Homeसोशल वर्कPuja of vehicles and machines : एसटी डेपो नांदेड आगार येथे विजयादशमीनिमित्त...

Puja of vehicles and machines : एसटी डेपो नांदेड आगार येथे विजयादशमीनिमित्त वाहन व यंत्रांचे पूजन -NNL

नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 11 ऑक्टोंबर 2024 शुक्रवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विजयादशमी निमित्त आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते एसटी बसचे व तसेच आगारातील यंत्रांचे पूजन करण्यात आले.

यामध्ये टायर प्रेशर कम्प्रेशर, वॉशिंग प्लॉन्ट, यांत्रिकी टुल्स, डिझेल पंप इत्यादी यंत्रांचे पूजन करुन आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांनी विजयादशमीच्या कामगार- कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेनके, पाळी प्रमुख अविनाश भागवत, गिरीश कुलकर्णी, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड,

लेखाकार हरपालसिंघ सरदार, कामगार- कर्मचारी मयुर गायकी, नागनाथ करेवाड, केशव टोणगे, मंगेश कांबळे, ओमप्रकाश कोटुरवार, एम.के. चाहेल, दिलबागसिंघ गडगंज, गुरुजितसिंघ लिखारी, देविदास महाजन, राजू घंटे, लिपीक सौ. रेखा माचीनवार, मनिषा कदम, शिल्पा ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आगारातील चालक- वाहक, यांत्रिकी कामगार- कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments