरच्या वतीने करण्यात आली आहे.


माहूर शहर लागताच येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरातील वळण रस्त्यालगत असलेल्या घाटात मास विक्रत्याकडून फेकलेल्या मासांचा व शहरावातील मृत जणावरांचा दुर्गंध घ्यावा लागत आहे.येथून हाकेच्या आंतरावर असलेल्या मौजे मालवाडा येथील शाळकरी विध्यार्थीना देखील याच रस्त्याने पायी ये-जा करत असतांना अक्षरशः नाक दाबून प्रवास करावा लागत आहे.थोड्याच दिवसावर शारदीय नवरात्रोत्सव येत आहे. त्यामुळे बाहेर गावावरुण येणार्या भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर स्थानीक नगर पंचायत प्रशासनाने शहरातील घाणीकडे व दुर्गंधीकडे लक्ष घालून स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.त्याच बरोबर शहरातील मुख्य रस्त्यावरील सर्व पथदिवे हे कित्येक दिवसापासून बंद असून त्याकडे नगरपंचायतचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.

हे कुठेतरी श्री क्षेत्राच्या अस्मितेचा प्रश्न असून ही एक निंदनीय बाब आहे. हे लक्षात घेऊन न.पंचे मुख्याधिकार्या सदर बाबीची दखल घेऊन माहूरच्या अस्मितेला कुठलाही डाग लागू नये याचा विचार करत तातडीने मुख्य रस्त्यावरील मास-मच्छीचे दुकाने हटवावे अशी मागणी युवा ग्रामिण पञकार संघाने निवेदनातून केली आहे.सदरील निवेदनावर युवा ग्रामीण पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष गोपाल खापर्डे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष आदेश बेहेरे, सदस्य प्रवीण बर्डे, उपाध्यक्ष समाधान कांबळे, अनिल मेडपेलवार,शंकर भालेराव व अंबादास मुकटे व इतर पदाधिकार्यांच्या साक्षर्या आहेत.
