Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
youth festival ; युवक महोत्सवातील कव्वाली कला प्रकारास प्रेक्षकांची दाद – NNL

youth festival ; युवक महोत्सवातील कव्वाली कला प्रकारास प्रेक्षकांची दाद – NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड | आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवा स्पर्धक कलावंतांनी एका पेक्षा एक सरस कव्वाली सादर केल्या..कव्वाली ऐकण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.या कला प्रकाराला चांगलीच दाद मिळाली. वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी मेरी जान जाए वतन के लिये..ही देश भक्ती पर कव्वाली सादर करत प्रेक्षकांची टाळ्यांची दाद मिळवली.ही कव्वाली भुजंग मुळगिर,संबोध भुसावळे,श्रद्धा मोरे,संस्कृती शिंदे, शिवरानी शिंदे आदीं स्पर्धकांनी सादर केली. 'आज गहरी निंद ने ' ही कव्वाली शिवाजी कॉलेज परभणीच्या अभिरुपा पैजने,राज भालेराव,वैष्णवी गिरी,कृष्णा लिंबेक र आदी कलावंतांनी हुबेहूब गायली. एम जी एम महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र च्या स्पर्धक कलावंतांनी ' 'मेरी जान जाए ..वतन के लिये..! ही देश भक्ती पर कव्वाली सादर केली.या कव्वाली त प्रणव चंदेल,विवेक मुसले,ऋतुजा घाटोल, रुद्रानी पत्रे,प्रार्थना हलदेकर आदी स...
youth festival ; आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा – NNL

youth festival ; आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ-२०२४’आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या मुख्यमंचावर रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी एकापेक्षा एक सरस असे जलशे स्पर्धकांनी सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या कार्याचा उजाळा स्पर्धक कलावंतांनी जलसातून सादर केला. दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रियंका बनसोडे हिने गायलेल्या ‘वंदितो बा भीमा तुला’ ‘आहे कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला’ हा जलसा पहाडी आवाजातून सादर केला. या गीताला पसंती मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान जलसाच्या माध्यमातून मांडले. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर, भारतीय संविधान या विषयाला उजाळा दिला. यामध्ये आरती सांगवे, विशाखा गिरी, धम्मदीप सपकाळ, किरण कांबळे, ओमकार गायकवाड, अभिजीत सुतार ...
AIDS awareness ; नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात कलापथकाच्या माध्यमातून एड्स जनजागृती – NNL

AIDS awareness ; नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात कलापथकाच्या माध्यमातून एड्स जनजागृती – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानकात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (एमएसएसीएस) मुंबई व जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कलापथकाच्या माध्यमातून एड्स जनजागृती करण्यात आली. जिल्हा साधन व्यक्ती प्रकाश झिंझाडे, प्रकल्प व्यवस्थापक सोपान ईबिते, समुपदेशक गजानन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथक प्रमुख अरविंद खंदारे, मास्टर ईरबा गाडेगावकर आणि त्यांच्या कला संचाने एड्स म्हणजे काय? मानवी शरीरातील संपादित रोग लक्षणांचा समूह म्हणजेच एड्स होय, असे त्यांनी आपल्या कला पथकाच्या जनजागृतीतून उद्बोधन केले. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, कलापथक हे आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात भरकटत जाणार...
Bhimrao Keram : भाजपाकडून पुन्हा विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर -NNL

Bhimrao Keram : भाजपाकडून पुन्हा विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी किनवट माहूर मतदार संघातून विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे स्पष्ट होताच किनवट-माहूर मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला आहे. किनवट-माहूरमतदारसंघातून महायुतील भाजपा पक्षासह घटक पक्षातील अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे रेटून प्रयत्न केला त्यात शिंदे गटाकडून ही मोठी रस्सीखेच चालू असल्याची चर्चा होती. परंतु विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी उमेदवारी मिळविण्यात अखेर यश मिळवले आहे. प्रचाराला कमी कालावधी असल्याणे लवकरच आता प्रचाराची रणधुमाळी चालू होणार असून जनतेचा कल कोणाकडे राहणार आहे. काही दिवसातच समजेल.अशातच महाविकास आघाडीने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसून यामध्ये माजी आमदार प्रदीप नाईक व उबाठाचे ज्योतिबा खराटे यांच्या नावाची ज...
Dilip Rathod : हदगाव विधानसभेतुन वंचितची उमेदवारी हिमायतनगरचे भूमिपुत्र दिलीप राठोड यांना घोषीत -NNL

Dilip Rathod : हदगाव विधानसभेतुन वंचितची उमेदवारी हिमायतनगरचे भूमिपुत्र दिलीप राठोड यांना घोषीत -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून हिमायतनगरचे भूमिपुत्र दिलीप राठोड यांना घोषीत झाली आहे. आचार सहिंता लागू झाल्यानंतर विविध पक्षाचे ईच्छूक उमेदवार तिकीटासाठी फिल्डींग लावून होते. वंचित बहुजन आघाडीकडून हदगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी चार जण इच्छुक होते. त्यामुळे वंचितची उमेदवारी कोणाला मिळेल हे गुलदस्त्यात होते. दरम्यान वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी दिलीप राठोड यांना उमेदवारीची घोषणा केली आहे. वंचितचे उमेदवार दिलीप राठोड हे हिमायतनगर तालुक्यातील मौजे दरेसरसम येथील रहावाशी असून, यांच शिक्षण बी. काॅम., एम.एस.डब्लू. पर्यतचे झाले आहे. सिप्रा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हिमायतनगर तालुक्यात महिला बचतगट, विविध प्रश्न...
Due to heavy rains on Sunday  रविवारच्या धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक प्रवेश मार्ग तासनतास झाले होते बंद -NNL

Due to heavy rains on Sunday रविवारच्या धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक प्रवेश मार्ग तासनतास झाले होते बंद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरच्या विकासासाठी अंदाजे 150 कोटीहून जास्तीचा निधी खर्च झाला. मात्र आजही हिमायतनगर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अर्धवट नळयोजनेच्या कामांसह, शहरातून गेलेल्या अर्धवट राष्ट्रीय महामार्ग कामात अभियंता, ठेकदाराकडून झालेली हेराफेरी, राजकीय नेत्यांच्या टक्केवारीच्या हिस्सेदारीमुळे विकास कामात बोगसपणा आल्याने हिमायतनगर शहराचा सत्यानाश झाला आहे. अशी संतापजनक भावना रविवारी दुपारी झालेल्या पावसाच्या पाण्याने तासनतास मुख्य प्रवेश रस्ते बंदच्या त्रासाला वैतागलेल्या विकास प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःच्या विकास करून घेणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या परिवर्तनाच्या लाटेतून दाखवून देण्याची भाषा देखील अनेकांनी बोलून दाखविली आहे. हिमायतनगर ग्रामपंचायतीला मागील नऊ वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला नगरपंचायत झाल्...
Section 144  : मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 -NNL

Section 144 : मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 नोव्हेबर 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 नोव्हेबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्...
C-Vigil app : सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली -NNL

C-Vigil app : सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली -NNL

क्राईम, मुंबई
मुंबई| राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते 19 ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 576 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 563 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण 98 टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली. सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यानुसार राज्यातील शासकीय जागेतील 2 लाख 42 हजार 634, सार्वजनिक जागेतील 2 लाख 79 हजार तर खाजगी जागेतील विनापर...
damage caused due to return rains : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी -NNL

damage caused due to return rains : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसापरतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले ...
Nanded Sports Complex : नांदेड क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन -NNL

Nanded Sports Complex : नांदेड क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी क्रीडा संकुलामध्ये आजपासून राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ करण्यात आला.नांदेडच्या जिल्हा क्रीडा संकुलात या संदर्भातील अद्यावत सेवा उपलब्ध करण्यात आल्या असून जिल्ह्याच्या यजमानपदामध्ये आज याचा प्रारंभ झाला. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा आर्चरी (धनुर्विद्या )असोसिएशन यांचे सहकार्याने चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय आर्चरी 14,17,19 वर्षे मुले-मुली . क्रीडा स्पर्धेचे आयोजन 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, नांदेड येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेचे उदघाटन आज दि. 19 ऑक्टोंबर,2024 रोजी सकाळी 10.00 वा आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. महेशकु...
error: Content is protected !!