Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
S.M. Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे फक्त निवडणूक जुमला : एस.एम.देशमुख यांची जोरदार टीका -NNL

S.M. Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे फक्त निवडणूक जुमला : एस.एम.देशमुख यांची जोरदार टीका -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| पत्रकार विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी कोणत्याही प्रमुख संघटनेनं कधी केली नव्हती. अथवा महामंडळाचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने कोणत्याही प्रमुख संघटनेबरोबर चर्चा केली नाही. तरीही अचानक महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे.. हे महामंडळ म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पत्रकारांना गाजर दाखविण्याचा प्रकार असून हा ही एक निवडणूक जुमला असल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पर्सिध्दी पत्रकाव्दारे केला आहे. महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला आहे.. या निर्णयाला विरोध करताना एस.एम.देशमुख म्हणाले. राज्यात पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी होत नाही, पेन्शन योजनेचे भिजतघोंगडे पडले आहे. अधिस्वीकृतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, मजेठिया ची अंमलबजावणी होत नाही, छोट्या वृत्तपत्रांचे प्रश्न आहेत या सर्व बुनियादी प्रश्नांकडे दुर्...
Devotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण -NNL

Devotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण -NNL

नांदेड, धार्मिक
उस्माननगर, माणिक भिसे| दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा भवक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. दि. ११ ऑक्टोबर शुक्रवारी रात्रौ तीन वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी अग्नीकुंडातून प्रवेश होत असते.हे पहाण्यासाठी पंचक्रोशीतील व बाहेर जिल्ह्यातून भक्तमंडळी यांची गर्दी होत असते. मागील अनेक वर्षांपासून शिराढोण येथे श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दररोज किर्तन सोहळा व श्री भीमाशंकर महाराज यांचे नामस्मरण करताना परिसर मंगलमय वातावरणाने पसरत असते. दि.१० ऑक्टोबर रोजी या दिवसापासून यात्रा भरण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे , आकाश पाळणे , खसरगुडी , आशा अनेक दुकानांची गर्दी झाली आहे. ११ऑक्टोबर शुक्रवारी संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद , रात्रौ १० ते १ गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा...
maha vastra to the mother : मातेला गुलाबी रंगाच्या महा वस्त्रासह गाईच्या तुपाचे पायस नैवेद्य अर्पण -NNL

maha vastra to the mother : मातेला गुलाबी रंगाच्या महा वस्त्रासह गाईच्या तुपाचे पायस नैवेद्य अर्पण -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून नवरात्रोत्सवाचि आठवी माळ सप्तमी अष्टमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता मातेच्या वेद घोषात वैदिक महापुजेस प्रारंभ करण्यात आला त्यानंतर मातेला अलंकारासह गुलाबी रंगाचे पैठणी महावस्त्र अर्पण करून वेद पारायण फुलोरा सुरु करण्यात आला. सरस्वती पूजन झाल्यानंतर मातेला गाईच्या शुद्ध तुपाचा पायस नैवेद्य अर्पण करून ५१ कुमारीकासह ५१ सूवासीनीचे पूजन करण्यात आले आले, यावेळी तहसीलदार तथा कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव सर्व विश्वस्थ तथा पुजारी यांच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशती शतचंडीपाठास हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. श्री रेणुका मातेस दुपारी पायस नैवेद्य गाईचे तूप अर्पण करण्यात आले, आरती झाल्यानंतर छबीना मिरवणूक काढण्यात आली,परिवा...
Heavy rain disrupts : दमदार पावसाने सोयाबीन काढणीत व्यत्यय, कापूस, सोयाबीन खराब होण्याचा धोका – NNL

Heavy rain disrupts : दमदार पावसाने सोयाबीन काढणीत व्यत्यय, कापूस, सोयाबीन खराब होण्याचा धोका – NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाला सुरुवात होवून दि.८ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले आहे.अशातच काल दुपारी १ वाजताच्या व दुपारी ३ च्या दरम्यान पून्हा जोरदार अर्धा तास पाऊस झाला. दरम्यान, काढणी सुरू असलेले सोयाबीन जाग्यावरच भिजल्याने अनेक शेतकर्‍याचे नूकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. मंगळवारी व गुरुवारी पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यात कापूस आणि सोयाबीन असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड केली जाते. यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्हीही पिकांचे पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अ...
Dnyaneshwar Bhartiji Maharaj : मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज यांच्या स्वखर्चातून वृध्द आश्रमाची उभारणी -NNL

Dnyaneshwar Bhartiji Maharaj : मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज यांच्या स्वखर्चातून वृध्द आश्रमाची उभारणी -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| जगात असंख्य वयोवृद्ध दाम्पत् आहेत ज्यांना एकतर जन्मतःच (मुलबाळ) नसते. किंवा अपत्य असलेले अपत्य (मुलबाळ) अकाली मृत्युमुखी पडून वयोवृद्धावर निराधार होण्याची वेळ आलेली असते. शिवाय त्यांना जवळचे नातेवाईकही नसतात. यामुळे अशा आधाराकरीता, वृद्धांना सामाजिक जवळीकतेकरीता आणि त्यांच्या विरंगुळ्याकरीता वृद्धाश्रमाचा आधार असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माहूरगड येथील मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (श्री.ह.भ.प.आर्च बाळु महाराज काकाणी ) हे स्वखर्चातून वृध्द आश्रम उभारणार असून त्या वृध्द आश्रमाचे भुमिपूजन श्री श्री श्री १००८ श्री महंत उमाशंकर भारतीजी महाराज (अध्यक्ष श्री पंच दसणाम जुना आखाडा .काशी ) यांच्या शुभहस्ते व अनेक साधु संताच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. आज समाजात कित्तेक निराधार,बेघर,अनाथ वयोवृध्द आपल्याला आपल्...
Will donate 51 bottles of chemotherapy for cancer patients : कॅन्सर देव रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वाढदिवस साजरा न करता कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरेपीच्या ५१ बाटल्या दान करणार -NNL

Will donate 51 bottles of chemotherapy for cancer patients : कॅन्सर देव रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वाढदिवस साजरा न करता कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरेपीच्या ५१ बाटल्या दान करणार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील ड्रायक्लिनींग उद्योगपती विनोद बाहेती यांच्या धर्मपत्नी सौ. कोकिळा बाहेती यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शासकीय रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसाठी ५१ केमो थेरेपीच्या बाटल्या दान देण्याचा संकल्प केला आहे. भारतातील कॅन्सर रुग्णांचे 'कॅन्सर देव' म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी कॅन्सर रुग्णालयात काही काळ उपचार घेतले होते. तेथील उत्कृष्ट सेवेची प्रेरणा घेऊन 'नर सेवा ही नारायण सेवा' हा उद्देश घेऊन उभारलेल्या रतन टाटा कॅन्सर हाॅस्पिटलला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही या निमित्ताने अक्षय ड्रायक्लिनर्सचे विनोद बाहेती, उत्तराधिकारी राजू चौडेकर, वैष्णवी व निमिता बाहेती यांनी केले आहे. 'सेवा हाच सर्वोत्तम धर्म आहे' हे ब्रीद घेऊन कॅन्सर रुग्णांच्या अविरत सेवेत असलेले मुंबई येथील रतन टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या उत्कृष्ट सेवेमुळेच नांदेड येथील सौ. कोकिला बाहेती या...
Navratri festival at Dagadgaon : दगडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त महिला पालक मेळावा -NNL

Navratri festival at Dagadgaon : दगडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त महिला पालक मेळावा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| शेवडी बाजीराव केंद्रांतर्गत दगडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवरात्र उत्सवानिमित्त महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच औचित्याने शाळेच्या माता पालक संघाची बैठकही उत्साहात संपन्न झाली. यावेळी मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुनेगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती अंबलवाड, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी स्वच्छतेची प्रतिज्ञाही घेण्यात आली. या निमित्ताने इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांचे गायन केले. त्यानंतर माता पालक संघ व इतर माता पालकांचे इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका गंगा नागरगोजे यांनी हळदी कुंकवाने औक्षण केले. या मेळाव्यात मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहशिक्षिका गंगा नागरगोजे आणि अनुराधा राऊत यांनी आपल्या मुलींच्या बाबतीत सशक्तीकरण आणि ...
Chief Minister Vyoshree Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ -NNL

Chief Minister Vyoshree Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 6 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उप...
Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल -NNL

Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी नांदेड येथून अयोध्या धामला जाण्यासाठी निघणार होती. परंतु या नियोजनात अंशत: बदल होवून ही रेल्वे आता 23 ऑक्टोबर 2024 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत यापूर्वी 12 ऑक्टोबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे नियोजित होती. परंतु समाज कल्याण आयुक्त पुणे यांचे निर्देश व इंडियन रेल्वे ॲन्ड केटरींग ॲन्ड टूरीझम क...
Maharashtra : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटींची कर हस्तांतरण -NNL

Maharashtra : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटींची कर हस्तांतरण -NNL

मुंबई
नवी दिल्ली| महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले आहे. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला असून, यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त 89,086.50 कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे. महाराष्ट्राला या हस्तांतरणातून 11,255 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ...
error: Content is protected !!