HomeनांदेडDevotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण...

Devotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण -NNL

उस्माननगर, माणिक भिसे| दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा भवक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. दि. ११ ऑक्टोबर शुक्रवारी रात्रौ तीन वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी अग्नीकुंडातून प्रवेश होत असते.हे पहाण्यासाठी पंचक्रोशीतील व बाहेर जिल्ह्यातून भक्तमंडळी यांची गर्दी होत असते.

मागील अनेक वर्षांपासून शिराढोण येथे श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दररोज किर्तन सोहळा व श्री भीमाशंकर महाराज यांचे नामस्मरण करताना परिसर मंगलमय वातावरणाने पसरत असते.

दि.१० ऑक्टोबर रोजी या दिवसापासून यात्रा भरण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे , आकाश पाळणे , खसरगुडी , आशा अनेक दुकानांची गर्दी झाली आहे. ११ऑक्टोबर शुक्रवारी संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद , रात्रौ १० ते १ गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषीक देऊन गौरव व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर रात्रौ पहाटे तीन च्या दरम्यान श्री भीमाशंकर महाराजांची पालखी अग्नीकुंडातून प्रवेश पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होत असते.

त्यानंतर दि.१२ ऑक्टोबर शनिवारी विजयादशमी दसरा दिवशी सकाळी ११ वा. भीमाशंकर महाराजांची पालखी सोहळा विसर्जन व जगद्गुरू आशिर्वचन भक्तगणांना देतील. या यात्रेसाठी शिराढोण येथील सरपंच खुशालराव पांडगाळे व यात्रा कमिटी यांनी चौख व्यवस्था केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments