लोहा। लोहा पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी हाती घेतली. सुरुवात चांगली झाली आहे. १९ वर्षा पासून फरार असलेल्या चोरीतील आरोपीला जेरबंद करण्यात लोहा पोलिसांना यश आले .पोलीस निरीक्षक आयलाने याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण तलवार व टीमने ही कामगिरी केली आहे.


लोहा पोलीस ठाण्यात २००५ मध्ये कलम ३७९ भादवि या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन बिचवा काळे(वय ५१ वर्ष हा १९ वर्षा पासून फरार होता.पोलीस उपनिरीक्षक अरुण तलवार व त्याच्या साथीदारानी अचून माहिती आपल्या खबऱ्याच्या मदतीने काढली आणि हा आरोपी ज्या वस्तीवर म्हणजे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनी जवळा येथे राहत होता तेथे पीएसआय अरुण तलवार व त्याच्या सहकार्याने धाड टाकली व त्यास पकडले.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी फरार आरोपींचा शोध घेणे व अटक करणे तसेच प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याच्या सूचना दिल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक एस एस आयलाने सहायक पोलीस निरीक्षक आर एच केदार याच्या मार्गदर्शना खाली पीएसआय अरुण तलवार याचा नेतृत्वाखाली पोलीस जमादार सैप शेख, श्री शेळके, श्री भुरे याच्या टीमने केज (जि बीड) या तालुक्यातील सोनिजवळा येथील।वस्तीवरून आरोपीस पकडले आहे.पोलीस ठाण्यात आणले त्यांच्यानंतर कोर्टासमोर उभे करण्यात आले.पीएसआय श्री तलवार यांनी १९ वर्षा पासून फरार आरोपींचा शोध घेतला व अटक केली त्यामुळे अनेक गुन्ह्याचा उलगडा होणार आहे.
