HomeनांदेडVyoshree Yojana ; मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर...

Vyoshree Yojana ; मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर – NNL

नांदेड | राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली. या योजनेत साहित्य खरेदी करण्यासाठी महाडिबीटीद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात 3 हजार रुपये रक्कम एकदा जमा करण्यात येणार आहे.

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सवाईकल कॉलर इत्यादी साहीत्य खरेदीसाठी रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 पर्यत अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. तरी 4 ऑक्टोबर 2024 नंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, यांची सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments