Devotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण -NNL
उस्माननगर, माणिक भिसे| दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा भवक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. दि. ११ ऑक्टोबर शुक्रवारी रात्रौ तीन वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी अग्नीकुंडातून प्रवेश होत असते.हे पहाण्यासाठी पंचक्रोशीतील व बाहेर जिल्ह्यातून भक्तमंडळी यांची गर्दी होत असते.
मागील अनेक वर्षांपासून शिराढोण येथे श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दररोज किर्तन सोहळा व श्री भीमाशंकर महाराज यांचे नामस्मरण करताना परिसर मंगलमय वातावरणाने पसरत असते.
दि.१० ऑक्टोबर रोजी या दिवसापासून यात्रा भरण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे , आकाश पाळणे , खसरगुडी , आशा अनेक दुकानांची गर्दी झाली आहे. ११ऑक्टोबर शुक्रवारी संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद , रात्रौ १० ते १ गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा...
