HomeनांदेडChain Sharad Koli : लोकनेते चिखलीकर यांच्या जीवास धोका करण्याची भाषा करणाऱ्या...

Chain Sharad Koli : लोकनेते चिखलीकर यांच्या जीवास धोका करण्याची भाषा करणाऱ्या शरद कोळीला बेड्या ठोका -NNL

नांदेड| जिल्ह्यातील कणखर राजकीय नेतृत्व तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या जीवितास धोका करण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेचा उपनेता शरद कोळी याला तात्काळ अटक करा अशी मागणी भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी आज पोलीस अधीक्षकांकडे केली आहे .

नांदेड जिल्ह्यातील स्वाभिमानी आणि स्वकर्तुत्वावर जनसामान्यांच्या मनात कायम रुजलेली नेतृत्व म्हणून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाहिले जाते. तळागळातील आणि शेवटच्या घटकातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी माजी खासदार चिखलीकर यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ते पुन्हा एकदा लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

या निवडणुकीच्या तयारीमुळे त्यांच्या लोकप्रियता अधिकाधिक वाढ होत असल्याने राजकीय विरोधकांना आता पोटशूळ उठला आहे. त्यामुळे चिखलीकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याची भाषा केली जात आहे . याच प्रकारानुसार शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन चिखलीकर यांच्या जीवतास धोका आणि इजा पोहोचण्याचे अनुषंगाने धमकी दिली आहे. अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती.

सदर पत्रकार परिषदेचा व्हिडिओ फेसबुकवर त्यांनी अपलोड केला होता. याप्रकरणी शरद कोळी याच्याविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद कोळी याच्यावर केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्याला तात्काळ अटक करा अन्यथा नाईलाजाणे आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशाराही जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments