Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
father man : बाप माणूस; पुस्तक परिचय – लेखक….एस बी जाधव – NNL

father man : बाप माणूस; पुस्तक परिचय – लेखक….एस बी जाधव – NNL

नांदेड, लेख
"चळवळीतला उपेक्षित ‘बाप’ माणूस" या पुस्तकाचे परीक्षण करताना, लेखकाने स्व. बसवंतराव मुंडकर यांच्या कार्यावर सखोल विचार मांडला आहे. पुस्तकाची मांडणी इतिहास, समाज आणि व्यक्तिगत अनुभवांच्या आधारावर करण्यात आली आहे, ज्यामुळे ते वाचकाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडते. प्रथमदृष्ट्या, पुस्तकाचे शीर्षकच वाचकाला आकर्षित करते. "उपेक्षित ‘बाप’ माणूस" हे शीर्षक फक्त व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत नाही, तर चळवळीत मोलाचे योगदान देऊनही दुर्लक्षित राहिलेल्या नायकांच्या संघर्षांवर प्रकाश टाकते. बसवंतराव मुंडकर हे एक अशा व्यक्तींपैकी होते, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरच्या समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु त्यांचे कार्य बर्‍याच वेळा अज्ञात राहिले. लेखकाने मुंडकरांच्या लढाऊ वृत्तीचे आणि धाडसाचे वर्णन अत्यंत सजीवपणे केले आहे. किशोरवयातच त्यांनी स्वातंत्र्याच्या आणि सामाजिक च...
Students should pay attention to how : अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

Students should pay attention to how : अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर| विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. असे प्रतिपादन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं. ते हिमायतनगर येथील भूमिपुत्र तथा सध्या अलिबाग येथे राहणारे डॉ. प्रशांत कुमार जन्नावार यांची कन्या हृतिका प्रशांत जन्नावार हिस LLM मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले. नुकतेच पुणे येथे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते सुवर्ण पदक देऊन नुकताच सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर दिनांक २६ रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट व आर्य वैश्य समाजच्या वतीने आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याच्या मंचावरून बोलत होते. यावेळी मंचावर सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्यध्यापक...
Market Committee concluded : किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न -NNL

Market Committee concluded : किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न -NNL

नांदेड, कृषी
किनवट,परमेश्वर पेशवे| आज किनवट येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वार्षिक सर्व साधारण सभा 2023 ते 2024,घेण्यात आली त्यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या व सूचना दिल्या व त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितेचे सभापती गजानन पाटील मुंढे यांनी शेतकऱ्याचे निवरण करणार असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचना व मागण्या केल्या त्यावर संचालक नवीन राठोड, संचालक श्रीराम कांदे, संचालक सुनील लक्ष्मण घुगे,व संचालक बालाजी गोविंद बामणे यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवर आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आश्वासित केले व उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हाद तुकाराम सातव, तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड,संचालक नवीन अशोक राठोड, संचालक श्रीराम माणिक कांदे, संचालक संतोष दासरवार सर,संचालक बालाजी गोविंद बामणे,संचालक सुनील लक्ष्मण घुगे,संचालक शेख हैददर मुसा व शेतकरी बांधव,संचालक मंडळ व आदिवासी...
Islands of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग 3) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Islands of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग 3) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक किती वाजता उठायचे हे रात्री मनाला सांगितले की,त्या वेळेस आपोआप अलार्म वाजल्या सारखी जाग येते ही मला चांगली सवय लागली आहे. मध्यरात्री दोनच्या आधीच जाग आली. हॉटेलच्या काउंटरवर फोन करून सर्वांना वेकअप कॉल करण्यास सांगितले. तीन वाजता सर्वजण हॉटेलच्या लॉबीमध्ये जमा झालो. आम्ही केलेल्या दोन बस वाट पाहत उभ्याच होत्या. पंधरा मिनिटात आम्ही सर्वजण राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे पोंहचलो. बहुतेकांनी यापूर्वी विमान प्रवास केलेला होता. जे टुरिस्ट पहिल्यांदा विमानात बसणार होते त्यांना संदीप मैंद,जयंत वाणी व माझ्यासोबत राहण्याच्या सूचना दिल्या. हैदराबाद विमानतळाच...
Ravana Baba Waghmare : दोन ऑक्टोबर रोजी रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमाला -NNL

Ravana Baba Waghmare : दोन ऑक्टोबर रोजी रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमाला -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड येथे दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह सिडको ( नविन नांदेड ) येथे रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले असून 'आंबेडकरवाद आणि मातंग समाज' या विषयावर आंबेडकरी चळवळीतील युवा नेते प्रा. राजू सोनसळे हे व्याख्यान देणार आहेत. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेचे संस्थापक तथा साप्ताहिक दावेदार या वृत्तपत्राचे संपादक बा.रा. वाघमारे यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे दरवर्षी आयोजन केले जाते व्याख्यान मालेचे हे सोळावे वर्षे आहे. नवीन नांदेड सिडको येथील अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. गणपत वाडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत, तर अॅड. चंद्रप्रकाश सांगवीकर यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सिडको, नांदेड आणि कं...
CIDCO : सिडको कार्यालय येथे आयोजित समाधान शिबीरास नागरीकांच्या ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

CIDCO : सिडको कार्यालय येथे आयोजित समाधान शिबीरास नागरीकांच्या ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| प्रथमच सिडको नवीन नांदेड कार्यालय येथे नागरीकांच्या विविध अडचणी व अनेक प्रलंबित प्रश्नी प्रभारी प्रशासक कपील राजपूत व प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली, यावेळी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सह नागरीक सहभागी झाले. सिडको येथील समाधान शिबिराचे आयोजन सिडको मुख्य प्रशासक भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शना खाली सिडको नांदेड कार्यालयात दोन दिवसीय समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नागरिकांनी विविध प्रश्नासंबंधी प्रशासक यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. दि 26 व 27 सप्टेंबर या दोन दिवस शिबिर होत असून पहिल्या दिवशी पासून नागरिकांची कार्यालयात मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदविली, यात मूळ घर मालक यांच्या हस्तांतरण बाबत ,मोंढा प्रकल्प विकास कामे ,अभय योजना भूखंड व घर हस्तांतरण ,बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या...
Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

महाराष्ट्र, मुंबई
शिर्डी| ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री-महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.स...
Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL

Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL

नांदेड, राजकीय
छत्रपती संभाजीनगर| राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर श्री. बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केले. श्री. बागडे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व व राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त श्री.बागडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री.रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्ट मैदान, येथे झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड...
Chief Minister’s Youth Training Meeting : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड -NNL

Chief Minister’s Youth Training Meeting : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात औद्योगिक आस्थापना, खाजगी शाळा, महाविद्यालय, महामंडळे, एमएसईबी अशा विविध 65 आस्थापनांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती आयोजित केल्या होत्या. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बारावी, पदवी, पदवीका उत्तीर्ण अशा जवळपास 645 उमेदवारांनी या मेळाव्यात नोंदणी केली. त्यापैकी 400 पेक्षा अधिक उमेदवाराना प्राथमिक निवड विविध आस्थापनावर करण्यात आली आहे. कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र बनविण्यासाठी तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य मेळावा आयोजित करण्यात येत आहेत. या मेळाव्यास कौशल्य रोजगार उद्योजकता...
Outbreaks of monkeypox virus : मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना -NNL

Outbreaks of monkeypox virus : मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना -NNL

नांदेड, आरोग्य, देश विदेश
नवी दिल्ली| केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1b चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे. 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचणीसाठी ठरवलेल्या प्रयोगशाळांची यादी देखील दिली आहे. जारी केलेल्या निर्देशामध्ये रुग्णालयीन व्यवस्थापन, रोग प्रतिकारक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी विशेष धोरणांचा समावेश केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, 14 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाला आंतरराष्ट्री...
error: Content is protected !!