Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Shri Hajur Sahib Gurdwara ; तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी अध्यादेश काढा – NNL

Shri Hajur Sahib Gurdwara ; तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी अध्यादेश काढा – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी अध्यादेश काढून न्याय द्यावा, अशी मागणी स.रणजितसिंघ गील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीष महाजन यांना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे. राज्यामध्ये ब्राम्हण व राजपुत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली याबद्दल आपले मनपुर्वक आभार, इतर समाजाला सुद्धा वेगवेगळ्या माध्यमाने आरक्षण व इतर सवलती सुद्धा शासन देत आहेत. सिख समाजाला आजपर्यंत कोणतेही आरक्षण किंवा सवलती दिल्या नाहीत. उलट वेळोवेळी नांदेड येथील तख्त सचखंड गुरूद्वारा मालकीची हजारो एकर जागा विकासासाठी घेण्यात आली. तसेच मागील खुप वर्षापासून गुरूद...
Tirtha Darshan Yojana ; मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना घेवून नांदेड येथून पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी होणार रवाना – NNL

Tirtha Darshan Yojana ; मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना घेवून नांदेड येथून पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी होणार रवाना – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड येथून ज्येष्ठ नागरिकांना घेवून पहिली ट्रेन 12 ऑक्टोबर 2024 रोजी निघणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली आहे. तरी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे....
Vyoshree Yojana ; मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर – NNL

Vyoshree Yojana ; मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली. या योजनेत साहित्य खरेदी करण्यासाठी महाडिबीटीद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात 3 हजार रुपये रक्कम एकदा जमा करण्यात येणार आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर इत्यादी साहीत्य खरेदीसाठी रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 पर्यत अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. तरी 4 ऑक्टोबर 2024 नंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, यांची सर्व पात्र ज्येष्ठ नागरिका...
Raja Rammohan Roy Library Foundation ; राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनांसाठी 30 नोव्हेंबर पर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Raja Rammohan Roy Library Foundation ; राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनांसाठी 30 नोव्हेंबर पर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन मुंबईचे ग्रंथालय संचालक अशाक गाडेकर यांनी केले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांगातर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या समान व असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. समान व असमान निधी योजनेच...
Nanded due to heavy rains : नांदेडला अतिवृष्‍टी होवून झालेल्या नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी -NNL

Nanded due to heavy rains : नांदेडला अतिवृष्‍टी होवून झालेल्या नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी -NNL

नांदेड, कृषी
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्‍हयात एक ते तीन सप्‍टेंबर 2024 या कालावधीत 62 मंडळात अतिवृष्‍टी होवून शेतीपीक व शेतजमीन नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अहवाल प्राप्‍त झाला. त्‍यानुसार नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्‍यात आला आहे. जिल्‍हा प्रशासनाकडून ग्रामस्‍तरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे करण्‍यात आले. राज्‍य शासनाकडून प्राप्‍त मान्‍यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविण्‍यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा 2 हेक्‍टरवरून 3 हेक्टरपर्यंत करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार ग्रामस्‍तरीय समितीमार्फत सदर नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे पुर्ण झाले आहेत व निधी मागणी विभागीय आयुक्‍त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सादर केली आहे. तालुका बाधित शेतकरी संख्या , एकूण बाधित क्षेत्र (हे.आर.), अपेक्षीत निधी (रक्कम कोटीत) पुढीलप्रमाणे आहे. नांदेड बाधित शेतकरी 34641 व...
Organized mass Mahabuddhavandan : ६८व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनेचे आयोजन -NNL

Organized mass Mahabuddhavandan : ६८व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| भ. बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमी दिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ७:०० वा महा बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक,धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय चळवळ असो किंवा धम्म परिषदांची सुरुवात असो, नांदेड शहराने नेहमीच दिशा दर्शकाचे काम केलेले आहे. एक धम्म अनुयायी बौद्ध म्हणून आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरांचा उत्साह तेजित ठेवण्यासा...
yellow alert : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी; विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता -NNL

yellow alert : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी; विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यासाठी 4 ते 8 ऑक्टोबर 2024 या चार दिवसासाठी येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. या चार दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 4 ते 8 ऑक्टोबर 2024 या चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या गोष्टी करा : १)विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा...
Accident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार एक गंभीर -NNL

Accident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार एक गंभीर -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| सारखणी ते माहूर या राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड नजीक दि.४ ऑक्टों.रोजी दु.४.३० वा.चे सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात माहुर शहरातील गोविंद गणपत शेवाळे ४५ वर्षे हा जागीच ठार झाला, तर पिंटू माणिक आत्राम हा जबर जखमी झाला आहे. शुक्रवार दि. ४ ऑक्टो. रोजी पिंटू मानिक आत्राम वय २५ रा. अंबाडी ता. किनवट हा वाई बाजार वरून सारखणीकडे जात होता. त्याचवेळी गोविंद गणपत शेवाळे हा सारखणी वरून माहूरकडे येत होता त्या वेळी हा अपघात झाला. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. १५/२०२४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून स. पो.नि.रमेश जाधवर हे पुढील तपास करीत आहेत....
Marathi Classic Language Pride Day : तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार -NNL

Marathi Classic Language Pride Day : तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्रीगण या बैठकीस उपस्थित होते. तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. यात म्हटले आहे की, या ऐतिहासिक निर्णयाबद्धल राज्य मंत्रिमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त करते, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रस्तावाचा आशय असा, मराठी भाषा मुळातच अभि...
Declare a public holiday : ऐतिहासिक धम्मभुमी-बौद्धलेणी बचाव महामोर्चा निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करा -NNL

Declare a public holiday : ऐतिहासिक धम्मभुमी-बौद्धलेणी बचाव महामोर्चा निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करा -NNL

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर। शहरात 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ऐतिहासिक धम्मभुमी बौद्ध लेणी बचाव महामोर्चा निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे आंबेडकरवादी बहुजन विकास समिती अध्यक्ष दिपक मगनराव निकाळजे व तमाम कार्यकर्त्यांनी केली आहे. आज समस्त बौद्ध, आंबेडकरी अनुयायांच्या वतीने व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने जाहिर निवेदन देन्यात आले की, छ.संभाजीनगर शहरातील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असणाऱ्या धम्मभुमी बुध्दलेणी विपश्यना बुद्ध विहार येथे मागील 60 ते 70 वर्षापासून अस्तित्वात आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखों करोडो बौद्ध अनुयायी श्रद्धेने नथमस्तक होतात. लेण्यांच्या निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य येथे राहिले आहे यामुळे या बौद्धलेणी परीसराला प्रती दिक्षाभुमी म्हणुन संबोधले जाते. परंतु प्रशासनाने वारंवार हे जागतीक वारसा...
error: Content is protected !!