Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Jyotiba Kharate : किनवट विधानसभेच्या उमेदवारीस माझ्या निष्ठेला फळ मिळेल – ज्योतीबा खराटे -NNL

Jyotiba Kharate : किनवट विधानसभेच्या उमेदवारीस माझ्या निष्ठेला फळ मिळेल – ज्योतीबा खराटे -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहुर - कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यातर किनवट-माहुर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व महायुतीची उमेदवारी अध्याप घोषित झाल्या नाही. युतीकडून विद्यमान आ.भीमराव केराम यांचेसह डझनभर ईच्छुक असुन  आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबा खराटे हे अग्रही असुन त्यांच्या एका शिष्टमंडळाने मातोश्री गाठली असल्याची माहिती असुन माझ्या ३५ वर्षांच्या निष्ठेला फळ मिळेल असा आशावाद ज्योतीबा खराटे यांनी व्यक्त केला आहे.               किनवट- माहुर सारख्या दुर्गम भागात गत ३५ वर्षां पासून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पक्ष उभारणीसाठी परीश्रम घेत मतदारसंघात खराटे यांनी अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवक, सभापती, पंचायत समिती सदस्य ,जि. प. सदस्य घडवून पंचायत समिती नगर पंचायत ताब्यात ठेवण्याचे काम केले, ...
MLA Hemantbhau Patil : हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील -NNL

MLA Hemantbhau Patil : हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने केले नाही ती सर्व कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी केली आहेत. मोठ-मोठे बंधारे, बेरेजेस यासह ग्रामीण भागातील लहान रस्ते मुख्य रस्त्याला जोडून दळणवळणाचा मार्ग मोकळा केला आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, जेष्ठ नागरिक, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, विविध महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक घडविण्यासह विविध कामे करत, सर्व प्रकारच्या घटकांना न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा आशीर्वाद मिळून हदगाव हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकेल असा ठाम विश्वास विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केला. ते हिमायतनगर येथील साईबाबा मंदिराच्या आवारात दिनांक १९ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या युवासेनेच्या संवाद मेळाव्यात उपस्थित युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मा...
Loha police action ; लोहा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी;१९वर्षा पासून फरार आरोपी जेरबंद -NNL

Loha police action ; लोहा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी;१९वर्षा पासून फरार आरोपी जेरबंद -NNL

क्राईम, नांदेड
लोहा। लोहा पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी हाती घेतली. सुरुवात चांगली झाली आहे. १९ वर्षा पासून फरार असलेल्या चोरीतील आरोपीला जेरबंद करण्यात लोहा पोलिसांना यश आले .पोलीस निरीक्षक आयलाने याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण तलवार व टीमने ही कामगिरी केली आहे. लोहा पोलीस ठाण्यात २००५ मध्ये कलम ३७९ भादवि या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन बिचवा काळे(वय ५१ वर्ष हा १९ वर्षा पासून फरार होता.पोलीस उपनिरीक्षक अरुण तलवार व त्याच्या साथीदारानी अचून माहिती आपल्या खबऱ्याच्या मदतीने काढली आणि हा आरोपी ज्या वस्तीवर म्हणजे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनी जवळा येथे राहत होता तेथे पीएसआय अरुण तलवार व त्याच्या सहकार्याने धाड टाकली व त्यास पकडले. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी फरार आरोपींचा शोध घेणे व अटक करणे तसेच प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याच्या सूचना दिल्या अतिरिक्त ...
Mla Hemant patil ; किनवट-माहूरच्या जागेवरुन भाजपा-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच -NNL

Mla Hemant patil ; किनवट-माहूरच्या जागेवरुन भाजपा-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.अशातच किनवट-माहूर विधानसभाच्या युती आणि आघाडीमधील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नसतांना माञ भाजपा पक्षातील काही अति उत्साही पदाधीकारी हि जागा आमचीच असल्याचा दावा करीत आहे तर शिंदेसेना आमचाच उमेदवार फिक्स असल्याचा दावा करीत आहे.या जागा वाटपावरून महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. किनवट-माहूर संघातील शिंदे शिवसेनेचे ता.प्रमुख सुदर्शन नाईक यांनी शिंदे सरकार व माजी खा.हेमंत पाटील यांच्या ५ वर्षाच्या विकास कामाचा संपूर्णं लेखाजोखा सोशल मिडीयावर व्हायरल करुण  ‘शिंदे सरकारचं काम बोलतंय’यांचे श्रेय कोणीही घेऊ नये, असा मजकुर टाकून माध्यमावर फिरवले आहे. हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला...
work in MLA’s own hometown is bogus : आमदाराच्याच मूळ गावातील कोट्यावधीचा सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम बोगस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार -NNL

work in MLA’s own hometown is bogus : आमदाराच्याच मूळ गावातील कोट्यावधीचा सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम बोगस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार यांच्या मूळ गावात मंजूर झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कोट्यवधींच्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे काम अत्यंत बोगस पद्धतीने करण्यात येत आहे. केवळ शासनाला चुना लावण्याचे काम संबंधित ठेकेदार व जिल्हा परिषदचा अभियंता करत आहे. या कामाची तक्रारदारासमक्ष सविस्तर चौकशी करावी, संबंधीत एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून ठेकेदार व बोगस कामाला संमती देणाऱ्या अभियंत्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जवळगाव येथील जागरूक नागरिक रामराव शेषेराव बंडे यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात जवळपास हजारो कोटींचा निधी निवडणुकीच्या तोंडावर उपलब्द झाला असल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हदगाव- हिमायतनगर मतदार संघात व...
Kamalbai bokare passed away ; सोमेश्वर येथील प्रतिष्ठित कमलबाई बोकारे यांचे निधन -NNL

Kamalbai bokare passed away ; सोमेश्वर येथील प्रतिष्ठित कमलबाई बोकारे यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। तालुक्यातील सोमेश्वर येथील प्रतिष्ठित श्रीमती कमलबाई सोमाजीराव बोकारे यांचे शुक्रवार दि१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दि १९ रोजी दुपारी १२ वाजता सोमेश्वर येथील गोदावरी नदीच्या तीरावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे श्रीरंग सोमाजी बोकारे, कैलास सोमाजी बोकारे,सुदाम सोमाजी बोकारे हि मुल, एक मुलगी सूना नातू असा परिवार आहे....
Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL

Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| कोजागिरी पौर्णिमेनिमित्त येथील आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ८८ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आणि गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील व परिसरातील कवी, गायकांनी सहभागी होत जुन्या सुरेल गाण्यांची अविस्मरणीय बरसात केली. महागायक मोहम्मद रफी यांचे चाहते शंकर धोंगडे यांनी रसिकांना 'तेरे नाम का दिवाना....!' च्या गायनाने मंत्रमुग्ध केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जुन्या गितांचे गायन आणि कविसंमेलन हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षणाधिकारी डी. डी. सुपे हे होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, बालाजी थोटवे, आनंद वाघमारे, कवी पंडित पाटील बेरळीकर, साहित्यिक कवी विरभद्र मिरेवाड, ग...
Prajakta Hanamghar : स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास यशाचा मार्ग मिळतो – सिने कलावंत प्राजक्ता हनमघर -NNL

Prajakta Hanamghar : स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास यशाचा मार्ग मिळतो – सिने कलावंत प्राजक्ता हनमघर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| मी ज्यांच्यामुळे घडले त्यांच्याबद्दल नेहमीच कर्तज्ञ असते. माझी ओळख मराठवाड्याची मानस कन्या म्हणून आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. मराठवाडा संतांची, समतेची, अध्यात्माची भूमी आहे. मराठवाड्याला धार्मिक सांस्कृतिक साहित्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. स्पर्धेतून यश-अपयश मिळतच असते. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन बुल सिनेकलावंत तथा कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम प्राजक्ता हनमघर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोगी सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ज्ञानतीर्थ-२०२४' अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. बी. कोकरे, डॉ. प्रशांत पेशकार, प्र.कुलसचिव डॉ. डी. डी...
Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ युवक महोत्सवाच्या शोभा यात्रेतून मराठवाड्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन -NNL

Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ युवक महोत्सवाच्या शोभा यात्रेतून मराठवाड्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी शोभा यात्रेस प्रारंभ झाला. या शोभा यात्रेत विविध महाविद्यालयातून सहभागी स्पर्धक कलावंतानी सहभाग घेतला. या शोभा यात्रेत नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. शोभायात्रेमध्ये मराठवाड्याची लोककला, लोकसंस्कृती, दिंडी, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक या बरोबरच मतदान जनजागृती करीत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ असा संदेश शोभा यात्रेतून दिला. शोभा यात्रेची सुरुवात विष्णूपुरी गावातील मारुती मंदिरापासून करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी ...
शिवाजी हायस्कूल सिडको मुख्य लिपिक पदी वसंत वाघमारे – NNL

शिवाजी हायस्कूल सिडको मुख्य लिपिक पदी वसंत वाघमारे – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड | जनता शिक्षण मंडळ ऊमरदरी संचलित शिवाजी हायस्कूल सिडकोच्या मुख्य लिपिक पदी वसंत वाघमारे यांच्यी नियुक्ती संस्थाचालक शिवाजी जाधव यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली असून या नियुक्ती बदल शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वी वसंत वाघमारे हे 1994 पासून वरीष्ठ लिपीक पदावर‌ कार्यरत होते,संस्थाचालक शिवाजी जाधव यांनी एका पत्राद्वारे मुख्य लिपिक पदावर वाघमारे यांच्यी नियुक्ती केली असून या नियुक्ती बदल संस्था उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक रवि जाधव, मुख्याध्यापक एस.ए.देवरे, पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील, सौ.निमा कदम, देवकर, एस.एल.के.जी.माने, देगावकर ए.जी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे....
error: Content is protected !!