श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| जगात असंख्य वयोवृद्ध दाम्पत् आहेत ज्यांना एकतर जन्मतःच (मुलबाळ) नसते. किंवा अपत्य असलेले अपत्य (मुलबाळ) अकाली मृत्युमुखी पडून वयोवृद्धावर निराधार होण्याची वेळ आलेली असते. शिवाय त्यांना जवळचे नातेवाईकही नसतात. यामुळे अशा आधाराकरीता, वृद्धांना सामाजिक जवळीकतेकरीता आणि त्यांच्या विरंगुळ्याकरीता वृद्धाश्रमाचा आधार असतो.
हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माहूरगड येथील मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (श्री.ह.भ.प.आर्च बाळु महाराज काकाणी ) हे स्वखर्चातून वृध्द आश्रम उभारणार असून त्या वृध्द आश्रमाचे भुमिपूजन श्री श्री श्री १००८ श्री महंत उमाशंकर भारतीजी महाराज (अध्यक्ष श्री पंच दसणाम जुना आखाडा .काशी ) यांच्या शुभहस्ते व अनेक साधु संताच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
आज समाजात कित्तेक निराधार,बेघर,अनाथ वयोवृध्द आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात.काहींना कुटुंब परिवार असतो तर काहींना नसतो.कित्तेक आज्जीआजोबांना घरी सांभाळलं जात नाही.घरातून हाकलून दिले जाते,कित्येकदा त्यांना कुठे तरी रस्त्याच्या,स्टेशन किंवा मंदिर परिसरात आणून सोडले जाते. अशा सर्व वयोवृध्द गरजू आजीआजोबांना खरंतर वृद्धापकाळात प्रेमाची,आधाराची,आपलेपणाने चौकशी करण्याची, काळजी घेण्याची गरज असते.
अशाच वयोवृद्धांना आधार देण्यासाठी येथील मठाधीश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (श्री.ह.भ.प.आर्च बाळु महाराज काकाणी ) हे आपल्या स्वखर्चातून वृध्द आश्रम उभारणार आहे.सदरील वृध्द आश्रमाचे भूमिजन दि.१३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वा श्री श्री १००८ श्री महंत उमाशंकर भारतीजी महाराज (अध्यक्ष श्री पंच दसणाम जुना आखाडा .काशी ) यांच्या शुभहस्ते व अनेक साधु-संताच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पेट्रोल पंपासमोरील केशवे विद्यालयाच्या लगत असलेल्या मठाच्या परिसरात होणार असल्याची माहीती येथील शिष्य मंडळीनी दिली आहे.