Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Prime Minister Narendra Modi : बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Prime Minister Narendra Modi : बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

यवतमाळ, नांदेड, राजकीय, हिंगोली
प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण वाशिम| बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत ...
जलजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न -NNL

जलजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी, मिनल करणवाल मॅडम यांचे मार्गदर्शन खाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख मॅडम यांनी ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध व पुरेसा प्रमाणात पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिल्हामधील सर्व विस्तार अधिकारी आरोग्य व प्राथमिक आरोग्य केंद्र वरील सर्व आरोग्य सहाय्यक यांची मान्सून पश्चात पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षण कार्यक्रम ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख मॅडम यांनी पाणी गुणवत्ता व साथरोग या बाबतीत आरोग्य जिल्हा प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सुर्यवंशी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हिरानी मॅडम उपस्...
Indefinite strike : आयएफटीयु ट्रेड युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर बेमुदत धरणे -NNL

Indefinite strike : आयएफटीयु ट्रेड युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर बेमुदत धरणे -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्या घेवून आयएफटीयु ट्रेड युनियनच्या वतीने कॉ.डी.एन.घायाळे यांच्या नेतृत्वात शनिवार दि.5 ऑक्टोबर पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आलेे आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायाला भिंगरी बांधुन संपुर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेचा गवगवा करीत असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करणार्‍या शालेय पोषण आहार कामगारांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज आम्हाला आंदोलन करण्याची पाळी येत असल्याचे उपस्थित आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. केंद्र व राज्य शासनाने आगामी काळात होवू घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णयांचा धडाका लावल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कामगारांना मात्र शासन, प्रशासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ताटकळत ठेवले आहे. मेटाकुट...
Daughter-in-law gave fire : बोरगाव (आ.)येथे प्रेमिलाबाई पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार; सुनांनी दिली भडाग्नी – NNL

Daughter-in-law gave fire : बोरगाव (आ.)येथे प्रेमिलाबाई पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार; सुनांनी दिली भडाग्नी – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| हल्ली बदलल्या कुटूंब व्यवस्थेत जेथे सासूला जवळ ठेवणाऱ्या सुनांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल.पूर्वी सासू सुनेला जाच करत पण काळ बदलला आणि सुन आता सासूला त्रास करू लागल्याच्या अनेक घटना रोजच घडत असतात. पण त्याला काही कुटुंब अपवाद आहेत. लोहा तालुक्यात हंजराज पाटील बोरगावकर याचे प्रतिष्ठित कुटुंब त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रेमलाबाई अप्पाराव बोरगावकर (वय ७५ वर्ष) याच्यावर बोरगाव आकनाक या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरची अग्नी त्याचे चिरंजीव हंरासज पाटील व जयेंद्र तसेच स्नुषा पत्नी डॉ विद्या हंसराज पाटील व चिरंजीव मोनाली जयेंद्र पाटील या दोन्ही सुनांनी भडाग्नी दिली. अंथरुणावर पडलेल्या सासूची सहा वर्षे सेवाश्रुषा करणाऱ्या सुनांनी अग्नी देण्याचा पहिलाच प्रसंग. सासू नव्हे आईच हाच सामाजिक संदेश प्रत्यक्ष कृतीतून बोरगावकर कुटुंबियांनी दिला हल्ली लग्न होऊन घरी लाडक्या स...
Indira Gandhi Junior College success : इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे विभागीय स्पर्धेत यश -NNL

Indira Gandhi Junior College success : इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे विभागीय स्पर्धेत यश -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड| शालेय विभागीय स्तरावरील शूटिंग हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजच्या मुलाच्या संघाने (19 वर्षा खालील)लातूर विभागातून कास्यपदक विजेता संघ झाला. जमदाडे अहिंसक, पतंगे ईतेश यां दोन खेळाडूंची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शन प्रा.डॉ. रमेश नांदेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. टीमचा कर्णधार अहिंसक जमदाडे, चक्रधर शिंदे, ईतेश पतंगे, व्यंकटेश मोतेवार ,नरेश बिरेवार, किरण खंदारे ,सर्वेश मेडेवार, धीरज मेकेवाड,आकाश वाघमारे, प्रतीक जोंधळे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व खेळाडूचे इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री जी.एम. शिंदे इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एल घायल तालुका क्रीडा अधिकारी बेतेवार शूटिंग हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव रमण बैनवाड ,पंदीलवार ,प्रा.चंदेल यु .सी डॉ. स...
Various programs on the occasion of Brahmotsava : विकासनगर जुना कोठ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विविध कार्यक्रम -NNL

Various programs on the occasion of Brahmotsava : विकासनगर जुना कोठ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विविध कार्यक्रम -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी विकास नगर जुना कौठा येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री बालाजी मंदिरामध्ये चौदाव्या ब्रह्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ३ ते १२ आक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये व थाटामध्ये चौदाव्या ब्रम्होत्त्सव साजरा करण्यात येत असून तीन आक्टोंबर 2024 रोजी प्रतिपदा या दिवशी ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली सकाळी श्री बालाजींचा दररोज महाअभिषेक ,होम हवन व त्यानंतर गंगाळ वाटप गंगाळ प्रसादामध्ये विविध पदार्थ दररोज श्री बालाजींना भोग साठी साखर भात, खिरांन, चित्रांन,दहिभात,खिचडी, बुंदीचे लाडू,आधीचा समावेश असून दररोज सायंकाळी सहा वाजता श्री बालाजी पालखी उत्सव परिसरातील वेगवेगळ्या मार्गावरून परिक्रमा केली जाते. सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांना श्री बालाजीची महाआरती होते या महा आरतीला शहराती...
Dr. Venkatesh Kabde : धर्माबाद रेल्वे स्थानकास पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे – डॉ. व्यंकटेश काब्दे -NNL

Dr. Venkatesh Kabde : धर्माबाद रेल्वे स्थानकास पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे – डॉ. व्यंकटेश काब्दे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद रेल्वे स्थानकास मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत केल्याचे व तसा पत्रव्यवहार पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि प्रशासनाला केल्याचे मत डॉ. व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद) यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या मंचावरून प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जाहिर केले. ते राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंच या सेवाभावी संस्थांच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार व पुस्तक प्रकाशन" कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे होते....
Nanded businessman’s sting in Mumbai : नांदेडच्या उद्योजकाचा मुंबईत डंका…! -NNL

Nanded businessman’s sting in Mumbai : नांदेडच्या उद्योजकाचा मुंबईत डंका…! -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड शहरात गेल्या दोन दशकापासून फिनान्शियल ॲडव्हायझर म्हणून कार्यरत असलेल्या नामांकित अर्थ सल्लागार व लोन एडवायझरी फर्म चे संचालक लक्ष्मीकांत जगलपुरे या ध्येयवेड्या युवकाने आपल्या स्वकर्तृत्वावर मुंबई सारख्या महानगरात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आपल्या अथक व कठोर परिश्रमातून उमटाविला असून आज रोजी ते फिनान्शियल अॅडव्हायझर आणि लोन अॅडव्हायझर व त्यासोबतच हॉस्पिटल खरेदी विक्रीची कन्सल्टन्सी चालवतात त्यांनी त्यांचा व्यवसाय हा आजघडीला मुंबईसह नाशिक शहरात विस्तारला आहे. सद्यस्थितीत ओम ॲडव्हाएझरी अँन्ड फायन्साशिएल सव्हिर्सेस प्रा.लि. मार्फत सर्व प्रकारचे लोन, स्टॉक मार्केट गुंतवणूक सल्ला व ट्रेंडींग, म्युच्यूअल फंड ईन्हेस्टमेंटस् यासोबतच सर्व प्रकारचे विमा भरणा या सेवा पुरविण्यात येतात तसेच मुंबईसह नाशिककरांना सुद्धा फिनान्शियल व रिअल ईस्टेट गुंतवणूक क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा देण्यास...
Tuljabhavani Mata : सपोनी जाधवर यांनी सहपत्नीक घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन -NNL

Tuljabhavani Mata : सपोनी जाधवर यांनी सहपत्नीक घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर| सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी सहपत्निक आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून आरती केली. मंदिर समितीकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात हि करण्यात आला. सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांनी सहपत्नीक दि.४ आॅक्टोबर रोज शुक्रवार रोजी सांय.७ वाजता सारखणी जवळ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेत आरती केली.यावेळी सर्वसामान्य जनतेच्या व बळीराजाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदो तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहो,अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली. मंदिर समितीतर्फे जाधवर व त्यांच्या कुटूंबीयांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला....
Rahul Gandhi : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, लोकसभा व राज्यभेत जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार: राहुल गांधी -NNL

Rahul Gandhi : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, लोकसभा व राज्यभेत जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार: राहुल गांधी -NNL

नांदेड, राजकीय
कोल्हापूर| दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची 50 % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि लोकसभा व राज्यसभेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करू अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी केली. कोल्हापुरातील संविधान सन्मान संमेलनात खासदार राहुल गांधी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आज कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे ठोसपणे सांगता येत नाही त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. जातनिहाय जनगणना म्हणजे एक्सरे आहे, एक्सरे काढल्यानंतर समस्या काय आहे ते समजेल व नंतर त्यावर उपाय करता येईल पण जातनिहाय जनगणेला भाजपा, आरएसएसचा विरोध ...
error: Content is protected !!