Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी आहात खान पठाण यांची निवड – NNL

नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी आहात खान पठाण यांची निवड – NNL

नांदेड, राजकीय
नविन नांदेड l नवीन नांदेड सिडको भागातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते आहात खान पठाण यांची नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड करण्यात आली. सदरील निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी.आर.कदम,शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण,माजी उपमहापौर अब्दुल गफार, सत्यपाल सावंत, व प्रमूख काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय नवा मोंढा येथे प्रदान करण्यात आले. आहात खान पठाण यांनी आज पर्यंत काँग्रेस पक्ष व पक्ष संघटन वाढीसाठी खूप मोठया प्रमाणात प्रयत्न केले आहेत. ते काँगेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणुन ओळखले जातात. सदरील निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे....
Chain Sharad Koli : लोकनेते चिखलीकर यांच्या जीवास धोका करण्याची भाषा करणाऱ्या शरद कोळीला बेड्या ठोका -NNL

Chain Sharad Koli : लोकनेते चिखलीकर यांच्या जीवास धोका करण्याची भाषा करणाऱ्या शरद कोळीला बेड्या ठोका -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यातील कणखर राजकीय नेतृत्व तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या जीवितास धोका करण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेचा उपनेता शरद कोळी याला तात्काळ अटक करा अशी मागणी भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी आज पोलीस अधीक्षकांकडे केली आहे . नांदेड जिल्ह्यातील स्वाभिमानी आणि स्वकर्तुत्वावर जनसामान्यांच्या मनात कायम रुजलेली नेतृत्व म्हणून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाहिले जाते. तळागळातील आणि शेवटच्या घटकातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी माजी खासदार चिखलीकर यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ते पुन्हा एकदा लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीच्या तयारीमुळे त्यांच्या लोकप्रियता अधिकाधिक वाढ होत असल्यान...
आंतरराष्ट्रीय स्तरावर शल्यचिकित्सेत नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप जाधव यांचे अतुलनीय योगदान – NNL

आंतरराष्ट्रीय स्तरावर शल्यचिकित्सेत नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप जाधव यांचे अतुलनीय योगदान – NNL

नांदेड, आरोग्य
 नवीन नांदेड l आफ्रिका खंडातल्या मालवी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप नानासाहेब जाधव यांनी उल्लेखनीय योगदान दिले. मालवी या देशातील ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरांमध्ये तेथील प्रसिद्ध एल एम जे हॉस्पिटलच्या वतीने कार्डिओलॉजी अँड सर्जरी त्यांचे आयोजन करण्यात आले याच्या मध्ये पुणे येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप जाधव यांनी पोट विकाराच्या विविध १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ प्रदीप जाधव पुण्यातील रेझूलेट केअर, मणिपाल हॉस्पिटल (खराडी पुणे), नोबल हॉस्पिटल (हडपसर) आणि मेडिकेअर हॉस्पिटल (हडपसर) येथे रुग्णसेवेत कार्यरत आहेत. आफ्रिका खंडातील मालवी या देशात ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरात गेल्या ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. या संदर्भात अधिक माहिती देताना सुप्रसिद्ध श्रेय चिकित्सक डॉ. प...
Nana Patole : मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले -NNL

Nana Patole : मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आहेत असा गंभीर आरोप करून रडीचा डाव खेळू नका, हिम्मत असेल तर आमने सामने लढा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. शिवालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष पराभवाच्या भितीने षडयंत्र करत आहेत. निवडणूक आयोग मोदीशाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे, आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्ष...
Election Officer : निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी -NNL

Election Officer : निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| लोकशाहीमध्ये निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असून दोन दिवसांच्या कामाचा विनाकारण बाऊ कोणी करू नये. अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी दांड्या कोणी मारत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी सूचना नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केल्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोट निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक अनुषंगिक कामाचा आढावा घेतांना यातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी गांभीर्य लक्षात न घेता अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. विशेषतः जी.एस.टी.विभाग, अनेक बि.एल.ओ. तथा पर्यवेक्षक यांची अनुपस्थिती होती. अशा अनुपस्थित अधिकारी व कर्मच...
Helpline number 1098 activated : संकटग्रस्त बालकांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित -NNL

Helpline number 1098 activated : संकटग्रस्त बालकांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कुठून कशी मिळवून देता येईल, याकरीता कुठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरीकांमध्ये संभ्रम असतो. यासाठी आता चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित करण्यात आली. संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकांना मदत मिळवून देऊ शकतात. या ...
Violation of Code of Conduct : आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल -NNL

Violation of Code of Conduct : आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| 15 ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना कंधार शहरात भेटवस्तू वाटप करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या छायाचित्रावरून कंधार येथे आचारसंहिता भंग करण्याचा अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार येथील संभाजी नगर परिसरात पिकअप व्हॅन क्रमांक नंबर एमएच 14 जीयू 7751 मधील अनोळखी इसमाने कंधार येथील संभाजीनगर कंधार येथे आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करून नागरिकांना भेटवस्तू वाटप करीत असल्याचे फोटो व्हाट्सअपवर व्हायरल झाला. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास समाज माध्यमावर या संदर्भातील फोटो व्हायरल झाला. त्यानंतर या परिसरात शासनाच्या वतीने फिर्यादीने प्रत्यक्ष भरारी पथकाद्वारे पाहणी केली असता सदर पिकअप व्हॅन आढळून आली नाही. मात्र या संदर्भातील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानुसार कंधार पोलीस ठाण्य...
In the upcoming elections : आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने घटक पक्षाला डावलले तर निवडणूक महागात पडणार -NNL

In the upcoming elections : आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने घटक पक्षाला डावलले तर निवडणूक महागात पडणार -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट नांदेड उत्तर मधील पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक  दि. १८ शुक्रवारी हिमायतनगर येथे संपन्न झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीत निवडणुकीच्या उमेदवाराकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर जिलाध्यक्ष पवार यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. एकूणच आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने घटक पक्षाला डावलले तर हि निवडणूक त्यांना महागात पडणार असल्याचे बैठकीतील विचारमंथन चर्चेतून समोर आले आहे.   हिमायतनगर शहरातील भैय्या बंडेवार यांच्या फार्महाउस येथील श्री साईबाबा मंदिर सभागृहात दि. १८ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील पदाधिकारी यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात विचार मंथन करण्यात आले असून, नांदेड उत्तरचे जिल्हाध...
Hadgaon Himayatnagar assembly elections : हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच -NNL

Hadgaon Himayatnagar assembly elections : हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दिनांक २० नोव्हेम्बरला मतदान होऊन २३ नोव्हेम्बरला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून पक्षश्रेष्टींने दिलेल्या आदेशानुसार हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार जवळगावकर दावेदार असताना महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्षा डॉ. रेखाताई चव्हाण यांनीहि मतदार संघात जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या भाऊगर्दीतून अनेकांनी माघार घेतली असली तरी, आता आमदार जवळगावकर आणि डॉ.चव्हाण यांच्यातच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. या दोघांच्या रस्सीखेचीत हदगाव विधानसभेची जागा उबठा गटाला सोडण्यात येऊन तिसऱ्याचा तर फायदा होणार नाही ना..! अशी चर्चा आता मतदार संघात होऊ लागली आहे. तर भाजपा, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्...
Successful kidney transplant : श्री गंगा हॉस्पिटल येथे भिन्न रक्तगटाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण…! -NNL

Successful kidney transplant : श्री गंगा हॉस्पिटल येथे भिन्न रक्तगटाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण…! -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| मूत्रपिंड (किडनी ) दाता असतानाही अनेकदा रक्तगट जुळत नसल्यामुळे रुग्णाला डायलिसिस वर जीवन जगावे लागत असे, परंतु आता नवे नंत्रज्ञान व औषधोपचारांमुळे भिन्न रक्तगट असले तरी किडनी प्रत्यारोपण होत आहे.अशाच प्रकारचे भिन्न रक्तगट असलेले किडनी प्रत्यारोपण नांदेड येथील शिवाजीनगर श्री गंगा हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.शहाजी जाधव यांनी यशस्वी रित्या केले आहे. ओम तिरुपती पवार यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या मुळे मागील ३ महिन्यापासून तो डायलिसिस वर होता. ओम च्या आई ने किडनी देण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु ओम चा रक्तगट ओ (o+) आणी आई चा रक्तगट ए (A+) होता.श्री गंगा हॉस्पिटल येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव सांगितले की ओ (o) रक्तगट असलेला यक्ती फक्त ओ (o) रक्तगट असलेल्या यक्तीची किडनी स्विकारू शकतो .अशा वेळी किडनी प्रत्यारोपण करायचे असेल तर रुग्णाच्या शरीरातील किडनी ...
error: Content is protected !!