नांदेड| येथील तत्कालीन गटशिक्षणाधिकारी चित्त प्रकाश देशमुख यांच अपहरण प्रकरणी खालच्या न्यायालयाने तीन महिन्याचे शिक्षा दिले होते. आज जिल्हा सत्र न्यायाधीश आर आर पटवारी यांनी शिवसेनेचे प्रकाश मारावार, मोतीराम पाटील, शिवाजी सूर्यवंशी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.


शिक्षणाधिकारी चित्तप्रकाश देशमुख यांचे अपहरण प्रकरण 2002 साली शिक्षकाच्या बदली प्रकरण गंभीर वळण घेतले होते शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रकाश मारावार तत्कालीन सभापती मोतीराम पाटील शिवाजी सूर्यवंशी व इतर यांनी त्यावेळेसचे आमदार प्रकाश खेडकर यांच्याकडे तक्रार केली होती. शिक्षणाधिकारी चित्त प्रकाश देशमुख यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी गराडा घातला होता.


याप्रकरणी खालच्या कोर्टाने तीन महिन्याचे शिक्षा सुनावली होती. आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश आर आर पटवारी यांच्या दालनात सुनवणी होऊन अपील क्रमांक 86 / 2015 कलम 363. 342 या केसा निकाल देऊन प्रकाश मारावार. मोतीराम पाटील. शिवाजी सूर्यवंशी यांना तीन महिन्याचे झालेली शिक्षा रद्द करून जिल्हा सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली या खटल्यात आरोपीची बाजू एडवोकेट आर. जी. परळकर.. एडवोकेट नंदकिशोर कल्याणी मुगटकर यांनी भक्कमपणे बाजू मांडली.
