Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Renukadevi Temple : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक केला श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड हवन विधी -NNL

Renukadevi Temple : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक केला श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड हवन विधी -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूरगड, राज ठाकूर| नवत्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहूरगडावर भेट देऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले. तसेच सपत्नीक श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड हवन विधी केला. गुरुवार दि,१० रोजी रात्री ११ वा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सपत्नीक यांच्या हस्ते श्री रेणुकादेवी मंदीरासमोरील होमकुंड येथे होमहवन विधी संपन्न झाला. होम विधीचे पौरोहीत्य वेदपाठ शाळेचे गुरुजी वे.शा.सं. निलेश केदार, दुर्गादास भोपी, शुभम भोपी, अरविंद देव, यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी वेदाचे आठ अध्याय झाल्यानंतर अभिजीत राऊत यांच्या हस्ते श्री रेणुकादेवीची विधीवत पुजा करुन महाआरती करण्यात आली. नंतर तेरा अध्याय पुर्ण झाल्यानंतर होम कुंडासमोर महाआरती करण्यात आली....
महोदय ! आपण आमच्या भावना जाणून घेताहेत याचा आनंद आहे… राज्यपालांच्या संवाद कार्यक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

महोदय ! आपण आमच्या भावना जाणून घेताहेत याचा आनंद आहे… राज्यपालांच्या संवाद कार्यक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथीय, सामाजिक संघटना, संस्था अशा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी संवाद साधला. अडीच तास ते ऐकत होते. काय करता येईल यावर उपाय सांगत होते. बदल घडविण्याचे उपाय करण्याचे सूतोवाच करत होते. त्यामुळे अनेक शिष्टमंडळांनी राज्यपाल सारख्या पदावरील व्यक्तीने आम्हाला शांततेने ऐकून घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज संवाद कार्यक्रमासाठी अमरावतीवरून विमानाने नांदेड विमानतळावर सायंकाळी 5 वा. दाखल झाले. याठिकाणी त्यांना मानवंदना देण्यात आली. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांनी लगेच संवाद कार्यक्रमाला सुरूवात केली. सर्वप्रथम नांदेड येथील खासदार तसेच यापूर्वीच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. य...
Mahila Sashkthikaran Abhiyan : नवा मोंढा मैदानावर आता 13 ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा – NNL

Mahila Sashkthikaran Abhiyan : नवा मोंढा मैदानावर आता 13 ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा महिला आनंद मेळावा आता रविवार 13 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज यासंदर्भात आढावा बैठक घेऊन सर्व जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क केले. यापूर्वी ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबरला निधन झाले त्यामुळे राज्य शासनाने 10 ऑक्टोबरला एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता 13 ऑक्टोबरला रविवारी दुपारी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 नंतर मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित महिला भगिनींशी, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तय...
Five policemen in Nanded suspended : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी नांदेड मधील पाच पोलीस निलंबित -NNL

Five policemen in Nanded suspended : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी नांदेड मधील पाच पोलीस निलंबित -NNL

क्राईम, नांदेड, फोटो गॅलरी
नांदेड| आज दिनांक 11.10.2024 रोजी लोहा येथील बायपास रोडवर काही पोलीस अधिकारी व अंमलदार हे बाळू वाहतूक करणारी वाहने अडवून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पैसे स्विकारत असल्याची माहिती पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाली होती. पोलीस उप महानिरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणो थांबलेले पोलीस हे नांदेड येथील विशेष पथकात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण हलसे व इतर चार अंमलदार होते. हे सर्वजण पहाटेचे वेळी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी एका खाजगी वाहनातून लोहा येथे गेले होते. उपरोक्त माहिती, त्वरित उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग कंधार श्रीमती अश्विनी जगताप यांना देण्यात येऊन, त्यांना लोहा येथे रवाना होण्याबाबत कळविण्यात आले. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जगताप ह्या लोहा येथे पोहोचण्यापूर्वीच, नमूद अधिकारी व अ...
Arun Chavan : गोरगरीब जानेतच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मला नाईलाजस्तव राजकारणात उतरावं लागलं – अरुण चव्हाण -NNL

Arun Chavan : गोरगरीब जानेतच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मला नाईलाजस्तव राजकारणात उतरावं लागलं – अरुण चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात आली असून सर्वच पक्ष आपापल्या परीनं निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. येथील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित गृहीत धरला जात असून विरोधी पक्ष असलेला म्हविकासआघाडी कडून अनेकांनी गुडघ्याला बासिंग बांधले आहे. परंतु येथील सोशीत, वंचित, गोरगरीब जनतेच्या मूलभूत प्रश्नाचे कोणासच काही घेणे देणे नसल्याचे आजवरच्या राजकारणावरून दिसून येत असल्यामुळे मला येथून निवडणूक लढवायची आहे. असे प्रतिपादन एका खासगी पत्रकार परिषदेत केले. मी गेली सतार अठरा वर्षांपासून घरा दाराचा त्याग करून फक्त आणि फक्त समाजसेवा करण्याच्या उद्देशातून मी आजवर भारतभर भ्रमण केल असून त्यावेळी मी गोरगरिबांच्या समस्या जवळून पाहिल्यात म्हणून मला माझ्या मतदार संघातील मूलभूत गरजा अजूनही बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहिल्याने अनेकजण कामासाठी मोठया शहरात, बाहेर राज्यात...
of Shivajinagar Crime Squad : शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगीरी; 1 लाख 35 हजारच्या 04 मोटार सायकलसह दोन आरोपी ताब्यात -NNL

of Shivajinagar Crime Squad : शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगीरी; 1 लाख 35 हजारच्या 04 मोटार सायकलसह दोन आरोपी ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपीना पो. स्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगीरी करत 1 लाख 35,000 रूपयाचे 04 मोटार सायकल सह दोन आरोपी ताब्यात घेणे आहे. अविनाश कुमार पोलीस अधिक्षक साहेव नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत नांदेड शहरातील मोटार सायकल चोरी संबधाने गुन्हे उघडकिस आनन्यासाठी सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी यांना आदेश देण्यात आले होते. त्या अनुशंगाने दिनांक 09.10.20254 रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अमलदार पो.स्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे सदर गुन्ह्यातील मोटार सायकल चोरी करनारे 1) साईनाथ मारोती म्याकलवाड वय 19 वर्ष, रा. देविगल्ली धर्मावाद जि. नांदेड, 2) वॉवी भगवानराव जाधव वय 20 वर्ष, रा. सिद्धार्थनगर, बाळापुर, ता. धर्माबाद जि. नांदेड ह.मु वृंदावन धाबा धर्मावाद हे धर्माबाद येथे असल्याची...
Superintendent of Police Honors Police Officer : हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान -NNL

Superintendent of Police Honors Police Officer : हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| शहरातील श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी सार्वजनिक रोडवर हातात तलवार घेवुन, दहशत पसरविणाऱ्या इसमास पकडून कार्यवाही करणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडुन सन्मान करण्यात आला आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 05/10/2024 रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर हद्दीत श्रीनगर भागातील रामराव पवार मार्गावर रहदारीचे ठिकाणी आरोपी नामे कश्यप सुनिल हटकरे हा हातात तलवार घेवुन, लोकांना मारहाण करीत परीसरात दहशत पसरवित होता. यामुळे भितीपोटी तेथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यावेळी तेथुन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. 1138 बालाजी तेलंग यांनी जिवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने एकटया...
Indian Buddhists need to take a political role : भारतीय बौद्धांनी राजकीय भूमिका घेण्याची गरज  -NNL

Indian Buddhists need to take a political role : भारतीय बौद्धांनी राजकीय भूमिका घेण्याची गरज  -NNL

नांदेड, लेख
देशातील बौद्धांची संख्या किती आहे किंवा मतदान किती आहे याचा खल करीत बसण्यापेक्षा संपूर्ण देशातील विविध निवडणूकांमध्ये त्यांनी ठरवलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाप्रमाणे राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतात, हे निर्विवाद सत्य आहे. बौद्धांचे धम्मविषयक अनेक प्रश्न आहेत. भारतात तर अस्पृश्यांनी बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर तर आजच्या संदर्भानेही त्यात वाढच होत राहण्याची शक्यता आहे. धम्मस्विकारानंतर इथल्या अस्पृश्यांच्या जीवनात घडून आलेले मूल्यांतर प्रामुख्याने आचार विचार आणि वर्तनाशी संबंधित होते. शिक्षण घेणे, शासकीय नोकऱ्यांत स्थान मिळविणे म्हणजेच आपली आर्थिक स्थिती सुधारुन घेणे आणि बौद्ध म्हणून वागणे ही ढोबळमानाने असणारी ध्येय या बौद्धांसमोर होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाबरोबरच आपल्यासाठी काय काय केले, किती संघर्ष केला याची क्रांतीकारी गीतं गात वैयक्तिक तथा सामाजिक, सांस्कृतिक प्...
Dr. Manohar Chaskar : अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त व्हावा- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Dr. Manohar Chaskar : अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त व्हावा- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| लोकभावना, वेदना आणि आकांक्षा व्यक्त करण्याचे सामर्थ्य नटाकडे असते. उत्तम अभिनयामुळे यशाची उत्तुंग शिखरे गाठता येतात. चांगला अभिनेता हा जनतेचा सूक्ष्मनिरीक्षक असतो, अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त झाला पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी ‘फाउंडेशन कोर्स इन स्क्रीन अॅक्टींग’ प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या समारोप प्रसंगी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ललित व प्रयोगजीवी कला संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समारोप व पारितोषिक वितरण दि. १० ऑक्टोबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परि...
Puja of vehicles and machines : एसटी डेपो नांदेड आगार येथे विजयादशमीनिमित्त वाहन व यंत्रांचे पूजन -NNL

Puja of vehicles and machines : एसटी डेपो नांदेड आगार येथे विजयादशमीनिमित्त वाहन व यंत्रांचे पूजन -NNL

सोशल वर्क, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 11 ऑक्टोंबर 2024 शुक्रवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विजयादशमी निमित्त आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते एसटी बसचे व तसेच आगारातील यंत्रांचे पूजन करण्यात आले. यामध्ये टायर प्रेशर कम्प्रेशर, वॉशिंग प्लॉन्ट, यांत्रिकी टुल्स, डिझेल पंप इत्यादी यंत्रांचे पूजन करुन आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांनी विजयादशमीच्या कामगार- कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेनके, पाळी प्रमुख अविनाश भागवत, गिरीश कुलकर्णी, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, लेखाकार हरपालसिंघ सरदार, कामगार- कर्मचारी मयुर गायकी, नागनाथ करेवाड, केशव टोणगे, मंगेश कांबळे, ओमप्रकाश ...
error: Content is protected !!