Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Nana Patole : राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज: नाना पटोले -NNL

Nana Patole : राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज: नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई/नागपूर| महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. शासन व प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यांना फक्त मलई खाण्यात जास्त रस असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला असुरक्षित आहेत पण सरकारने याची जबाबदारी घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी व अशा घटनांना पायबंद घालावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलातना नाना पटोले म्हणाले की, पुण्यात शाळकरी मुलीवर ड्रायव्हरने अत्याचार केला, त्याआधी एका कॉलेजमध्ये मुलीवर अत्याचाराची घटना घडली. आणि आता बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना झाली हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. सावित्रीबाईच्या भूमीत अशा घटना वाढ...
Naseem Khan : पोलीस अधिकारी व बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत: नसीम खान -NNL

Naseem Khan : पोलीस अधिकारी व बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत: नसीम खान -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| मुंबई महानगरपालिका आणि पवई पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी बिल्डरशी संगनमत करून ६ जूनच्या पहाटे जयभीम नगरमधील गरीब कुटुंबांच्या घरावर कारवाई करून त्यांना बेघर केले. या कारवाईतील बीएमसी अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करून पोलीस उपायुक्त, एस वार्डचे वार्ड अधिकारी, पालिका उपायुक्त आणि पवईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीचा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान यांनी पुन्नरुच्चार केला आहे. यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली नियमबाह्य कारवाई करून पवईच्या जयभीम नगर मधील ६०० कुटुंबियांना भर पावसाळ्यात बेघर करण्यात आले. यासंदर्भात एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते, आज एसआयटीच्या अहवालावर सुनावणी करताना क...
Nanded North Vidhan Sabha ; नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपाला सुटण्याची शक्यता वाढली – NNL

Nanded North Vidhan Sabha ; नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपाला सुटण्याची शक्यता वाढली – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून युती धर्माचे पालन करून शिवसेनेची जागा निवडून आणली होती. वास्तविक पाहता शिवसेनेचे कोणतेही संघटनात्मक काम या मतदारसंघांमध्ये नव्हते परंतु भाजपाच्या नेत्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेऊन नगरसेवक असणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आमदार बनविले. येणार्‍या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीधर्माचे पालन करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजपाचे नेतृत्व कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्याची पराकाष्ठा करणार आहे असे मत छत्तीसगड येथील भाजपाचे प्रवासी नेते आशु चंद्रवंशी यांनी नांदेड येथे व्यक्त केले. नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक आढावा बैठकीमध्ये ते बोलत हो...
B.B.A. in ‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात बी.बी.ए. अभ्यासक्रम सुरू – NNL

B.B.A. in ‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात बी.बी.ए. अभ्यासक्रम सुरू – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलामध्ये बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेन (बी.बी.ए.) या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरु करण्यात आलेली आहे. सदरील अभ्यासक्रम हा व्यवसाय तसेच उद्योजकता व्यवस्थापनातील शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेया नांदेड विद्यापीठ परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या पात्रता प्रवेश (CET) परीक्षेतील गुणानुसार ऑनलाईन माध्यमातून राज्य शासनाच्या प्राधिकरणाच्या CAP-राऊड-२ पासून प्रवेश देणे सुरू झालेले आहेत. आता उर्वरित राऊंडमध्ये प्रवेश दिला जाणार असून विज्ञान शाखेतील जीवशास्त्र किंवा गणित विषय घेऊन शिकणारे विद्यार्थी या अभ्यासक्...
Entry of Muslim citizens into BJP : उबाठा शिवसैनिकांसह मुस्लिम नागरिकांचा भाजपात प्रवेश -NNL

Entry of Muslim citizens into BJP : उबाठा शिवसैनिकांसह मुस्लिम नागरिकांचा भाजपात प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
बारड/नांदेड| बारड येथील उबाठा गटाचे अनेक शिवसैनिक व मुस्लीम समाजातील नागरिकांनी बुधवारी भाजपा मुदखेड प्रभारी बाळासाहेब देशमुख बारडकर याच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये राम बालाजी गायकवाड, आत्माराम मारोतराव सोळंके, गोपाळ मारोती गायकवाड, नंदू शहापुरे, सैय्यद गौस, दौलत भाई, बबलू पिंजारी, इस्माईल चांदसाब, हाजी अब्दुल रज्जाक, फतरू सहाब, जमील मोमीन, मजहर शेख ग्रा.पं. सदस्य, जावीद मोमीन, हाफिज पिंजारी, आजम शेख, मुख्तार मेहबुब शेख आदींचा समावेश आहे. येथील श्री लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आयोजित भाजप बुथ समिती प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान झालेल्या पक्ष प्रवेशाच्यावेळी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी खटिंग, गोविंदराव शिंदे नागेलीकर, लक्ष्मणराव जाधव, उद्धवराव पवार, सभापती आनंदराव गादीलवाड, निले...
Nationalist congress party ; नांदेडच्या नागरी सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार आक्रमक -NNL

Nationalist congress party ; नांदेडच्या नागरी सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार आक्रमक -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेडच्या महानगरपालिका प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात नागरी सुविधा पुरवाव्यात अन्यथा आगामी काळात पूनश्च रस्त्यावर येऊन तिव्र जनआंदोलन उभारण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते,माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आज दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या नागरी सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष आज चांगलाच आक्रमक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेड शहरातील विविध नागरी समस्या निवारणासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखालील या धरणे आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी केले होते. गुंठेवारीची मुदत वाढवून देण्यात यावी,शहरात शुद्ध प...
Politics news ; महेश देशमुख तरोडेकर यांच्याकडून नांदेड उत्तर मतदारसंघात.. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन जन आशिर्वाद यात्रेला सूरुवात -NNL

Politics news ; महेश देशमुख तरोडेकर यांच्याकडून नांदेड उत्तर मतदारसंघात.. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन जन आशिर्वाद यात्रेला सूरुवात -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। समाजकारणातून राजकीय वाटचालीत अग्रेसर असलेले नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आजपासून जन आशिर्वाद यात्रेला प्रारंभ केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा मरळक (बु.) येथे आयोजित या कार्यक्रमाला नांदेडचे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रविंद्र चव्हाण,नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा,नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार,नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व आयोजक महेश देशमुख तरोडेकर,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण भवरे, काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे,तालुकाध्यक्ष निरंजन पावडे,अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सत्यपाल सावंत,संजय...
Online farmer registration ; मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू – NNL

Online farmer registration ; मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू – NNL

कृषी, नांदेड
नांदेड|  केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एन.सी.सी.एफ च्यावतीने जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 13 खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीसाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे. प्रत्यक्षात मुंग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या खरेदी केंद्रात मुखेड तालुक खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पान्न बाजार समिति किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पं...
Prohibition of assembly, ceasefire ; जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  – NNL

Prohibition of assembly, ceasefire ; जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यात 4 ऑक्टोबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 4 ऑक्टोबर चे सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मि...
firecrackers license ; तात्‍पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

firecrackers license ; तात्‍पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | वर्षे-2024 मध्‍ये दिपावली उत्‍सव 28 ऑक्‍टोंबर ते 3 नोव्‍हेंबर 2024 या कालावधीत साजरा होत आहे. त्‍यानिमित्‍त नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना जि‍ल्‍हादंडाधिकारी हे निर्गमित करणार आहेत. जिल्‍हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरता फटाका परवाना निर्गमित करण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत. त्‍यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 4 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख बुधवार 16 आक्‍टोंबर 2024 आहे.   तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यातील अर्...
error: Content is protected !!