Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Swachhata abhiyan ; महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गोंडजेवलीतांडा येथे स्वच्छता मोहीम -NNL

Swachhata abhiyan ; महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गोंडजेवलीतांडा येथे स्वच्छता मोहीम -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
शिवणी, भोजराज देशमुख। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी खूप सुंदरपणे नियोजन करून बालसभा घेतली निवडक विद्यार्थ्यांची भाषणे यावेळी झाली तसेच स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात , सार्वजनिक ठिकाण, मंदिर परिसर, स्वच्छता मोहीम राबवून शालेय परिसर व गावातील मुख्य रस्ता स्वच्छ केला. गावातील ग्रामस्थ यांनीही नाली व रस्ता स्वच्छता करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मदत केली.विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व या उपक्रमातून समजण्यास मदत झाली. ‘स्वच्छता कशी चांगली ठेवता येईल. शौचालयाची स्वच्छता नीट झाली पाहिजे, जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. गावातील स्वच्छतेचे प्रश्न यावर गांभीर्याने दखल...
Navratri festival starts : नवसाला पावणाऱ्या कालिंका मंदिरात घटस्थापना व अलंकार सोहळ्याने नवरात्रोत्सव प्रारंभ -NNL

Navratri festival starts : नवसाला पावणाऱ्या कालिंका मंदिरात घटस्थापना व अलंकार सोहळ्याने नवरात्रोत्सव प्रारंभ -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीची कुलस्वामिनी नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता पूजेचे मानकरी यांच्या हस्ते व पुरोहित कांता गुरु वाळके व साईगुरु बडवे यांच्या मधुर वाणीत अभिषेक व अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी महाआरती करून प्रसादाचे वितरण झाले, आगामीं नऊ दिवस मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. नवरात्रोत्सवात नित्यनेमाने दररोज सकाळी आणि रात्री महाआरती केली जाणार आहे. दि.०३ गुरुवार ते दि.०९ बुधवार पर्यंत दररोज दुपारी ०१ ते ७ या वेळेत संगीतमय देवी भागवत कथा हभप एड नारायण महाराज सोनखेडकर यांच्या मधुर वाणीत होणार आहे. दररोज आरतीनंतर सायंकाळी कालिंका देवी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. देवी भागवत कथेचा समारोप शेवटच्या दिवश...
Himayatnagar to protest : लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगरात घोषणाबाजी -NNL

Himayatnagar to protest : लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगरात घोषणाबाजी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। ओबीसी योध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे दिनांक ०३ ऑगस्ट रोजी निषेध रॅली काढण्यात आली. शहरासह तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी १२ वाजता परमेश्वर मंदीरासमोर उपस्थित होऊन काळ्या पट्ट्या बांधून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करत झुंडशाही करणाऱ्या समाजकंठकांचा जाहीर निषेध केला. मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष ओबीसी समुहाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दि. ३० रोजी सार्वजनिक रस्त्यवर गाठून मराठा जातीच्या गुंडानी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जीवघेणा हल्ला केला. सदरील घटना सोशल मिडीयावर प्रभावित करून त्याना बदनाम करण्याचे कटकारस्थान काही लोकांनी व समाजकंठकानी केल्याचे, ओबीसी समाजाच्‌या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी रैली काढण्यात येऊन श्री परमे...
Darshan of Kalinka Mata : नवसाला पावणाऱ्या वाढोण्याच्या कालिंका माता दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व -NNL

Darshan of Kalinka Mata : नवसाला पावणाऱ्या वाढोण्याच्या कालिंका माता दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व -NNL

नांदेड, धार्मिक, लेख
हिमायतनगर (अनिल मादसवार) वाढोणा शहराच्या उत्तरेच्या बाजूस असलेल्या कालिंकामाता मंदिराला कल्याणीच्या चालुक्य कालखंडाचा इतिहास आहे. याचे पुरावे मंदिर स्थापत्याचे हेमाडपंथी शिळांच्या अवशेषावरून दिसून येतात. या मंदिराची स्थापना १६७९ साली झाली असून, आज ३५५ वर्ष पूर्ण होत आहेत. हिमायतनगर वाढोण्याची कुलदैवत कालिंका माता हि नवसाला पावणारी असून, मनोकामना करणाऱ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात कालिंका मातेच्या दर्शनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तसृंगी, अश्या साढेतीन शक्तिपीठे असलेल्या देवीचे सामर्थ्य आणि कर्तत्व सर्वांनाच माहित आहे. आदिशक्ती, आदिमाया, अंबाबाई, जगदंबा, महाकाली, भद्रकाली, कृपालिनी, चामुंडा, दुर्गादेवी, चंडिका, अश्या विविध नावाने ओळखल्या जाते. हिमायतनगर येथील क...
Venkatesh Balaji Temple : हिमायतनगर वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सवाची अभिषेक घटस्थापनेच्या झाली सुरुवात – NNL

Venkatesh Balaji Temple : हिमायतनगर वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सवाची अभिषेक घटस्थापनेच्या झाली सुरुवात – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा शहरातील पुरातन कालीन भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवारी तारीख ०३ रोजी सकाळी ४ वाजता अभिषेक महापूजेनंतर घटस्थापनेणे ब्रम्होत्सवाला सुरुवात झाली असून, दहा दिवसाच्या पर्वकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुरोहित कांतागुरु आणि गजुगुरु वाळके यांनी दिली असून, भाविक भक्तांनी ब्रम्होत्सव काळात व्यंकटेश बालाजीचे नित्यनेमाने दर्शन घेऊन पुण्य पदरी पाडून घ्यावे असे आवाहन त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. या तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सव आणि ब्रम्होत्सवाची सुरुवात झाली आहे. हिमायतनगर वाढोणा येथील व्यंकटेश बालाजी मंदिरात अनादिकाला पासून चालत आलेल्या परंपरेनुसार पहिल्या दिवशी घटस्थापना गुरुवार दिनांक ०३...
Tribal community block road ; धनगर जातीचे अनुसूचित जमाती (ST) मध्ये समावेश न करण्यासाठी आदिवासी समाजाचा राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको -NNL

Tribal community block road ; धनगर जातीचे अनुसूचित जमाती (ST) मध्ये समावेश न करण्यासाठी आदिवासी समाजाचा राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। संपूर्ण महाराष्ट्रात जातीवरून राजकारण चांगलेच तापले असून, हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नुकतेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे पत्र सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. तयानंतर आदिवासी समाज बांधवांनी तीव्र विरोध करत दिनांक 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर धनगर जातीला अनुसूचित जमाती (ST)मध्ये समावेश करून घेण्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग काही तास ठप्प झाला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये बेकायदेशीर शासन निर्णय काढून समाविष्ट करण्यासाठी बैठका बोलावून धनगर जातीला आश्वासित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना ह्याचा अधिकार नसताना सुद्धा त्यांच्या कडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कट कारस्थान या शासनाच्...
Retired employees got justice ; महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम देण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश – NNL

Retired employees got justice ; महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम देण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी वारंवार महानगरपालिका प्रशासनास सातव्या वेतन आयोगाची रक्कम आदा करण्यासाठी विनंती करीत होते. परंतु सेवानिवृत्तीनंतरही त्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळाला नाही व महानगरपालिकेतर्फे याप्रकरणी कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नव्हते. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ॲड.प्रियंका शिंदे व ॲड. रुपेश हाके यांच्यामार्फत माननीय मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती.या याचिकेत मा. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने व्याजासह तीन टप्प्यात लाभ देण्याचा निर्णय दिला होता. परंतु या निर्णयाच्या विरोधात महानगरपालिका प्रशासनाने सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पेटिशन दाखल केले होते. ते सुप्रीम कोर्टाने 20 सप्टेंबर 2024 रोजी फेटाळले. पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यास परवानगी दिली. याप्रकरणीच 25 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात रिव्यू पिटीशनसह ...
Protest rally : लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी निषेध रॅली -NNL

Protest rally : लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी निषेध रॅली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर। सकल ओबीसी समाज संघटणेच्या वतीने ओबीसी योध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे निषेध रॅली काढण्यात येत आहे. तरी तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी सकाळी ठीक 10 वाजता परमेश्वर मंदीरा समोर उपस्थित राहावे. असे आवाहन ओबीसी समाज संघटणा ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, दिलीप आला राठोड यांनी केले आहे. या संदर्भाने देण्यात आलेल्या निवेदनात म्हणाले आहे कि, मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष ओबीसी समुहाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दि. ३० रोजी सार्वजनिक रस्त्यवर गाठून मराठा जातीच्या गुंडानी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जीवघेणा हल्ला केला. सदरील घटका सोशल मिडीयावर प्रभावित करून त्याना बदनाम करण्याचे कटकारस्थान त्या समूहातील काही लोकांनी व समाजकंठकानी केल्याचे दिसून येत असून, त्यामुळे ओबीसी समाजाच्‌या भावना दुखावल्याने सकल ओबीसी समाजाच्या वतीने...
Education : शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

Education : शिक्षण हेच विकासाचे द्वार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

करियर, मुंबई
गडचिरोली। शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आद...
Marathwada Mukti Sangram Jagar : मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा नांदेड येथील महात्मा गांधी पुतळा समोर समारोप -NNL

Marathwada Mukti Sangram Jagar : मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा नांदेड येथील महात्मा गांधी पुतळा समोर समारोप -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड। राज्य मराठी पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड.यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा समारोप नांदेड येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी विचारमंच आणि राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोंबर 2024 हा मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील समाधी स्थळापासून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी निवृत्त सैनिक संतोष लोखंडे यांचा महात्मा गांधी पुतळ्यासमोर सन्मान करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ऍड.धोंडीबाराव पवार, डॉ. शिवदास हमंद, ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, राजकुमार ब...
error: Content is protected !!