Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Santseva Lal Samrudhi Laman Tanda Yojana : संतसेवालाल समृध्दी लमाण तांडा योजनेच्या तालुका समितीवर विकास राठोड, महेश जाधव यांची निवड -NNL

Santseva Lal Samrudhi Laman Tanda Yojana : संतसेवालाल समृध्दी लमाण तांडा योजनेच्या तालुका समितीवर विकास राठोड, महेश जाधव यांची निवड -NNL

करियर, नांदेड
हदगांव| संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेंतर्गत गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीवर सदस्यपदी हदगाव तालुक्यातील मुळचे पांगरी तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विकास राठोड़ व महेश जाधव या दोघाची हदगाव तालुका समितीवर यांची नियुक्ती करण्यात आली. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय क्र. तांडा सुधार-२०१९/प्र.क्र.६७/आस्था-५, दि.२३ फेब्रुवारी २०२४ अन्वये संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजना अंमलबजावणी करण्यासाठी हदगाव तालुका स्तरावर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंजारा लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इत्यादी व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजनेच...
BJP and the Shiv Sena : नांदेड दक्षिणच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच -NNL

BJP and the Shiv Sena : नांदेड दक्षिणच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| नांदेड दक्षिण मतदार संघातील जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या जागेवर भाजपने दावा केला आहे, तर दुसरीकडे शिंवसेनेचा हा मतदार संघ बाल्लेकिल्ला आहे, त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन ठराव घेतला आहे. 2019 मध्ये भाजपमुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला होता. भाजपने गद्दारी केली होती, मागच्या निवडणुकीत जी चूक केली ती यावेळेस आम्ही कदापि सहन करणार नाही. असा इशारा शिवसैनिकांनी भाजपाला दिला आहे. नांदेड दक्षिणची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी आणि पक्षात आलेल्या उपऱ्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. त्यामुळे आगामी काळात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे....
candidate of Vanchit : अबबब..नांदेडच्या मतदारांनी वंचीतच्या उमेदवाराला चक्क नोटांचा हार घातला -NNL

candidate of Vanchit : अबबब..नांदेडच्या मतदारांनी वंचीतच्या उमेदवाराला चक्क नोटांचा हार घातला -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| जिल्ह्यातील लोहा विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून शिवा नरंगले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदार संघात पैसे देवून मतदान विकत घेता येते असा काहींचा समज झालेला आहे. हा समज मोडून काढण्यासाठी माळाकोळी येथील ग्रामस्थांनी चक्क वर्गणी गोळा करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले या उमेदवाराला तब्बल 5 लक्ष 55 हजार रुपयांची आर्थिक मदत कार्यक्रम घेत केली आहे. यातील 2 लाख 51 हजार रुपये हारा च्या रूपाने दिले आहेत तर उर्वरित पैसे बँक खात्यात दिले आहेत. आगामी काळातही 25 लक्ष रुपये देण्याचा संकल्प केला असल्याचे संयोजकांनी बोलून दाखवल आहे. मतदारांना पैशाने खरेदी करता येते हा समज मोडीत काढण्यासाठी हा उपक्रम राबवल्याच संयोजकांनी म्हटलं आहे, एकूणच आता लोहा विधानसभा निवडणुक ही मतदारांनी हातात घेतली असल्याचे पहावयास मिळाले आहे,...
youth festival ; युवक महोत्सवातील विडंबनातून सामाजिक राजकीय प्रश्नाला फोडली वाचा – NNL

youth festival ; युवक महोत्सवातील विडंबनातून सामाजिक राजकीय प्रश्नाला फोडली वाचा – NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ-२०२४’आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या जयवंत दळवी नाट्य मंचावर विडंबन या कला प्रकारातून स्पर्धकांनी देश आणि राज्य पातळीवरील सामाजिक आणि राजकीय ज्वलंत विषयांना वाचा फोडली. राजश्री शाहू महाराज लातूरच्या वैभव काकडे, ऋतुराज सुरवसे, प्रशांत पाटील यांनी भाजीपाला नावाचे विडंबन सादर केले. या विडंबनातून देशातील बेरोजगारी मोठमोठ्या परीक्षेत होत असलेले घोटाळे, राजकारण्यांची भूमिका यामुळे समाजाचे झालेले नुकसान आधी ज्वलंत विषयांना वाचा फोडण्याचे काम केले. देशातील भयान वास्तविकता, विडंबनाच्या माध्यमातून युवकांनी समोर आणली. शिवाजी कॉलेज परभणी येथील स्पर्धकांनी ‘परिपाठ’ नावाचे विडंबन सादर केले. यामध्ये शाळेमध्ये प्रतिज्ञा, प्रास्ताविक, राष्ट्रगीत घेतली जाते पण ...
Ramesh Chennith ; मविआत कोणतेही मतभेद नाहीत; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल: रमेश चेन्नीथला – NNL

Ramesh Chennith ; मविआत कोणतेही मतभेद नाहीत; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल: रमेश चेन्नीथला – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई | महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातही वाद नाहीत. तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे, जागा वाटपाची ही चर्चा एक दोन दिवसात पूर्ण होईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व महाविकास आघाडीची प्रकृत्तीही उत्तम आहे असेही चेन्नीथला यांनी सांगितले. प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर सकाळी भेट घेतली त्यावेळी त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, यावेळी त्यांच्याबरोबर CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, शिवसेना खा. संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतर चेन्नीथला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच...
Jnantirtha-2024 Inter-College Youth Festival – ज्ञानतीर्थ-२०२४ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवातील लावणीवर तरुणाई थिरकली – NNL

Jnantirtha-2024 Inter-College Youth Festival – ज्ञानतीर्थ-२०२४ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवातील लावणीवर तरुणाई थिरकली – NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात दुसर्‍या दिवशी मुख्यमंचावर सादर झालेल्या लावणीने तरुणाई थिरकली. युवक महोत्सवात लावणी या कलाप्रकाराला प्रेक्षकांचा मोठा प्रतीसाद मिळाला. स्पर्धक कलावंतांनी पारंपारिक पद्धतीने लावण्या सादर केल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या अदिती केंद्रे हिने ‘तुम्ही याव सजना, रंग होळीला’ ही शृंगारिक लावणी सादर केली. या लावणीला प्रेषकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची मोठी दाद मिळाली. ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी’ ही लावणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील ललित व कला संकुलाच्या कु. प्रतीक्षा बुंदराळे हिने सादर केली. या लावणीला प्रेक्षकांनी मोठी दाद मिळाली. नारायणराव चव्हाण विधी महाविद्या...
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये कार्यशाळेचे आयोजन – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये कार्यशाळेचे आयोजन – NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये पीएम उषा (PM-USHA) योजनेअंतर्गत दि.२१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ‘कम्प्युटर- एडेड ड्रग डिझायनिंग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये नवीन औषध संशोधनाबद्दल माहिती आणि त्यासाठी तंत्रज्ञान वापराचे कौशल्य व ज्ञान इत्यादिंचा अंतर्भाव असणार आहे. या कार्यशाळेमध्ये पदव्यूत्तर, संशोधक विद्यार्थी आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेमध्ये बायोविया डिस्कव्हरी सॉफ्टवेअरचा परिचय, डॉकिंग, वर्च्युअल स्क्रीनिंग, एडीएमइटी आणि टीओपीकेएटी, थ्रीडी क़्युएसएआर, फोर्स फिल्ड आणि मिनीमायझेशन, मॉलिक्युलर डायनॅमिक्स सिम्युलेशन यासारख्या विषयावर सखोल चर्चा होणार आहे. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. आर. बुटले असून कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस. एस. पेकमवार, डॉ...
Workers Association meeting : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मेळावा संपन्न -NNL

Workers Association meeting : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मेळावा संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| विद्युत महावितरण विज तांत्रिक कामगारांचा नांदेड येथील शालिमार फंक्शन हॉलमध्ये केंद्रिय सभा व तांत्रिक कामगारांचा मेळावा १९ ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य सभेसह मेळावा संपन्न झाला कामगारांच्या विविध प्रश्नावर विविध मान्यवरांनी आपले मत या मेळाव्यात व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रमुखचे मुख्य अतिथी व उद्घाटक सतीश चव्हाण, (संचालक संचलन, महापरेषण कंपनी, प्रकशगंगा, मुंबई) प्रमुख श्री अनिल डोये मुख्य अभियंता नांदेड, नासीर खदरी मुख्य अभियंता औरंगाबाद, सुंदर लटपटे मुख्य अभियंता लातूर, पवनकुमार कछोट मुख्य अभियंता औरंगाबाद आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या परिषद मेळाव्यामध्ये दि.११ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान व संघटनेचा २७ वा वर्धापन दिन आहे, आणि याच दिवशी महाअधिवेशन कोकणात सिंधुदुर्गात घेण्याबाबत चर्चा झाली व सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर अनेक मान्यवरांनी ...
Collector Abhijit Raut : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Collector Abhijit Raut : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. या काळात पैशाची देवाण-घेवाण, भेट वस्तु वाटप, रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारु विक्री व वाहतूक अशा घटनावर नियंत्रण होण्यासाठी संबंधित यंत्रणानी काळजी घ्यावी. यादृष्टीने जिल्ह्यात एफएसटी व एसएसटी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी जास्तीत जास्त कारवाई करुन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक...
Com. Ujvla Padalwar : आशा,गटप्रवर्तकांच्या विजयी मेळाव्यात कॉ.उज्वला पडलवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार -NNL

Com. Ujvla Padalwar : आशा,गटप्रवर्तकांच्या विजयी मेळाव्यात कॉ.उज्वला पडलवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तकांचा किनवट तालुका विजयी मेळावा साईबाबा संस्थान येथे दि.१९ ऑक्टोबर रोजी उत्सहात संपन्न झाला. आरोग्य विभागाचा कणा तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना मानधन देण्याऐवजी त्यांना किमान वेतन देण्यात यावे व शासकीय सेवेत समायोजन करावे ह्या मागणीसाठी सीटूच्या झेंड्याखाली सातत्याने संघर्ष सुरु आहे. त्यास यश मिळत असून अलीकडे राज्य शासनाकडून दहा हजार रुपये वाढ मिळवून घेण्यात सीटू संघटनेस यश मिळाले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सीटू सलग्न आशा व गटप्रवर्तकांचे तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्या धरतीवर किनवट तालुका मेळावा काल घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होत...
error: Content is protected !!