श्रीक्षेञ माहूर| सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी सहपत्निक आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून आरती केली. मंदिर समितीकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात हि करण्यात आला.
सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांनी सहपत्नीक दि.४ आॅक्टोबर रोज शुक्रवार रोजी सांय.७ वाजता सारखणी जवळ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेत आरती केली.यावेळी सर्वसामान्य जनतेच्या व बळीराजाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदो तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहो,अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली. मंदिर समितीतर्फे जाधवर व त्यांच्या कुटूंबीयांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.