Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL

Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL

राजकीय, नांदेड
लोहा l लोहा विधानसभा मतदार संघात पहिल्‍याच दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही पण 21 जणांनी 53 नामनिर्देशन पत्र घेतले आहेत अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी दिली. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन दाखल करण्‍यास आज पासून प्रारंभ झाला आहे. दाखल करण्‍यास आज पासयून प्रारंभ झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 30 ऑक्‍टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर 4 नोंव्‍हेबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची अंतिम मुदत आहे. मतदान 20 नोंव्‍हेबर रोजी होणार आहे.स्वतंत्र कक्ष स्थापण करण्यात आला असून तेथे नामांकन खरेदी, तपासणी व स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशांचे पालन व्‍हावे. यासाठी सर्वांनी जबाबदारी पार पाडावी असे निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा सं...
CEO Meenal Karanwal : मतदान प्रत्‍येक नागरिकाचा मूलभूत अधिकार- सीईओ मीनल करनवाल -NNL

CEO Meenal Karanwal : मतदान प्रत्‍येक नागरिकाचा मूलभूत अधिकार- सीईओ मीनल करनवाल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो वापरणे ही आपल्या लोकशाही प्रणालीतील एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती कक्षाच्‍या प्रमुख मीनल करनवाल यांनी केले. जिल्‍हयातील नऊ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जनजागृतीसाठी आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती. पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, येत्‍या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्य...
One lakh 82 thousand women took oath to vote : एक लाख 82 हजार महिलांनी घेतली मतदान करण्याची शपथ -NNL

One lakh 82 thousand women took oath to vote : एक लाख 82 हजार महिलांनी घेतली मतदान करण्याची शपथ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने स्‍वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृतीचे विविध उपक्रम घेतले जात आहेत. आज जिल्ह्यातील सर्व गावांमधून उमेद अभियानातील सुमारे एक लाख 82 हजार 200 स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांनी आज सकाळी 11 वाजता एकाच वेळी विविध गावांमधून मतदान जनजागृती शपथ घेतली. या उपक्रमासाठी उमेदचे जिल्हा अभियान सहसंचालक व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले यांनी पुढाकार घेतला. स्वयंसाहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभाग संघातील महिला यात सहभागी झाल्‍या होत्‍या. यावेळी त्‍यांनी गावातील सर्व मतदारांना मतदान करण्‍यासाठी जनजागृती करण्‍याचा संकल्...
Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून श्री परमेश्वर मंदिरातील वारकरी सांप्रदाईक महिला भजनी मंडळाच्या वतीने काकडा आरतीला प्रारंभ करण्यात आला आहे. सकाळच्या रामप्रहरी सडा-सारवान, अभ्यंगस्नान करून काकडा आरतीसाठी महिला मंडळी येत असल्याने प्रत्येकाच्या घरात हरी नामचे स्वर ऐकू येत आहेत. यामुळे शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, हरिनामाच्या मंजुळ स्वराची पहाट सर्वांसाठी सुखदायक ठरत आहे. सकाळी ५ वाजता टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी देवी देवतांचे दर्शनासाठी गावात गेल्यानंतर श्री परमेश्वर मंदिरातील शिवपती मंदिर सभागृहात संतोषी माता आणि विठ्ठल रुख्माईच्या मूर्तीसमोर काकडा आरतीला सुरुवात होते. पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे काकडा आरती पूर्वी तासभर विविध धार्मिक गीते, भावगीते, गौळण सादर करून काकडा आरती म्हंटली जाते. कोजागिरी पौर्ण...
Pandharinath Bokare : इन्नरव्हील क्लबचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – पंढरीनाथ बोकारे -NNL

Pandharinath Bokare : इन्नरव्हील क्लबचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – पंढरीनाथ बोकारे -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| इन्नरव्हील क्लब नांदेड च्या वतीने ने जुना मोंढा नांदेड येथील आर्य हिंदी विद्या मंदिर दत्तक घेतले असून हि शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. इन्नरव्हील क्लब चे हे सामाजिक बांधिलकी जोपासणार कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केले. इन्नरव्हील क्लब नांदेड च्या वतीने हॅप्पी स्कूल चा प्रकल्प आर्य हिंदी विद्या मंदिर या शाळेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोकारे बोलत होते. शाळेच्या संस्थाचालक सौ.सुनिता तेरकर व दिपक कांकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . त्यांचा सत्कार इन्नरव्हिल क्लबच्या अध्यक्षा प्रा.विमल यन्नावार व सचिव प्रा. सोनाली देशमुख यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...
Boycott on voting is not development : मतदानावर बहिष्कार म्हणजे विकास नव्हे, मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा -NNL

Boycott on voting is not development : मतदानावर बहिष्कार म्हणजे विकास नव्हे, मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| मागील पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवर किनवट तालुक्यातील पांगरपाड येथील गावकऱ्यांनी त्यांच्या मूलभूत भौगोलिक सोयीसुविधीसह इतर मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. जवळपास या घटनेला आता पाच महिने पूर्ण होत आले आहेत तरी त्यांना त्यांच्या हक्काच्या मुलभूत भोगोलिक सोयी सुविंधासह शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी राशन कार्ड धारकांना प्राधान्य अथवा एपीएल बीपीएल राशन कार्ड मध्ये समाविष्ट करून घ्यावे तसेच निराधार महिलांसाठी पेन्शन योजना लागू करावी, रेवानाईक तांडा ते कंचेली रस्त्यावरील पुलाची उंची वाढवून द्यावी, मोबाईल टावर रेंजची सुरुवात करणे, पांगर पहाड ते आमगाव जोड रस्ता करून देणे अशा विविध मागण्या घेऊन गावकऱ्यांच्या वतीने येथील सरपंच महिला सौ संजिरा संदेश जाधव यांनी दिले. पुन्हा एकदा किनवटच्या तहसीलदार शारदा चौडेकर यांच्याकडे निवेदनाद्व...
Earthquake nanded ; नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ;हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू -NNL

Earthquake nanded ; नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ;हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 06:52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली . अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 3.8 अशी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे....
Nanded district in CCTNS system : सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हयाची उत्कृष्ट कामगिरी -NNL

Nanded district in CCTNS system : सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हयाची उत्कृष्ट कामगिरी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस दलाची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान नुकत्याच लागलेल्या सीसीटीएनएस रॅकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने राज्यात द्वितीय स्थान पटकावले आहे. यामुळे संपुर्ण राज्यात नांदेड जिल्हयाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे कडुन पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महीन्यात घेण्यात येतो राज्यातील सर्व घटकांचे माहे ऑगस्ट 2024 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सीसीटीएनएस कार्य प्रणालीमध्ये नांदेड जिल्यातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्...
Salute to Martyrs on Police Memorial Day : नांदेड पोलीस दलाकडुन पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीदांना अभिवादन -NNL

Salute to Martyrs on Police Memorial Day : नांदेड पोलीस दलाकडुन पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीदांना अभिवादन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| हिमालयातील लडाख जवळ असणाऱ्या हॉट स्प्रिंग' या सोळा हजार फुट उंचावर असणाऱ्या ठिकाणी दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव दलाचे जवान गस्त घालत असतांना अचानक चिनी सैन्याकडुन गोळीबार करण्यात आला. त्यांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्याला तोंड देतांना दहा जवान धरातीर्थी पडले. तेव्हा पासुन 21 ऑक्टोबर हा दिन 'हुतात्मा दिन' म्हणुन पाळला जातो. कायदा व सुव्यवस्था राखने, नागरीकांचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे ही कर्तव्य बजावत असतांना पोलीस दलातील अनेक अधिकारी व अमंलदार यांना प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दयावी लागते. अशा प्रकारे विरगती प्राप्त झालेल्या अधिकारी / अमंलदारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी त्यांचे स्मरणार्थ आज दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी आपण पोलीस स्मृतीदिन पाळत आहोत. आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातुन 214 पोलीस अधिकारी/अमं...
Tisari aaghadi ; देगलूर विधानसभामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघात माधवराव देवसरकर यांना उमेदवारी -NNL

Tisari aaghadi ; देगलूर विधानसभामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघात माधवराव देवसरकर यांना उमेदवारी -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड/मुंबई। छत्रपती खा. संभाजीराजे, राजू शेट्टी आणि आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील तिसऱ्या आघाडीने महाराष्ट्र राज्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघामधून माधवराव देवसरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू यांनी ही आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, महायुतीमधील इतरही घटक पक्ष लवकरच यादी जाहीर करणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली असून ६६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा...
error: Content is protected !!