Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Sports Officer Nanded gifted 400 books : जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्यातर्फे हु.ज.पा.महाविद्यालयास 400 पुस्तके भेट -NNL

Sports Officer Nanded gifted 400 books : जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्यातर्फे हु.ज.पा.महाविद्यालयास 400 पुस्तके भेट -NNL

नांदेड, करियर
हिमायतनगर| जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्याकडून हिमायतनगर येथील हु.ज.पा.महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात सुमारे 400 पुस्तके देण्यात आली आहेत. हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर ग्रंथालय विभागास जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास साहित्य यांच्याकडून स्पर्धा परीक्षेचे सुमारे 400 पुस्तके प्राप्त झाली. एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपयाची पुस्तके देण्यात आली. याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम त्याच प्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री.बोंबले राजू तसेच ग्रंथालय परिचर श्री.विश्राम देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथ स्वीकारण्यात आली.जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास साहित्य नांदेड यांचे खरोखरच महाविद्यालयाच्या वतीने व ग्रंथालय विभागाच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले....
Acquittal in kidnapping case : प्रकाश मारावार, मोतीराम पाटील, शिवाजी सूर्यवंशी यांची शिक्षणाधिकारी अपहरण प्रकरणी निर्दोष मुक्तता -NNL

Acquittal in kidnapping case : प्रकाश मारावार, मोतीराम पाटील, शिवाजी सूर्यवंशी यांची शिक्षणाधिकारी अपहरण प्रकरणी निर्दोष मुक्तता -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| येथील तत्कालीन गटशिक्षणाधिकारी चित्त प्रकाश देशमुख यांच अपहरण प्रकरणी खालच्या न्यायालयाने तीन महिन्याचे शिक्षा दिले होते. आज जिल्हा सत्र न्यायाधीश आर आर पटवारी यांनी शिवसेनेचे प्रकाश मारावार, मोतीराम पाटील, शिवाजी सूर्यवंशी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. शिक्षणाधिकारी चित्तप्रकाश देशमुख यांचे अपहरण प्रकरण 2002 साली शिक्षकाच्या बदली प्रकरण गंभीर वळण घेतले होते शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रकाश मारावार तत्कालीन सभापती मोतीराम पाटील शिवाजी सूर्यवंशी व इतर यांनी त्यावेळेसचे आमदार प्रकाश खेडकर यांच्याकडे तक्रार केली होती. शिक्षणाधिकारी चित्त प्रकाश देशमुख यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी गराडा घातला होता. याप्रकरणी खालच्या कोर्टाने तीन महिन्याचे शिक्षा सुनावली होती. आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश आर आर पटवारी यांच्या दालनात...
Prakash Marawar : नांदेड विमानतळ पोलिस स्टेशन स्थलांतर करा – प्रकाश मारावार -NNL

Prakash Marawar : नांदेड विमानतळ पोलिस स्टेशन स्थलांतर करा – प्रकाश मारावार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन अनेक समस्या ग्रस्ताने व्यापलेला असून मनप भूखंडावर तात्काळ नंतर करण्याची मागणी पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजी उमाप साहेब यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी मागणी केली. नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन पौर्णिमा नगर येथील एका बोळीत असून पोलीस स्टेशनला जाण्यासाठी अरुंद रस्ता. पार्किंग सुविधा नाही. अपुरी इमारत. पावसाळ्यात छत गळती. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधा. अशा अनेक समस्या ग्रस्त असलेला पोलीस स्टेशन. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनचा रस्ताच माहीत होत नाही. विमानतळ पोलीस स्टेशन खाजगी मालकाच्या इमारतीमध्ये असल्या कारणामुळे शासनाच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या मनपा भूखंड क्रमांक 96 94 या जागेवर स्थलांतर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...
Suryakanta patil ; प्रदीप नाईक यांना तुम्ही आमदार करा मी जमानतदार होते….. सुर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री -NNL

Suryakanta patil ; प्रदीप नाईक यांना तुम्ही आमदार करा मी जमानतदार होते….. सुर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। किनवट येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता देशाचे उद्योगपती रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.या मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर बोलत असताना तुम्ही प्रदीप नाईक यांना आमदार करा प्रदीप नाईक यांना मंत्री करायची जबाबदारी मी घेते. कारण महाराष्ट्रात येणार सरकार हे महाविकास आघाडीचेच असणार आहे. प्रदीप नाईक यांना मी जवळून ओळखते मी गेल्या दहा वर्षात भाजपात असल्याने कदाचित प्रदीप नाईक हे पडले असतील. मी पण भाजपात राहून गेली दहा वर्षभर वनवासच भोगला. मि निवडणूक लढवेल अथवा लढवणार नाही पण सक्रिय राजकारणातच राहणार आहे. मी कायमस्वरूपी तुमची जमानतदार म्हणून किनवट माहूर मतदारसंघाच्या पाठीशी उभे राहणार आहे असे मत सूर्यकांता पाटील यांनी या पक्ष सोहळ्याच्य...
World mental health ; “जागतिक मानसिक आरोग्य” दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

World mental health ; “जागतिक मानसिक आरोग्य” दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

नांदेड, आरोग्य
भोकर। आज दि. 10 ऑक्टोबर " जागतिक मानसिक आरोग्य " दिन प्रथम प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यात आली. तालुका विधी सेवा समिती भोकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/ प्रेरणा प्रकल्प, व ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.आर.एस. इरले सह न्यायाधीश भोकर , प्रमुख पाहुणे मा.डी.डी.माने साहेब न्यायाधीश भोकर, डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, डॉ.शाहू शिराढोणकर, मानसउपचार तज्ञ, डॉ संदेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी भोकर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक व सूत्र संचालन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक यांनी केले. मानसिक आरोग्य बदल सविस्तर मार्गदर्शन व घ्यावयाची काळजी या बाबत डॉ शाहू शिराढोण...
Municipal corporetion ;  नवीन कौठा येथील दलित वस्तीतील पाणी प्रश्न सोडवून नागरी सुविधा द्याव्यात ; अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा – सुनील अनंतवार -NNL

Municipal corporetion ; नवीन कौठा येथील दलित वस्तीतील पाणी प्रश्न सोडवून नागरी सुविधा द्याव्यात ; अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा – सुनील अनंतवार -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। मागील बारा वर्षांपासून नवीन कौठा येथील पाणी प्रश्न सोडविण्यात यावा व तेथे नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा व अनेक तक्रारी महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात येत आहेत. परंतु मागण्या पूर्ण होत नाहीत ही खुपच गंभीर बाब आहे. महापालिका हद्दीत आपण आहोत का नाही? असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे.अमृत योजनेसाठी आलेले करोडो रुपये व करापोटी वसुली झालेली रक्कम जाते कुठे असा प्रश्न नवीन कौठा येथील नागरिक विचारत आहेत.या भागात अजून नळ पोहचले नाहीत. कचरा व्यवस्थापन नाही,नाली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. विशष म्हणजे ही परिस्थिती नवीन कौठा येथील दलित वस्ती मधील आहे.विष्णुपुरी जलाशय पूर्णता भरलेला असताना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी वानवा आहे.पाणी प्रश्न तातडीने सोडवावा,पाण्यासाठी महिलांची होणा...
Godavari urban ; गोदावरी अर्बन माहूर शाखा प्रथम वर्धापन दिन निमित्त सिमेंट बेच भेंट -NNL

Godavari urban ; गोदावरी अर्बन माहूर शाखा प्रथम वर्धापन दिन निमित्त सिमेंट बेच भेंट -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सो. लि.नांदेड शाखा माहूरच्या प्रथम वर्धापन दिन निमित्त माहूर शहरातील पुरातन असलेल्या महादेव (कपिलेश्वर) मंदिर परीसरात भाविकांना बसण्यासाठी सिमेंट बेंच भेंट देण्यात आले. समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांच निर्वहन करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीकोनातून नेहमी जपनारी गोदावरी अर्बन शाखा माहूरच्या वतीने दि, १० ऑक्टोबर रोजी संस्थापक अध्यक्ष ना.हेमंत पाटील, अध्यक्षा.राजश्री पाटील , व्यवस्थापकीय संचालक .धनंजय तांबेकर, चिफ मॅनेजर सौ सुरेखा दवे ,सहाय्यक चीफ मॅनेजर श्री.रवी इंगळे ,मार्केटींग मॅनेजर .महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात कपिलेश्वर मंदिर परीसरात शहरातील व्यापारी पिपळवार, रेणुका देवीचे मुख्य पुजारी शुभम भोपी यांच्या हस्ते पुजन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी नप उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, नगर सेवक,गोपू महा...
Nanded Rural Crime Squad : नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई सव्वा लक्ष रुपयाचा गुटख्यासह एक आरोपी ताब्यात -NNL

Nanded Rural Crime Squad : नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई सव्वा लक्ष रुपयाचा गुटख्यासह एक आरोपी ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शासनाने बंदी घातलेला गुटखा सप्लाई करताना किशोर प्रल्हादराव देशमुख वय 34 रा. ओमकार इंग्लीश स्कुल चे पाठीमागे कौठा, नांदेड आणि अजीम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली असून, राजनिवास, विमल पान मसाला, मुसाफीर, रजनीगंधा, सिग्रीचर, बाबा 120 तंबाखु, वजीर गुटखा असा एकूण १ लक्ष 18 हजार 732 रुपयाचा गुटख्याच्या मुद्देमालसह एक आरोपी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक, अबिनाश कुमार नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयावर कारवाई करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. हदीत गुन्हे शोध पथक हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यातील इसम हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला राजनिवास, विमल पान मसाला, मुसाफीर, रजनीगंधा, सिग्नीचर, बाबा 120 तंबाखु, वजीर गुट...
Tear off the original estimate sheet : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयातील दुरुस्तीच्या कामात मुळ अंदाज पत्रकाला फाटा -NNL

Tear off the original estimate sheet : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयातील दुरुस्तीच्या कामात मुळ अंदाज पत्रकाला फाटा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालया मधील दुसर्‍या माळ्यावर पंचायत समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय आणि वसंतराव नाईक सभागृह दुरूस्ती व इतर करण्यात येत असलेली विकास कामे ही शासनाच्या मुळ अंदाज पत्रकाला बाजूला सारून अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत असल्याने उपलब्ध निधीच्या प्रमाणात करण्यात येत असलेल्या कंची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे. हिमायतनगर शहाराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर येथे प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली. सदरची इमारत बांधण्यात येवून अनेक वर्ष उलटली असल्याने डागडुजी अपेक्षित होती. म्हणून शासनाकडून जवळपास एक ते सव्वा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपलब्ध निधीच्या माध्यमातून इतर विकास कामे पुर्ण करण्यात येत आहेत. परंतू थातूरमातूर ...
Devendra Fadnavis’ tribute to Ratan Tata : मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला – देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली -NNL

Devendra Fadnavis’ tribute to Ratan Tata : मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला – देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्याहीपलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कर्करोग रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्रा...
error: Content is protected !!